कोरोनाने आर्थिक अडचणीत आलेला जोडीदार आणि खचलेलं कुटुंब, कसं सावराल यातून? हे काही उपाय - Marathi News | financially distressed spouse and family, how to recover from lockdown problems .. Here are some solutions. | Latest sakhi News at Lokmat.com
>सुखाचा शोध > कोरोनाने आर्थिक अडचणीत आलेला जोडीदार आणि खचलेलं कुटुंब, कसं सावराल यातून? हे काही उपाय

कोरोनाने आर्थिक अडचणीत आलेला जोडीदार आणि खचलेलं कुटुंब, कसं सावराल यातून? हे काही उपाय

लॉकडाऊनमुळे झालेली आर्थिक कोंडी आता अनेकांसाठी जीवघेणी ठरते आहे. मागील दीड वर्षापासून सुरू असलेले हे लॉक-अनलॉकचे सत्र आणि त्यामुळे थांबलेले आर्थिक चक्र अनेक आत्महत्यांना कारणीभूत ठरले आहे. कोरोनामुळे ओढवलेल्या आर्थिक संकटापुढे नवरा हताश झाला असेल, तर सगळ्या घराचा भार बायकोवर येऊन पडतो. कुटूंब प्रमुखाची अडचण पाहून खचून गेलेले घर सावरायचे कसे, हे अनेकींना समजत नाही. म्हणूनच औरंगाबाद येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रश्मीन आचलिया यांनी सांगितलेले हे उपाय करून बघा आणि विस्कळीत होण्याआधीच आपले कुटूंब सावरून घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 03:59 PM2021-06-17T15:59:58+5:302021-06-17T16:43:46+5:30

लॉकडाऊनमुळे झालेली आर्थिक कोंडी आता अनेकांसाठी जीवघेणी ठरते आहे. मागील दीड वर्षापासून सुरू असलेले हे लॉक-अनलॉकचे सत्र आणि त्यामुळे थांबलेले आर्थिक चक्र अनेक आत्महत्यांना कारणीभूत ठरले आहे. कोरोनामुळे ओढवलेल्या आर्थिक संकटापुढे नवरा हताश झाला असेल, तर सगळ्या घराचा भार बायकोवर येऊन पडतो. कुटूंब प्रमुखाची अडचण पाहून खचून गेलेले घर सावरायचे कसे, हे अनेकींना समजत नाही. म्हणूनच औरंगाबाद येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रश्मीन आचलिया यांनी सांगितलेले हे उपाय करून बघा आणि विस्कळीत होण्याआधीच आपले कुटूंब सावरून घ्या.

financially distressed spouse and family, how to recover from lockdown problems .. Here are some solutions. | कोरोनाने आर्थिक अडचणीत आलेला जोडीदार आणि खचलेलं कुटुंब, कसं सावराल यातून? हे काही उपाय

कोरोनाने आर्थिक अडचणीत आलेला जोडीदार आणि खचलेलं कुटुंब, कसं सावराल यातून? हे काही उपाय

Next
Highlightsजागतिक स्तरावर प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार मागील २० वर्षाच्या तुलनेत या दिड वर्षात आत्महत्या होण्याचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहे.एनसीआरबीच्या अहवालानुसार दरदिवशी ३९ तरुण आणि २८ विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. हा मागील २५ वर्षांमधील सगळ्यात मोठा आकडा आहे.

कोरोना, लॉकडाऊन काळात ज्या आत्महत्या झाल्या, त्यातील बहुसंख्य आत्महत्या या आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे झाल्या आहेत. या काळात वाढलेले कौटुंबिक कलह, विविध कारणांमुळे आलेला एकटेपणाही आत्महत्येस कारणीभूत ठरला आहे. म्हणूनच आपल्या घरात, मित्रपरिवारात जर अशा नैराश्य आलेल्या व्यक्ती असतील, तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण एक स्त्री, एक पत्नी, आई किंवा एक मैत्रीण म्हणून तुम्ही उत्तम प्रकारे एखाद्याला समजून घेऊ शकता. 
मानसिक, भावनिक व शक्य असल्यास आर्थिक स्तरावरही त्यांना जमेल तसा आधार द्या आणि सगळ्यात आधी बदललेल्या वाईट परिस्थितीला त्या व्यक्ती जबाबदार आहेत, असे त्यांना दूषण देणे थांबवा. घरातल्या महिलेने जर पुढाकार घेतला तर नवऱ्यासकट अख्ख्या घराला या संकटातून बाहेर काढण्याची ताकद तिच्यामध्ये आहे, असे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. 

 

नैराश्य घालविण्यासाठी हे करा..

  • लहान मुलांसोबत वेळ घालवावा.
  • सकारात्मक गोष्टी पहाव्यात आणि ऐकाव्यात.
  • हा काळ लवकरच निघून जाईल, असे म्हणत स्वत:ला हिंमत देण्याचा प्रयत्न करावा.
  • अपघात, मृत्यू, आत्महत्या, आजार यासंदर्भात बोलणे आणि ऐकणे टाळा.

तुम्हाला जे आवडेल ते सॉफ्ट म्युझिक ऐका किंवा फक्त इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकण्यावर भर द्या.

नैराश्याची लक्षणे
कोरोनामुळे आज जगभरातच जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे प्रत्येकाची कोणत्या ना कोणत्या स्वरूपातली चिंता वाढली आहे. यामुळे वरवर जाणवत नसले, तरी अनेक व्यक्ती आतून खूप दुखावल्या  गेल्या आहेत. परिस्थितीने हताश झाल्या असून त्यांना नैराश्याने घेरले आहेे. सारखे- सारखे छातीत दुखणे, जीव घाबरणे, डोकेदुखी, निद्रानाश, नैराश्य, श्वास घ्यायला त्रास होणे, आपल्याच विचारात गुंग राहणे, असे मानसिक आजार जर तुम्हाला जाणवत असतील आणि सगळ्या टेस्ट करूनही जर तुमचे रिपोर्ट नॉर्मल येत असतील, तर तुम्ही मानसिक आजाराने त्रस्त आहात, असा त्याचा अर्थ होतो.   

 

कुटुंबाने घ्यावी काळजी
आपल्या कुटूंबात जर एखाद्या व्यक्तीला आर्थिक संकटामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे नैराश्य आले असेल, एकटेपणा जाणवत असेल, तर पुढील उपाय करून पहावेत, असे औरंगाबाद येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रश्मिन आचलिया यांनी सांगितले. 

 

  •  आपल्या कुटुंबातील व्यक्ती सध्या कोणत्या त्रासातून जात आहे, हे कुटुंबाला चांगल्याप्रकारे माहीत असते. त्यामुळे त्या व्यक्तीची मानसिकता समजून घ्या. त्याच्याशी विविध विषयांवर संवाद साधून त्याला बोलते करा.
  • त्याच्या सभोवतालचे वातावरण नेहमी प्रसन्न आणि समाधानी ठेवा.
  • घरात पैसा नसेल तर निश्चितच अनेक अडचणी उद्भवतात. पण असेल तेवढ्यात भागवू असे म्हणून रोजगार गेलेल्या जोडीदाराला भावनिक आधार द्या.
  •  सगळे जगच थोड्याफार फरकाने या अवस्थेतून जात आहे. त्यामुळे हा काळही बदलेल, असे वारंवार सांगून नैराश्यग्रस्त व्यक्तीला नवी उभारी देण्याचा प्रयत्न करा.
  • आर्थिक आणि मानसिकदृष्टीने खचलेल्या व्यक्तींना शक्यतो एकटे सोडू नका. मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेऊन त्यांचे समुपदेशन करून घ्या.

Web Title: financially distressed spouse and family, how to recover from lockdown problems .. Here are some solutions.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Easy Way to stay healthy : फक्त 'ही' २ योगासनं करून मेंटेन राहा; वाढत्या वयातही शिल्पा शेट्टीप्रमाणे फिट, परफेक्ट दिसाल - Marathi News | Easy Way to stay healthy : 2 easy yoga for 40 plus women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त 'ही' २ योगासनं करून मेंटेन राहा; वाढत्या वयातही शिल्पा शेट्टीप्रमाणे फिट, परफेक्ट दिसाल

Easy Way to stay healthy : जर काही कारणास्तव आपण तरूण वयात स्वत: साठी थोडा वेळ काढू शकत नसाल तर 45 पासून सुरुवात करणे देखील एक चांगली कल्पना आहे. ...

Food For Anemia : गंभीर आजारांचं कारण ठरतेय हिमोग्लोबिनची कमतरता; अंगातलं रक्त वाढवण्यासाठी रोज खा 'हे' पदार्थ - Marathi News | Food for iron deficiency anemia : Hemoglobin deficiency symptoms know how to prevent this deficiency | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आजारांचं कारण ठरतेय हिमोग्लोबिनची कमतरता; अंगातलं रक्त वाढवण्यासाठी रोज खा 'हे' पदार्थ

Food for iron deficiency anemia : हिमोग्लोबिन हे एक प्रकारचं प्रथिने आहे जे लाल रक्तपेशींमध्ये आढळतात, त्याच्या कमतरतेमुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. अशा परिस्थितीत अॅनिमिया रोगाचा धोका असू शकतो. ...

World Heart Day 2021: ....'या' कारणांमुळे एकदा नाही तर दोनदा येऊ शकतो हार्ट अटॅक; आजंच बदला ७ सवयी  - Marathi News | World Heart Day 202 : World heart day these lifestyle habits can lead to second heart attack know how to minimise the risk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : ....'या' कारणांमुळे एकदा नाही तर दोनदा येऊ शकतो हार्ट अटॅक; आजंच बदला ७ सवयी 

World Heart Day 2021: जीवनशैलीतील काही बदलांनी तुम्ही स्वतःला हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचवू शकता.  ...

FSSAI Tips : तुम्हीसुद्धा भेसळयुक्त मटार आवडीनं खाताय? FSSAI नं सांगितलं बनावट वाटाणे कसे ओळखायचे - Marathi News | FSSAI Tips : Try this simple experiment to test colour adulteration in green peas | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हीसुद्धा भेसळयुक्त मटार आवडीनं खाताय? FSSAI नं सांगितलं बनावट वाटाणे कसे ओळखायचे

FSSAI Tips : या भेसळयुक्त खाद्यपदार्थांना ओळखण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने ट्विटरवर #Detectingfoodadulterants नावाचा उपक्रम सुरू केला आहे.  ...

World Heart Day 2021: सावधान! तरूण महिलांमध्ये वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; डॉक्टरांनी सांगितली ७ कारणं - Marathi News | World Heart Day 2021: World heart day heart disease risk factors causes in young women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World Heart Day 2021: सावधान! तरूण महिलांमध्ये वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; डॉक्टरांनी सांगितली ७ कारणं

World Heart Day 2021: रोजच्या जगण्यातील काही चूका हृदयाच्या आजारांसाठी कारणीभूत ठरत आहेत.  ...

Daughter's Day 2021: पुरूष प्रधान संस्कृतीतूनही वेगळंपण सिद्ध करत यशाचं शिखर गाठणाऱ्या 'या' ८ महिला - Marathi News | Daughters day 2021 : 5 indian daughters who established themselves as achievers in male dominated zones | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Daughter's Day 2021: पुरूष प्रधान संस्कृतीतूनही वेगळंपण सिद्ध करत यशाचं शिखर गाठणाऱ्या 'या' ८ महिला

Daughter's Day 2021: प्रियंका चोप्रा जोनास सर्वात यशस्वी आणि प्रभावी अभिनेत्री, मॉडेल आणि चित्रपट निर्मात्यापैकी एक आहे. केवळ बॉलिवूडच नाही तर अभिनेत्रीने हॉलिवूडमध्येही स्वत: साठी विशेष ओळख निर्माण केली आहे. ...