lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > लहानसहान गोष्टींचा खूप विचार करता? 'ओव्हरथिंकींग'चा त्रास होतो? मन शांत करण्यासाठी करा १ सोपा उपाय 

लहानसहान गोष्टींचा खूप विचार करता? 'ओव्हरथिंकींग'चा त्रास होतो? मन शांत करण्यासाठी करा १ सोपा उपाय 

Mental Health Tips: काही जणांना अगदी लहानसहान गोष्टींचाही खूपच जास्त विचार करण्याची सवय असते. ही त्रासदायक सवय कमी करण्यासाठी हा एक उपाय करून पाहा (How to stop overthinking?)...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2023 08:57 AM2023-11-21T08:57:42+5:302023-11-21T08:58:32+5:30

Mental Health Tips: काही जणांना अगदी लहानसहान गोष्टींचाही खूपच जास्त विचार करण्याची सवय असते. ही त्रासदायक सवय कमी करण्यासाठी हा एक उपाय करून पाहा (How to stop overthinking?)...

How to stop overthinking? Home remedies to calm down your mind and thoughts, How to make your mind stable and cool, Home remedies for stable mind | लहानसहान गोष्टींचा खूप विचार करता? 'ओव्हरथिंकींग'चा त्रास होतो? मन शांत करण्यासाठी करा १ सोपा उपाय 

लहानसहान गोष्टींचा खूप विचार करता? 'ओव्हरथिंकींग'चा त्रास होतो? मन शांत करण्यासाठी करा १ सोपा उपाय 

Highlights१० ते १५ दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास चांगला फायदा दिसून येईल.

विचार करणं किंवा आपल्या सभोवती, आपल्याबाबत किंवा आपल्याकडून झालेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करणं ही चांगली सवय आहे. यामुळे आपण कायम आत्मपरिक्षण करत असतो. पण या गोष्टीचा जर अतिरेक झाला तर ते मात्र खूपच त्रासदायक आहे. काही जण अगदी क्षुल्लक गोष्टींचा खूप जास्त विचार करत बसतात आणि स्वत:ला त्रास करून घेतात. यालाच आपण 'ओव्हरथिंकींग' म्हणतो (How to stop overthinking?). मन शांत नसलं की मनात खूप विचार येतात (Home remedies for stable mind). असं नेमकं काय होतं आणि त्यावरचे उपाय काय, हे आता पाहूया...(Home remedies to calm down your mind and thoughts)

 

ओव्हर थिंकींगचा त्रास का होतो?

याविषयीची माहिती आणि व्हिडिओ satvic.yoga या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

स्वयंपाक घरातला फक्त १ पदार्थ वापरा, केस गळणं १५ दिवसांतच होईल कमी- करून बघा..

यामध्ये असं सांगितलं आहे की मन अशांत असणं किंवा मनाची कायम चलबिचल होत राहणं हे शरीरातील वायु तत्वाशी संबंधित आहे. आणि ओव्हर थिंकींगचं सगळ्यात मुख्य कारण हे मन अशांत असणं हेच आहे. त्यामुळे शरीरातील वायु तत्व सुरळीत करण्यासाठी आणि अशांत मनाला शांत करण्यासाठी जर आपण उपाय केले तर आपोआपच ओव्हरथिंकींगचा त्रास कमी होतो. 

 

ओव्हर थिंकींगचा त्रास कसा कमी करायचा?

ओव्हर थिंकींगचा त्रास कमी करण्यासाठी आपण जो उपाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑईल लागणार आहे.

दररोज रात्री झोपण्यापुर्वी तळपाय स्वच्छ धुवून घ्या आणि बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑईलने तळपायांना ५ ते १० मिनिटे मसाज करा.

कितीही घासलं तरी कढईचा तेलकटपणा- चिकटपणा जातच नाही? ३ उपाय, कढई होईल स्वच्छ- चकाचक 

यामुळे तळपायातील अनेक स्नायूंवर दाब निर्माण होतो, मज्जासंस्थेचे कार्य सुधारण्यास मदत होते आणि त्याचा फायदा शरीरातील वायू तत्त्वाला होऊन मन शांत होण्यास मदत होते.

१० ते १५ दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास चांगला फायदा दिसून येईल.

 

Web Title: How to stop overthinking? Home remedies to calm down your mind and thoughts, How to make your mind stable and cool, Home remedies for stable mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.