कोरोनात १४ दिवस स्वत:ला कोंडून घेतल्यानंतर तुम्हालाही जाणवतोय का एकटेपणा..? करून बघा 'हे' उपाय... - Marathi News | Many women feel lonely after the quarantine period | Latest sakhi News at Lokmat.com
>सुखाचा शोध > कोरोनात १४ दिवस स्वत:ला कोंडून घेतल्यानंतर तुम्हालाही जाणवतोय का एकटेपणा..? करून बघा 'हे' उपाय...

कोरोनात १४ दिवस स्वत:ला कोंडून घेतल्यानंतर तुम्हालाही जाणवतोय का एकटेपणा..? करून बघा 'हे' उपाय...

कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेक गृहिणींना वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक त्रासांना सामाेरे जावे लागत आहे. पोस्ट कोविड स्टेज म्हणून ही अवस्था ओळखली जाते. १४ दिवस घरातल्या एकाच खोलीत कोंडून राहिल्यानंतर तुम्हालाही जाणवतोय का असा एकटेपणा ? तुमच्याही मनात येतेय का रिक्तपणाची भावना. काही दिवसांची ही फेज चटकन संपवायची आहे ना ? मग हे उपाय नक्की करून पहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 07:39 PM2021-06-11T19:39:57+5:302021-06-11T19:49:11+5:30

कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेक गृहिणींना वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक त्रासांना सामाेरे जावे लागत आहे. पोस्ट कोविड स्टेज म्हणून ही अवस्था ओळखली जाते. १४ दिवस घरातल्या एकाच खोलीत कोंडून राहिल्यानंतर तुम्हालाही जाणवतोय का असा एकटेपणा ? तुमच्याही मनात येतेय का रिक्तपणाची भावना. काही दिवसांची ही फेज चटकन संपवायची आहे ना ? मग हे उपाय नक्की करून पहा.

Many women feel lonely after the quarantine period | कोरोनात १४ दिवस स्वत:ला कोंडून घेतल्यानंतर तुम्हालाही जाणवतोय का एकटेपणा..? करून बघा 'हे' उपाय...

कोरोनात १४ दिवस स्वत:ला कोंडून घेतल्यानंतर तुम्हालाही जाणवतोय का एकटेपणा..? करून बघा 'हे' उपाय...

Next
Highlightsएकाच खोलीत बंदिस्त असल्याने कोणतीही विशेष शारिरीक हालचाल होत नसल्याने अनेकींची रात्रीची झोपही गायब झाली आहे.यामुळे भूकेवरही परिणाम होऊन आणखीनच अशक्तपणा येत आहे. 

कोरोना झाल्यानंतर कोविड केअर सेंटरमध्ये राहण्यापेक्षा आपलेच घर बरे, हा विचार करून अनेकांनी आनंदाने होम आयसोलेशनचा पर्याय निवडला. काही जणांनी खरोखरच घरी आनंदात दिवस घालविले आणि कोरोनातून बरे झाल्यानंतर आपले ऑफिस किंवा इतर कामांना नेहमीप्रमाणे दणक्यात सुरूवातही करून टाकली. पण सगळ्यांनाच हे होम आयसोलेशन काही मानवलेले नाही. विशेषत: अनेक गृहिणींना  चौदा दिवसांच्या या एकांताचा मानसिक त्रास झाला आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतरही 'ते' चौदा दिवस आठवून त्यांना आणखीनच एकटे वाटू लागले आहे.
आपल्याला कोरोना झाल्याचा धसका, कोरोनामुळे होणारा शारिरीक त्रास आणि त्यातून निर्माण झालेली एकटेपणाची भावना अनेकींना त्रासदायक ठरते आहे.


आपल्याच घरात राहून असे एका खोलीत स्वत:ला कोंडून घेणे, सगळे जग आपापल्या कामात गुंतलेले असताना आपण मात्र सगळ्या जगापासून अलिप्त होऊन जाणे अनेकींना मानवलेले नाही. याशिवाय या १४ दिवसांचा विरंगुळा म्हणजे मोबाईल आणि टीव्ही. त्यामुळे या दोन गोष्टींच्या अतिवापरामुळेेही अनेक महिलांना मानसिक त्रास होत असून नैराश्य, चिडचिडेपणा, अस्थिरता, असुरक्षितता अशी भावना त्यांच्यात वाढत चालली आहे.

कसा घालवायचा एकटेपणा

  • आपल्याविना घर चालू शकते, ही भावना सगळ्यात आधी स्विकारा आणि त्याचा आनंद वाटू द्या.
  • तुम्ही खोलीत एकट्याच होत्या, पण तुमच्या घरातले लोक मात्र त्यांच्या विश्वात अडकलेले होते. त्यामुळे त्यांनी आपल्याशी आता भरभरून बोलावे, आपल्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे वाटत असेल तर हा विचार सोडून द्या.
  • सगळे घर एकाच दिवसात पुर्वपदावर आणायचे, हा अट्टहास नको. आधी तुमची तब्येत सांभाळा आणि मग घर आवरायला काढा.
  • मोबाईल, टीव्ही अशा ज्या गोष्टी त्या १४ दिवसांमध्ये तुमचे करमणूकीचे साधन बनल्या होत्या, त्यांना थोडे दिवस दूर ठेवा. आभासी जगातून बाहेर या आणि वास्तवात मन रमवा.
  • तुमची बाग, बागेतील फुलं यांचा भरभरून आनंद घ्या.
  • भाजी आणणे किंवा इतर काही कामे करण्यासाठी स्वत:हून घराच्या बाहेर पडा.
  • गाडीने जाण्याऐवजी पायी फिरा आणि लहान- सहान खरेदीचा आनंद घ्या.
  • एखादी नवी रेसिपी आवर्जून ट्राय करून पहा.
  • घरातल्या शोभेच्या वस्तू हलवणे, पडदे बदलणे यासारखे थोडे हलके- फुलके बदल नक्की करून पहा. हा बदलही तुम्हाला सुखावह वाटेल आणि काहीतरी चेंज झाल्याचा आनंद मिळेल. 

Web Title: Many women feel lonely after the quarantine period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

उपवास केल्यानं आलेला थकवा कसा घालवाल?; वाचा मोजकं खाऊन निरोगी राहण्याचा फंडा - Marathi News | How to get rid of fatigue from fasting basics tips of staying healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवास केल्यानं आलेला थकवा कसा घालवाल?; वाचा मोजकं खाऊन निरोगी राहण्याचा फंडा

अपूर्ण झोप हे थकवा येण्यामागचं कारण असतं. त्यामुळे भरपूर झोप घ्या. जरी तुम्ही सकाळपासून उपवास केला असेल तरी  रात्री उपवास सोडताना पोटभर जेवून व्यवस्थित झोप घ्या. ...

Ira khan : इरा खानला आई रिनानं दिलं सेक्स एज्यूकेशनचं पुस्तक; पोस्ट शेअर करत खुलासा - Marathi News | Ira khan : Ira khan recalls getting a sex education book from mom when she hit puberty | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Ira khan : इरा खानला आई रिनानं दिलं सेक्स एज्यूकेशनचं पुस्तक; पोस्ट शेअर करत खुलासा

Ira khan : पुन्हा एकदा इरा खानने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे जी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. ...

सारखं कसलंतरी टेंशन येतंय? मग असू शकतो PCOS चा आजार; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा - Marathi News | PCOS & anxiety : Check for symptoms of pcos if you experience anxiety often says expert | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सारखं कसलंतरी टेंशन येतंय? मग असू शकतो PCOS चा आजार; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

PCOS & anxiety : पीसीओएस असलेल्या बर्‍याच लोकांमध्ये अ‍ॅन्ड्रोजन (टेस्टोस्टेरॉनसह हार्मोन्सचा समूह) वाढतो. यामुळे पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य येऊ शकते. ...

४ दिवसांची भयंकर परीक्षा! वयात येणाऱ्या मुलींशी मासिक पाळीविषयी बोलण्याची लाज का वाटते? - Marathi News | Why is it embarrassing to talk about menstruation with girls? periods, talk about them, its natural and all about health. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :४ दिवसांची भयंकर परीक्षा! वयात येणाऱ्या मुलींशी मासिक पाळीविषयी बोलण्याची लाज का वाटते?

मुलींच्या आरोग्याच प्रश्न आहे, जे तिच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, जे निसर्गचक्र आहे, त्याविषयी बोलायचंच नाही, मुलीला त्रास झाला तरी चालेल, हा जुनाट हट्ट कशाला? ...

Women's health : प्रेग्नंसीशिवाय स्तनांमधून दूध, पांढरं पाणी येणं ठरू शकतं 'या' आजाराचं कारण; वेळीच लक्ष द्या - Marathi News | Women's health : Breast milk before delivery causes, symptoms by experts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Women's health : प्रेग्नंसीशिवाय स्तनांमधून दूध, पांढरं पाणी येणं ठरू शकतं 'या' आजाराचं कारण; वेळीच लक्ष द्या

Women's health : डिलिव्हरीनंतर महिलांच्या निप्पल्समधून पांढरा तरल पदार्थ बाहेर येतो. त्याला निप्पल्स डिस्चार्ज असंही म्हटलं जातं. ...

बाळाला दूध पुरत नाही, भूक भागत नाही? दूध वाढवण्यासाठी आईने अवश्य खावेत हे पदार्थ! - Marathi News | This way a mother can increase breast milk production | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळाला दूध पुरत नाही, भूक भागत नाही? दूध वाढवण्यासाठी आईने अवश्य खावेत हे पदार्थ!

चिमुकल्या बाळाला दूध पुरते की नाही, ही एखाद्या आईला कायम सतावणारी गोष्ट. अनेकदा चिंता, काळजी, तणाव आणि सकस आहार न मिळणे यामुळेही स्तनदा मातांचे दूध कमी होऊ शकते.. ...