Join us  

मनात हजार विचार-कामात लक्ष लागत नाही? ५ गोष्टी करा, मन-डोकं शांत राहील, आनंदी राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 7:23 PM

Easy Ways to Stop Overthinking (tan kasa kami karaycha) : ओव्हरथिंक केल्यानं खऱ्या आयुष्यात अस्तिवात नाहीत अशा गोष्टींबद्दल आपण जास्त विचार करतो.

कोणताही निर्णय घेण्याआधी आपण त्या गोष्टीवर खूप विचार करतो कधी कधी हे विचार अति प्रमाणात डोक्यात येत असतात ज्यामुळे रात्री नीट झोपही येत नाही. (Stress ghalvnyasathi upay) घरात किंवा ऑफिसमध्ये कोणी काही बोल्ले किंवा एखादी चूक झाली असेल याचा लोक इतका विचार करतात की त्यांना प्रत्यक्षात अस्तित्वात नसेलल्या समस्यांचेही टेंशन येऊ लागते. म्हणजेच ओव्हरथिंक केल्यानं खऱ्या आयुष्यात अस्तिवात नाहीत अशा गोष्टींबद्दल आपण जास्त विचार करतो. (How to Stop Overthinking Everything)

यातून काही साध्य होत नाही तर मानसिक ताण जास्त येतो. जास्त विचार केल्यामुळे चिंताग्रस्तता वाढते. आपण गरज नसताना एखाद्या गोष्टींची अति चिंता करतो. अशावेळी तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. ओव्हरथिंक रोखण्याचे सोपे उपाय पाहूया. या ५ गोष्टी रोज केल्या तर तुम्ही नकारात्कम वातावरणातून बाहेर येऊन कायम आनंदी आणि सकारात्मक राहाल. (Mental Health Tips)

१) रोज मेडिटेशन करा

नियमित सकाळी मेडिटेशन केल्यामुळे तुमच्या मनातील भिती कमी होईल आणि एखाद्या  गोष्टीवर व्यवस्थित लक्ष केंद्रीत करू शकता. ओव्हरथिंकींग टाळण्यासाठी  सकाळी लवकर उठून ५ ते १० मिनिटं एका जागी बसून ध्यान करा. सकाळच्यावेळी सकारात्मक उर्जा जास्त प्रमाणात असते. 

दात पिवळे झालेत-ब्रश केले की तेव्हढ्यापुरता चमकतात? ४ उपाय, पांढरेशुभ्र-स्वच्छ दिसतील दात

२) स्वत:वर प्रेम करा

कोणत्याही चुकीसाठी स्वत:ला दोष देणं बंद करा. जर तुमच्याकडून खरंच चूक झाली असेल तर ती सुधारण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा तशी स्थिती येणार नाही याची काळजी घ्या. चुका प्रत्येकाकडून होत असतात त्यामुळे एकाद्या  गोष्टीमुळे आपण वाईट आहोत-नेहमीच चुक करतो असं वाटून न घेता स्वत:ला माफ करून, आहात तसे स्वीकारा. यामुळे मन शांत राहण्यास मदत होईल. 

३) भितीचा सामना करा

अनेकदा गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर अससतात अशावेळी ओव्हरथिंक करणं टाळा. कोणत्याही पेच  प्रसंगातून बाहेर कसं पडायचं याचा विचार करा.  खूपच ताण येत असेल तर कुठेतरी देवदर्शनाला जा किंवा तुमच्या आवडत्या ठिकाणी फिरून या. ज्यामुळे रोजच्या रुटीनमधून बाहेर येऊन तुम्हला स्वत:ला वेळ देता येईल.

बारीक व्हायचंय पण डाएट नको वाटतं? जेवणात 'ही' डाळ खा; भराभर घटेल पोटाची चरबी-स्लिम दिसाल

४) दीर्घ श्वास घ्या

अनेकदा दीर्घ श्वसा घेतल्याने ध्यान करण्यापेक्षाही जास्त फायदा होतो. जास्त विचार करण्यापेक्षा तुम्ही दीर्घ श्वास घ्या.  यामुळे तुमचं मन शांत राहील आणि शरीराला आराम मिळेल. ज्यामुळे तुम्ही शांत चित्ताने विचार कराल आणि मन स्ट्राँग राहील.

५) आवडत्या लोकांशी बोलून प्रश्न सोडवा

जास्त विचार करण्याची  सवय तुम्हाला इतर चांगल्या गोष्टींपासून दूर नेते. जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर आपल्या फिलिंग्स जवळच्या कोणाशीतरी शेअर करा. यामुळे तुमच्या मनावरचा ताण कमी होईल.  तुम्हाला आवडत असेलल्या गोष्टी करा जसं की वाचन, डान्स, गाणी ऐकणं, या गोष्टी केल्यास तुमचं टेंशन घेणं कमी होईल. 

टॅग्स :मानसिक आरोग्य