मानसी चांदोरकर
सध्या रोजच्या ताणतणात प्रत्येक वयातीलच व्यक्ती आपली "भावनिक सक्षमता" ढासळत असल्याचे अनुभवत आहे. ही भावनिक सक्षमता अतिरिक्त ताण, अतिरिक्त विचार, अतिरिक्त शारीरिक आणि मानसिक श्रम, आणि पैसा कमावण्यासाठी चाललेली धावपळ यामुळे दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वयोगट कोणताही असो भावनिक अस्वस्थता, भावनिक अस्थिरता, भावनिक चंचलता प्रत्येकच जण अनुभवत आहे. प्रत्येक वयोगटाला नव्या नव्या आव्हानांना सामोरे जावे लागते. आणि त्यासाठी अतिरिक्त शारीरिक आणि मानसिक ताणला सामोरे जावे लागते. या साऱ्याचा शरीरावर आणि मनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असल्याचे अनेक मानसशास्त्रीय संशोधनातून आढळून आले आहे (How To manage mental Peace and thoughts in mind).
जेव्हा व्यक्ती अति विचार करते किंवा अधिक मानसिक श्रम घेते तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरावर व मनावर त्याचा परिणाम होतो. सततच्या मानसिक तणामुळे आपल्या भावनांवर, मानसिकतेवर याचा नकारात्मक परिणाम होतो. भीती, नैराश्य, ताण, यासारखे तसेच याहीपेक्षा गंभीर स्वरूपाचे विचार मनात घर करू लागतात. आणि त्याचे योग्य नियोजन न करता आल्याने व्यक्ती मानसिक आजाराला बळी पडते. त्यामुळे आपल्या भावनांचे योग्य पद्धतीने नियोजन करणे, त्या योग्य वेळी, योग्य व्यक्तीबरोबर, व योग्य प्रमाणात व्यक्त करणे अत्यंत आवश्यक असते.
(लेखिका समुपदेशक आहेत)
संपर्क - 8888304759
इमेल आयडी - Cmanasib01@gmail.com