Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > मुलं-घर-ऑफिस-डेडलाइन-टार्गेट या चक्रात फिरुन कंटाळलात? दमलेल्या आईसाठी ५ टिप्स- वेळ वाचेल आणि वाटेल फ्रेश

मुलं-घर-ऑफिस-डेडलाइन-टार्गेट या चक्रात फिरुन कंटाळलात? दमलेल्या आईसाठी ५ टिप्स- वेळ वाचेल आणि वाटेल फ्रेश

Handling kids-home-office-deadline-target at a same time? 5 tips for tired mothers - save time : ऑफीसला जाणाऱ्या महिलांनी लक्षात ठेवा या टिप्स, वाचवा वेळ.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2026 15:58 IST2026-01-23T15:56:51+5:302026-01-23T15:58:33+5:30

Handling kids-home-office-deadline-target at a same time? 5 tips for tired mothers - save time : ऑफीसला जाणाऱ्या महिलांनी लक्षात ठेवा या टिप्स, वाचवा वेळ.

Handling kids-home-office-deadline-target at a same time? 5 tips for tired mothers - save time | मुलं-घर-ऑफिस-डेडलाइन-टार्गेट या चक्रात फिरुन कंटाळलात? दमलेल्या आईसाठी ५ टिप्स- वेळ वाचेल आणि वाटेल फ्रेश

मुलं-घर-ऑफिस-डेडलाइन-टार्गेट या चक्रात फिरुन कंटाळलात? दमलेल्या आईसाठी ५ टिप्स- वेळ वाचेल आणि वाटेल फ्रेश

आजच्या युगात वर्कींग वुमन असणे अगदी कॉमन आहे. अनेक महिला घर, संसार, मुले सारे सांभाळून नोकरी करतात.  काम करणारी महिला म्हणजे एकाच वेळी अनेक भूमिका निभावणारी. ऑफिसची जबाबदारी, घरची कामे, स्वयंपाक, मुलांची काळजी, प्रवास हे सारे काही चुकत नाही. हे सांभाळून स्वतःसाठी थोडा वेळ हवाच.  त्यामुळे सगळं सांभाळताना वेळेचं व्यवस्थापन फार महत्त्वाचं ठरतं. थोडीशी शिस्त, तयारी आणि काही स्मार्ट सवयी रोजच्या धावपळीतून बराच वेळ वाचवतात.

ऑफिससाठी निघण्याची घाई टाळायची असेल तर सकाळची तयारी रात्रीच करुन ठेवावी. कपडे, बॅग, लॅपटॉप, चार्जर, ओळखपत्र यांची यादी करुन ती आधीच तयार ठेवली तर सकाळी गोंधळ होत नाही. शक्य असेल तर आठवड्याभरासाठी ऑफिसचे कपडे आधीच ठरवून ठेवावेत. यामुळे निर्णय घेण्याचा वेळही वाचतो. अगदी साधी गोष्ट वाटली तरी गडबड कमी होते.

जेवणाच्या बाबतीत नियोजन फार महत्त्वाचं आहे. आठवड्याचा मेनू आधी ठरवला तर रोज “आज काय करायचं?” या प्रश्नात वेळ जात नाही. भाज्या चिरुन, डाळी भिजवून फ्रिजमध्ये ठेवल्या तर स्वयंपाक झटपट होतो. कुकर, एअरफ्रायर, चॉपर यांसारखी साधनं वापरल्यास वेळ आणि मेहनत दोन्ही कमी लागतात. एकाच वेळी दोन पदार्थ बनवण्याची सवय लावली तर ऑफिसहून आल्यावर थकवा कमी जाणवतो. विविध गॅडझेट्स आता मिळतात त्यांचा वापर करा. 

घरची कामं एकटीने करण्याऐवजी ती वाटून घेणं गरजेचं आहे. घरातल्या प्रत्येकाला जबाबदारी दिली तर कामाचा ताण कमी होतो. रोज सगळं परफेक्ट करण्याच्या नादात न पडता, काही कामं आठवड्यातून एक-दोन वेळा केली तरी चालतात हे लक्षात घ्या. घर स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं असलं तरी स्वतः थकून नाही. घर ही सर्वांची जबाबदारी असते. 

प्रवासात वेळ वाचवण्यासाठी आधीच मार्ग आणि वेळेचं नियोजन करावं. ऑफिसच्या वेळा थोड्या बदलता येत असतील तर गर्दी टाळणाऱ्या वेळा निवडाव्यात. प्रवासादरम्यान पॉडकास्ट, ऑडिओबुक किंवा ऑफिसचे छोटे काम पूर्ण करता आले तर तो वेळही उपयोगात येतो.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी वेळ राखून ठेवणं. सगळं करताना स्वतःकडे दुर्लक्ष झालं तर थकवा, चिडचिड आणि कामाचा ताण वाढतो. रोज थोडा वेळ स्वतःसाठी ठेवला तर मानसिक शांतता मिळते आणि पुढचा दिवस अधिक नियोजनबद्ध जातो.
 

Web Title : थकी हुई कामकाजी माँ? समय बचाने, तरोताजा महसूस करने के लिए 5 युक्तियाँ

Web Summary : कामकाजी महिलाएं घर, बच्चे और काम संभालती हैं। भोजन की योजना बनाना, काम साझा करना और पहले से तैयारी करना समय बचाता है। यात्रा के समय का उपयोग करें और मानसिक कल्याण के लिए व्यक्तिगत समय निर्धारित करें, जिससे तनाव और थकान कम होगी।

Web Title : Tired Working Mom? 5 Tips for Time-Saving, Feeling Fresh

Web Summary : Working women juggle home, kids, and work. Planning meals, sharing chores, and preparing in advance saves time. Utilize travel time and schedule personal time for mental well-being, reducing stress and fatigue.