Join us
Daily Top 2Weekly Top 5

मारु द्या टोमणे, बोलू द्या वाईट! लोकांच्या टोमण्यांतून-नावं ठेवण्यातून ‘अशी’ कमवा ताकद, शिकवा धडा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2026 19:19 IST

Let them taunt you, let them speak evil! Earn strength through it : लोकांचे टोमणे ऐकून वाईट वाटते? पाहा काय करावे.

लोकांचे टोमणे, उपरोधात्मक बोलणं किंवा नकारात्मक टिप्पणी सहज डोक्यातून जात नाहीत. 'दुर्लक्ष करा' असे सांगणे सोपे असते, पण संवेदनशील आणि अतिविचार करणाऱ्या माणसासाठी ते तितके सोपे नाही. अशा वेळी विचारंची लाट येते. कदाचित गोष्ट तेवढी मोठीही नसते मात्र मानसिक त्रास जास्त होतो. त्याच प्रसंगावर पुन्हा-पुन्हा विचार आणि नकळत मन अधिकच दुखावले जाते. (Let them taunt you, let them speak evil! Earn strength through it)भांडण करणे, उत्तर देणे किंवा त्रागा करणे हे क्षणिक समाधान देऊ शकते, मात्र नंतर अपराधी भावना, ताण आणि अस्वस्थता वाढते. म्हणूनच टोमण्यांशी सामोरं जाण्यासाठी योग्य असे वर्तन निवडावे. अधिक शहाणपणाचा मार्ग निवडावा.

अतिविचार करणाऱ्यांनी सर्वात आधी हे समजून घेणे गरजेचे असते की समोरची व्यक्ती जे बोलते ते नेहमीच आपले मोजमाप नाही. अनेकदा लोक स्वतःच्या असुरक्षिततेतून, रागातून किंवा सवयीने टोमणे मारतात. हे ओळखले की मनावरचा भार असाच हलका होऊन जातो. त्यानंतर लगेचच विचारांची साखळी तोडण्यासाठी एखादी साधी, पण पूर्ण लक्ष मागणारी कृती करणे उपयोगाचे ठरते. जसे की स्वयंपाक करताना नवीन पदार्थ करुन पाहणे, खोली आवरणे, कपाट नीट लावणे किंवा एखादे कोडे सोडवणे या कृती मेंदूला गुंतवून ठेवतात आणि नकारात्मक विचारांना जागा उरत नाही.

मन रमवण्यासाठी सर्जनशील गोष्टी फार प्रभावी ठरतात. लिहिणे, चित्र काढणे, गाणे, बागकाम करणे किंवा एखादे हस्तकौशल्य शिकणे यामुळे भावना हळूहळू शब्दात किंवा कृतीत उतरतात. बोलून दाखवण्यापेक्षा अशा प्रकारे व्यक्त झाल्यावर मन अधिक शांत होते. तसेच चालायला जाणे, हलका व्यायाम किंवा योगासने केल्याने शरीरात साठलेला ताण कमी होतो आणि विचारांची गती आपोआप मंदावते. अतिविचार करणार्‍यांसाठी आणखी एक उपयुक्त सवय म्हणजे वर्तमान क्षणाशी जोडले राहणे. टोमणा ऐकून मन भूतकाळात किंवा भविष्यात अडकते. “त्यांनी असे का म्हटले?”, “पुन्हा असे झाले तर काय?” याऐवजी श्वासावर लक्ष केंद्रित करणे, आजूबाजूचे आवाज ऐकणे किंवा हातात असलेल्या कामावर पूर्ण लक्ष देणे ही साधी पण परिणामकारक पद्धत आहे. यामुळे मन स्थिर होते.

लोकांच्या बोलण्याचा विचार करत राहावे का आयुष्यात प्रगती करावी असे दोन पर्याय असतात. त्यामुळे कोणाला आपल्याबद्दल काय वाटते यापेक्षा आपण काय करतो आणि आपला स्वभाव कसा आहे याचा विचार करणे जास्त गरजेचे असते. त्यामुळे जास्त ताण न घेता, शांत राहा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ignore taunts, gain strength, and teach a lesson to critics!

Web Summary : Don't let taunts affect you. Understand others' motives, break negative thought patterns with engaging activities, and express yourself creatively. Focus on the present, practice mindfulness, and prioritize self-growth over others' opinions for a peaceful life.
टॅग्स :मानसिक आरोग्यमहिलाआरोग्यसोशल व्हायरलहोम रेमेडी