सध्याच्या धावपळीच्या आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये, ऑफिसमध्ये ८ ते १० तास काम करणं आता अगदी कॉमन झालं आहे. परंतु, सततची डेडलाईन्स, कामाचा दबाव आणि तासंतास एकाच जागी बसून राहिल्यामुळे केवळ शरीराचीच नाही, तर मनाचीही दमछाक होते. ऑफिसमधून घरी परतल्यानंतरही अनेकदा आपण कामाच्या विचारातच असतो, ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि कौटुंबिक सुखावर होतो. जेव्हा हा ऑफिस स्ट्रेस अधिक जास्त वाढतो तेव्हा आपल्याला मानसिक थकवा, चिडचिड, डोकेदुखी आणि एकाग्रतेची कमतरता जाणवते(Simple tricks to reduce office stress).
ऑफिस स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण काही ना काही उपाय करतोच. आपल्या घरातच अशा काही साध्या, सोप्या गोष्टी दडलेल्या आहेत, ज्या आपल्याला या स्ट्रेस पासून दूर ठेवून पुन्हा रिफ्रेश करू शकतात. अशा परिस्थितीत, आपल्याला मोठे बदल करण्याची गरज नसते, तर काही छोटे पण फायदेशीर घरगुती उपाय आपल्या डेली रुटीनमध्ये समाविष्ट केले तर स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. साधे श्वसन व्यायाम, योग्य आहार, नैसर्गिक पेये, छोटे ब्रेक्स आणि मन शांत ठेवणाऱ्या सवयी यामुळे शरीर आणि मन दोन्ही रिलॅक्स राहू शकतात. ऑफिसमधील ताण कमी करून दिवसभर फ्रेश आणि सकारात्मक राहण्यासाठी सहजसोपे (how to reduce work stress naturally) करता येतील असे काही खास घरगुती उपाय पाहूयात...
ऑफिसमध्ये कामाचा दर्जा टिकवून ठेवण्याचा दबाव, सततच्या मीटिंग्ज, तासंतास स्क्रीनसमोर बसणे आणि डेडलाइनच्या आत काम पूर्ण करण्याचे ओझे; या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर होतो आणि प्रचंड स्ट्रेस जाणवू लागतो. जर तुम्हालाही ऑफिसमध्ये असाच स्ट्रेस जाणवत असेल तर काही (natural ways to reduce office stress) सोपे उपाय पाहूयात, ज्यांच्या मदतीने तुम्ही ऑफिस स्ट्रेस बऱ्याच अंशी कमी करू शकता. ऑफिस स्ट्रेस कमी करण्यासाठी, काऊन्सलिंग सायकॉलॉजिस्ट डॉ. नेहा आनंद नेमकं काय सांगतात ते पाहूयात...
ऑफिस स्ट्रेस कमी करण्यासाठी घरगुती उपाय...
१. मायक्रो स्ट्रेच ब्रेक्स (Micro Stretch Breaks) :- 'नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन' मध्ये प्रकाशित झालेल्या जपानमधील एका वैद्यकीय संशोधनानुसार, ऑफिसमध्ये काम करताना दर ६० मिनिटांनी किमान १ मिनिटाचा 'स्ट्रेचिंग ब्रेक' घेणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा आपण सतत एकाच स्थितीत बसून काम करतो, तेव्हा स्नायूंमध्ये ताठरता येते. अशावेळी मान आणि खांद्यांचे हलके स्ट्रेचिंग केल्यास चांगले फायदे मिळतात. सततच्या कामानं येणारा मानसिक ताण हलका होतो. शरीरातील रक्ताचा प्रवाह वाढल्यामुळे उत्साह जाणवतो. मेंदूला होणारा थकवा कमी होऊन एकाग्रता वाढते. मानेचे आणि पाठीचे स्नायू मोकळे होतात, ज्यामुळे दुखण्यापासून आराम मिळतो.
उठणं - बसणंही झालं होतं कठीण, पण श्वेता तिवारीने 'या' घरगुती उपायाने कमी केलं युरिक अॅसिड...
२. पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन (Positive Visualization) :- डॉ. नेहा आनंद यांच्या मते, ऑफिसमध्ये काम करताना जेव्हा कधी तुम्हाला प्रचंड ताण किंवा दडपण जाणवेल, तेव्हा फक्त २ मिनिटांसाठी आपले डोळे मिटा. डोळे मिटल्यानंतर एखाद्या अतिशय शांत आणि निसर्गरम्य ठिकाणाची कल्पना करा—उदा. एखादी हिरवीगार बाग, संथ वाहणारी नदी किंवा अथांग समुद्राचा किनारा. अशा सुखद कल्पनेमुळे मेंदूतील तणाव निर्माण करणारे हार्मोन्स कमी होतात आणि मन शांत होते. ही एक अत्यंत सोपी ट्रिक आहे, जी तुम्ही तुमच्या ऑफिसच्या केबिनमध्ये किंवा डेस्कवर बसल्या बसल्या कधीही करू शकता. केवळ २ मिनिटांच्या या 'मेंटल ब्रेक'मुळे तुम्हाला पुन्हा नवीन उत्साहाने कामाला लागण्याची ऊर्जा मिळते.
३. अरोमा स्टिकचा वापर करा (Use Aroma Sticks To Release Stress) :- ऑफिसमधील तणाव झटकन कमी करण्यासाठी मंद सुगंधाचा वापर करणे हा एक उत्तम उपाय आहे. लॅव्हेंडर (Lavender) किंवा पिपरमिंट (Peppermint) यांसारख्या तेलांचा हलका सुगंध घेतल्यास तुमचा मूड लगेच सुधारतो आणि स्ट्रेस लेव्हल कमी होते. या अरोमा स्टिक्स बाजारात अतिशय स्वस्त आणि 'पॉकेट फ्रेंडली' स्वरूपात मिळतात, ज्या तुम्ही सहजपणे तुमच्या ऑफिस डेस्कवर ठेवू शकता. बीएमसी (BioMed Central) मध्ये प्रकाशित झालेल्या एका जर्नलनुसार, या दोन्ही सुवासांमुळे मानसिक ताण आणि चिंता कमी होण्यास मोठी मदत होते. या सुगंधाचा सकारात्मक परिणाम रात्रीच्या झोपेवरही होतो, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी कामावर जाताना तुम्हाला ताजेतवाने वाटते. जेव्हा कामाचा खूप लोड येतो, तेव्हा फक्त काही सेकंद हा सुगंध घेतल्याने मेंदूला शांत होण्याचे संकेत मिळतात.
४. आय पामिंग तंत्राचा वापर करा (Eye Palming Technique) :- ऑफिसमध्ये तासंतास कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर बसून काम केल्यामुळे डोळे आणि मेंदू दोन्ही प्रचंड थकतात. सततच्या 'स्क्रीन टाइम'मुळे अनेकांना डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा मळमळण्यासारखे भास होऊ लागतात. 'अमेरिकन ऑप्टोमेट्रिक असोसिएशन' च्या मते, डोळ्यांवरील हा ताण कमी करण्यासाठी 'आय पामिंग' हा एक रामबाण उपाय आहे. आपल्या दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासून ते गरम करा आणि डोळे मिटून हळूवारपणे त्यावर ठेवा. केवळ ३० सेकंद तळवे डोळ्यांवर ठेवल्याने शरीरातील 'स्ट्रेस हार्मोन्स' मोठ्या प्रमाणात कमी होतात. या प्रक्रियेमुळे डोळ्यांना थंडावा मिळतो, अंधारामुळे मेंदूला विश्रांती मिळते आणि तुम्ही पुन्हा फ्रेश होऊन कामाला सुरुवात करू शकता.
५. डीप ब्रीदिंग एक्सरसाइज करा (Deep Breathing Exercise) :- जेव्हा ऑफिसमध्ये कामाचा ताण हाताबाहेर जातो किंवा स्ट्रेस जाणवू लागते, तेव्हा 'डीप ब्रीदिंग' हा स्ट्रेस कमी करण्याचा सर्वात जलद आणि सोपा मार्ग ठरतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, जेव्हा तुम्हाला स्ट्रेस जाणवेल तेव्हा एका जागी शांत बसा आणि खोलवर दीर्घ श्वास घ्या. ही प्रक्रिया किमान २ ते ३ मिनिटे सतत करा. दीर्घ श्वास घेतल्यामुळे तुमच्या मज्जासंस्थेला शांत होण्याचे संकेत मिळतात, ज्यामुळे मेंदू लगेच रिलॅक्स होतो. डीप ब्रीदिंगमुळे वाढलेले हृदयविकाराचे ठोके आणि रक्तदाब संतुलित होण्यास मदत होते. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्यामुळे मरगळ दूर होते आणि तुम्ही पुन्हा कामावर लक्ष केंद्रित करू शकता.
