Lokmat Sakhi >Mental Health > मन थाऱ्यावर नाही, स्ट्रेस इतका की सुचत नाही? करा ५ साध्या गोष्टी -मन होईल शांत-आनंदी

मन थाऱ्यावर नाही, स्ट्रेस इतका की सुचत नाही? करा ५ साध्या गोष्टी -मन होईल शांत-आनंदी

Know How To Manage Stress and get mental peace : मनशांती आणि ताणतणाव या परस्परांमध्ये गुंतलेल्या गोष्टी आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2023 01:20 PM2023-09-05T13:20:33+5:302023-09-05T13:28:03+5:30

Know How To Manage Stress and get mental peace : मनशांती आणि ताणतणाव या परस्परांमध्ये गुंतलेल्या गोष्टी आहेत.

Know How To Manage Stress and get mental peace : The mind is not in control, the stress is so much, Do 5 simple things - Mind will be calm and happy | मन थाऱ्यावर नाही, स्ट्रेस इतका की सुचत नाही? करा ५ साध्या गोष्टी -मन होईल शांत-आनंदी

मन थाऱ्यावर नाही, स्ट्रेस इतका की सुचत नाही? करा ५ साध्या गोष्टी -मन होईल शांत-आनंदी

मानसी चांदोरकर 

जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकालाच आजूबाजूच्या वातावरणाशी समतोल साधण्यासाठी "स्ट्रगल" करावा लागतो.  हा "स्ट्रगल" करताना प्रत्येक जण, प्रत्येक वयात, वेगवेगळ्या प्रकारचा "ताण" अनुभवत असतो.  उदाहरणार्थ बदलत्या वातावरणाची जुळवून घेताना लहान मुलांना शारीरिक ताण जाणवतो, विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण जाणवतो, तरुणांना नोकरी, आर्थिक परिस्थिती, स्वतःच्या क्षमता सिद्ध करण्यासाठी सतत स्पर्धेला सामोरे जावे लागते. त्यामुळे तेही सतत ताण अनुभवत असतात. तर वृद्ध लोक आपण निरोगी कसे राहू यासाठी प्रयत्नशील असतात. याचा त्यांना ताण येतच असतो. हा ताणच आता प्रत्येकाच्या ढासळत्या मनस्थितीचे कारण बनला आहे. ढासळती मनस्थिती म्हणजेच मनःशांतीचा अभाव.
 
मन शांत नसेल तर मनःशांती कशी चांगली राहील? आणि मनःशांती चांगली नसेल तर रोजच्या ताणतणावाला कसे सामोरे जाता येईल? मन:शांती आणि ताणतणाव या परस्परांमध्ये गुंतलेल्या गोष्टी आहेत. अर्थात जर ताणतणावाला सामोरे जाता आले तर मनःशांती मिळेल आणि मनःशांती मिळाली तरच ताणतणावाला सामोरे जाता येईल. सध्याच्या काळात आपण ज्या अतिरिक्त ताणतणावाचे ओझे बाळगत आहोत, सतत स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावपळीच्या, स्पर्धेच्या युगात उतरवत आहोत, त्या स्पर्धेमुळे आपली  मनशांती नष्ट होऊ लागली आहे. आणि त्याचा परिणाम म्हणजेच समाजात वाढत चाललेल्या मानसिक आरोग्य विषयीच्या समस्या. आणि त्याचे झपाट्याने वाढत चाललेले प्रमाण.

(Image : Google)
(Image : Google)

 
*आपल्याला ताणतणाव नियंत्रणात ठेवायचा असेल तर स्वतःच्या मनाकडे निकोपणे पाहता आले पाहिजे. 

*स्वतःच्या ताणतणावांचे योग्य ते नियंत्रण ठेवता आले पाहिजे.

* त्यासाठी आपल्या स्वतःच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवणे.

(Image : Google)
(Image : Google)

* स्वतःच्या जोडीदारांशी किंवा मग इतर जवळच्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे.

* स्वतःच्या "क्षमता" व "मर्यादांचा" स्वीकार केला पाहिजे. आणि त्यानुसार आपले ध्येय, उद्दिष्ट निश्चित केले पाहिजे.  दुसऱ्याशी स्पर्धा करण्याच्या नादात स्वतःची मनशांती गमावण्यात आणि अतिरिक्त ताणाचे ओझे मनावर व शरीरावर वागवून स्वतःला पुढे रेटत राहण्यास कोणताच आनंद मिळणार नाही. या उलट कदाचित आपणही इतरांसारखे मानसिक आरोग्य गमावून बसू. म्हणूनच "ताण-तणाव नियंत्रित करून मनशांती जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकानेच करायला हवा."

                    
(लेखिका समुपदेशक आहेत)

संपर्क - 8888304759   

इमेल आयडी - Cmanasib01@gmail.com   

Web Title: Know How To Manage Stress and get mental peace : The mind is not in control, the stress is so much, Do 5 simple things - Mind will be calm and happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.