Join us

कामाच्या ताणामुळे डिप्रेशन येतं? शिल्पा शेट्टी सांगते 'या' पद्धतीने भ्रामरी प्राणायाम करा- मिळतील ४ फायदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2025 15:52 IST

How to do Bhramari Pranayama: शिल्पा शेट्टी सांगते तिच्या मते भ्रामरी प्राणायाम म्हणजे अनेक आजारांवरचा रामबाण उपाय आहे. बघूया त्याचे नेमके कोणते फायदे होतात....(bhramari pranayama for mental health)

ठळक मुद्दे मनावरचा ताण कमी करून मानसिक आरोग्य सुधारण्यााठी भ्रामरी प्राणायाम करणे फायद्याचे ठरते.

हल्ली प्रत्येकाच्याच मागचा ताण खूप वाढला आहे. मग ते शाळकरी मुलं असो किंवा मग नोकरदार मंडळी असो. स्पर्धा प्रचंड वाढल्याने त्या स्पर्धेत स्वत:ला टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाचीच धडपड सुरू असते. त्याचा कधी कधी खूप ताण येतो. हा ताण सहन झाला नाही की आपली स्वत:वरच चीडचीड होते. कधी कधी प्रचंड नैराश्य येतं तर कधी कधी एन्झायटी वाढते. मनावरचा हा ताण पेलायचा कसा तेच अनेकांना कळत नाही. म्हणूनच अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने त्यावरचा एक खास उपाय सांगितला आहे (How to do Bhramari Pranayama?). तिच्या मते जर आपण नियमितपणे भ्रामरी प्राणायाम केलं तर स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी असे त्रास कमी होण्यास निश्चितच मदत होईल.(bhramari pranayama for mental health)

 

भ्रामरी प्राणायाम कसे करावे?

भ्रामरी प्राणायाम करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ बसा.

यानंतर दोन्ही हातांचे अंगठे कानामध्ये घालून कान बंद करा. यानंतर मधले बोट, अनामिका आणि करंगळी डोळ्यांवर ठेवून डोळे बंद करा. तसेच तर्जनी कपाळावर ठेवा.

तिशीनंतर प्रत्येक महिलेने खायलाच हवेत ५ पदार्थ- कॅन्सर, हार्ट ॲटॅकसह कित्येक आजारांचा धोका टळू शकतो

यानंतर जीभेचे टोक टाळूला लावा. डोळे बंद करा आणि मोठा श्वास घ्या. आता हळूहळू श्वास सोडत हुंकार द्या किंवा 'हंम्म्म' असा आवाज काढा. असं साधारण ५ ते १२ वेळा करावं.

 

भ्रामरी प्राणायाम करण्याचे फायदे

१. शिल्पा शेट्टी सांगते की भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे मेंदूला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळते.

२. अल्झायमरचा त्रास होऊ नये यासाठीही भ्रामरी प्राणायाम करणे फायद्याचे ठरते.

नवरात्रीत ९ दिवस उपवास करणार? ३ गोष्टी लगेच सुरू करा- उपवासाचा थकवा मुळीच येणार नाही

३. एन्झायटी, डिप्रेशन कम करण्यासाठी नियमितपणे भ्रामरी प्राणायाम करावे.

४. मनावरचा ताण कमी करून मानसिक आरोग्य सुधारण्यााठी भ्रामरी प्राणायाम करणे फायद्याचे ठरते.

 

टॅग्स :मानसिक आरोग्यशिल्पा शेट्टीयोगासने प्रकार व फायदे