Join us

३ आसनं करा फक्त, मूडही राहील बेस्ट-वाटेल आनंदी आणि एनर्जीची बॅटरी दिवसभर फुल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 16:21 IST

सततची धवपळ करुन शरीर-मन सगळेच थकून जाते. त्यांची एनर्जी कायम ठेवायची तर योगसाधना करायलाच हवी

ठळक मुद्देतुम्हाला पूर्ण रिलॅक्स झाल्यासारखे वाटत नाही तोपर्यंत किमान ५ ते १० मिनीटे शवासनामध्ये नक्की थांबा.सतत ताण घेऊन शरीराबरोबरच मनही थकून जाते, अशावेळी रिलॅक्स होण्यासाठी योगा उपयुक्त ठरतो.

ताण हा आपल्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. पण या ताणासोबत जगण्यापेक्षा त्याच्याशी योग्य पद्धतीने डील केले तर आपले आयुष्य जास्त सुकर होऊ शकते. योगा हा ताण दूर कऱण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक तक्रारींशी लढण्यासाठी योगामुळे आपल्याला ताकद मिळते. प्रसिद्ध योगतज्ज्ञ समिक्षा शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार योगातील विविध आसनांमुळे आपल्याला शांत तर वाटतेच पण आपला ताणही दूर व्हायला मदत होते. योगामध्ये आपण श्वासावर लक्ष केंद्रित करत असल्याने शरीरातील एनर्जी बाहेर येण्यास मदत होते. मन आणि शरीर यांचे कनेक्शन झाल्याने आपला ताण नकळत दूर होण्यास योगाचा उपयोग होतो. 

(Image : Google)

१. अधोमुख श्वानासन

या आसनामध्ये संपूर्ण शरीरावर ताण येतो. दंड आणि खांदे, मणका, पाय अशा सगळ्या अवयवांवर ताण येत असल्याने स्नायू मोकळे होण्यास मदत होते. डोके खाली केल्याने मेंदूला रक्तपुरवठा होतो आणि त्यामुळे एनर्जी आल्यासारखे वाटते. सुरुवातीला पोटावर झोपावे. हात खांद्यांच्या बाजूला घेऊन कंबरेतून शरीर वर उचलावे. यामध्ये पायाचे तळवे आणि हाताचे तळवे जमिनीला टेकलेले राहतात. शरीर वरच्या बाजूला खेचल्यासारखे केल्याने शरीराला चांगला ताण मिळतो. ५ ते १० श्वासांपर्यंत याच स्थितीमध्ये थांबावे. यामुळे आपल्याला एनर्जी आल्यासारखे होते. 

२. उष्ट्रासन 

आपला मणका दिवसरात्र आपल्या शरीराचा भार घेत असतो. दिवसभराच्या सर्व क्रिया सुरळीत होण्यासाठी मणक्याचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. दिवसभरातील विविध गोष्टींचा ताण आणि राग याचा स्ट्रेस या मणक्यावर येतो. मात्र उष्ट्रासनात मागे वाकल्याने छाती ओपन होण्यास मदत होते आणि नकळत आपल्याला एनर्जी आल्यासारखे वाटते. गुडघ्यावर बसून दोन्ही पायांमध्ये पुरेसे अंतर घ्यायचे. दोन्ही हातांनी पायाचे घोटे पकडून कंबरेतून मागे वाकायचे. हे आसन किंमान ३० सेकंदांपर्यंत टिकवावे. 

(Image : Google)

३. शवासन

शवासन हे योगातील एक अतिशय महत्त्वाचे आसन आहे. मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत चालण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त असते. पाठीवर झोपून हात आणि पाय एकदम रिलॅक्स सोडून द्या. डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि शरीर एकदम रिलॅक्स करा. शरीर आणि मनामध्ये होणारे बदल अनुभवा. तुम्हाला पूर्ण रिलॅक्स झाल्यासारखे वाटत नाही तोपर्यंत किमान ५ ते १० मिनीटे या आसनामध्ये नक्की थांबा. थोडा वेळाने हळूवार एका कुशीवर वळून मग उठा. या आसनामुळे शरीराबरोबरच मनही रिलॅक्स व्हायला मदत होते.  

टॅग्स :मानसिक आरोग्यफिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदे