Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > दिवसभराचा थकवा- ताण १० मिनिटांत गायब! महागड्या स्पापेक्षा भारी 'मिठाच्या पाण्याची थेरपी', लागेल शांत- गाढ झोप

दिवसभराचा थकवा- ताण १० मिनिटांत गायब! महागड्या स्पापेक्षा भारी 'मिठाच्या पाण्याची थेरपी', लागेल शांत- गाढ झोप

salt water therapy benefits: home spa therapy: natural stress relief remedies: घरच्या घरी सहज करता येणारी मिठाच्या पाण्याची थेरपी एक साधा, परिणामकारक पर्याय ठरू शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2026 11:32 IST2026-02-03T11:28:24+5:302026-02-03T11:32:08+5:30

salt water therapy benefits: home spa therapy: natural stress relief remedies: घरच्या घरी सहज करता येणारी मिठाच्या पाण्याची थेरपी एक साधा, परिणामकारक पर्याय ठरू शकतो.

how to do salt water therapy at home for stress relief salt water foot soak for deep sleep and relaxation natural remedies to reduce daily fatigue and tension home spa therapy better than expensive spa treatments | दिवसभराचा थकवा- ताण १० मिनिटांत गायब! महागड्या स्पापेक्षा भारी 'मिठाच्या पाण्याची थेरपी', लागेल शांत- गाढ झोप

दिवसभराचा थकवा- ताण १० मिनिटांत गायब! महागड्या स्पापेक्षा भारी 'मिठाच्या पाण्याची थेरपी', लागेल शांत- गाढ झोप

दिवसभराची धावपळ, कामाचा ताण आणि मानसिक थकवा यामुळे रात्री शांत झोप लागत नाही. ही समस्या आजकाल सामान्य बनली आहे. अनेकदा आपण थकवा घालवण्यासाठी महागड्या स्पा किंवा मसाज पार्लरचा विचार करतो.(salt water therapy benefits) सकाळपासून संध्याकाळपर्यंत सततची धावपळ, कामाचा ताण, जबाबदाऱ्या, मुलांची शाळा, डबे त्यांचा अभ्यास आणि मोबाईल-लॅपटॉपसमोर घालवलेला वेळ यामुळे शरीर अक्षरश: थकून जातं.(home spa therapy) दिवस संपेपर्यंत पाय जड वाटतात, डोकं भरल्यासारखं होतं आणि मन शांत होत नाही. अशावेळी आपल्याला महागड्या स्पा ट्रीटमेंट्सची आठवण येते, पण वेळ आणि खर्च परवडेलच असं नाही. पण घरच्या घरी सहज करता येणारी मिठाच्या पाण्याची थेरपी एक साधा, परिणामकारक पर्याय ठरू शकतो.(natural stress relief remedies)

हुक गंजल्यामुळे ब्लाऊजवर डाग पडलेत? सोप्या टिप्स, टेलरचा खर्च वाचेल- नवाकोरा ब्लाऊज खरेदी करण्याची गरज नाही

स्वयंपाकघरात मीठ हे केवळ चवीपुरता वापरलं जात नाही. तर त्यामध्ये शरीराला आराम देणारे गुणधर्म असतात. आयुर्वेदात फूट बाथ म्हणजे कोमट मिठाच्या पाण्यात पाय ठेवण्याच्या प्रक्रियेमुळे मन आणि शरीर शांत करण्यास मदत करते.

कोमट पाण्यात पाय घालण्याची योग्य वेळ ही संध्याकाळची मानली जाते. जे आपल्या शरीरातील जडपणा कमी करते आणि आपल्या मनाला आराम देते. यामुळे शरीर आणि मनातील ताण कमी होतो आणि संपूर्ण शरीराला आराम मिळतो. यामध्ये समुद्री मीठ किंवा दगडी मीठ मिसळा. कोमट पाण्यात १० ते १५ मिनिटे शांत पाय घालून बसा. आपल्या श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा. ही एक बॉडी डिटॉक्सची पद्धत आहे. जी आपल्या मज्जासंस्था स्थिर करते. 

कोमट पाण्यात पाय ठेवल्याने आपले शरीर हलके होते आणि मन शांत होते. यामुळे शरीरातील सौम्य वेदना आणि थकवा दूर होतो. यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि चांगली झोप येण्यासही मदत होते. कोमट पाण्यात पाय ठेवल्यामुळे जडपणा कमी होतो आणि आपल्याला रिलॅक्स वाटते. मीठाच्या पाण्यात पाय ठेवल्याने नसा मोकळ्या होण्यास मदत होतात. 

Web Title : नमक के पानी से तनाव और थकान को 10 मिनट में दूर करें

Web Summary : नमक के पानी में पैर डुबोकर दिन भर के तनाव को कम करें। यह घरेलू थेरेपी शरीर को शांत करती है, तनाव कम करती है, बेहतर नींद को बढ़ावा देती है और स्पा जैसे लाभ प्रदान करती है।

Web Title : Salt Water Therapy: Relieve Stress and Fatigue in 10 Minutes

Web Summary : Combat daily stress with a simple salt water foot soak. This home therapy relaxes the body, eases tension, promotes better sleep, and detoxifies, offering spa-like benefits.