आजच्या धावपळीच्या जीवनात स्ट्रेस (ताणतणाव) ही जवळजवळ प्रत्येकाचीच समस्या झाली आहे. कामाचा ताण, आर्थिक चिंता, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आरोग्याच्या समस्या किंवा सतत बदलणारी जीवनशैली यामुळे मनावर नकळत दबाव निर्माण होतो. या गोष्टींना सामान्य ताण सगळ्यांनाच असतो, त्यात काही काळजी करण्याचे कारण नाही. ( Do you feel like your head will explode due to excessive stress? try simple tricks, stay happy)सुरुवातीला हा ताण हलकासा वाटतो, पण दुर्लक्ष केल्यास तो मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो. असे व्हायला लागले की ताण सामान्य राहत नाही. म्हणूनच स्ट्रेसकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपाय करणे फार महत्त्वाचे आहे.
स्ट्रेस कशामुळे वाढतो?
स्ट्रेस वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात. सततचा कामाचा ताण, वेळेचे योग्य नियोजन न होणे, झोपेचा अभाव, अपेक्षांपेक्षा जास्त जबाबदाऱ्या, नातेसंबंधातील तणाव, आर्थिक अडचणी आणि सतत मोबाइल-सोशल मीडियाचा वापर यामुळे मन कायम अस्वस्थ राहते. काही वेळा मनात साठवून ठेवलेल्या भावना, भीती किंवा भविष्याची चिंता यामुळेही ताण वाढतो. हा ताण दीर्घकाळ राहिला तर डोकेदुखी, चिडचिड, थकवा, एकाग्रतेचा अभाव, पचनाचे त्रास आणि झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
स्ट्रेस कमी करण्यासाठी ५ सोपे उपाय
१. श्वसनावर लक्ष केंद्रित करादिवसातून काही मिनिटे खोल श्वसन केल्याने मन शांत होते. नाकाने खोल श्वास घेऊन काही सेकंद थांबा आणि तोंडाने हळूच सोडा. हे ५–१० वेळा केल्याने मेंदूला ऑक्सिजन मिळतो आणि ताण कमी होण्यास मदत होते.
२. नियमित हालचाल आणि व्यायाम करादररोज थोडं चालणं, योगासने किंवा साधे स्ट्रेचिंग केल्याने शरीरात आनंद देणारे हार्मोन्स तयार होतात. त्यामुळे मन हलकं होतं आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण येतं. तसेच मन रमले की वाईट विचारांचे प्रमाण कमी होते.
३. झोपेची काळजी घ्यापुरेशी आणि शांत झोप न मिळाल्यास स्ट्रेस अधिक वाढतो. रोज एकाच वेळी झोपण्याची सवय लावा, झोपण्यापूर्वी मोबाइल किंवा टीव्हीपासून दूर राहा. चांगली झोप मन आणि शरीर दोन्ही ताजंतवानं ठेवते.
४. मन मोकळं करास्ट्रेस असताना भावना मनात दाबून ठेवू नका. विश्वासू व्यक्तीशी बोला, लिहून काढा किंवा स्वतःसाठी थोडा वेळ काढा. मन मोकळं केल्याने ताण हलका होतो आणि उपाय सुचायला मदत होते.
५. स्वतःसाठी वेळ राखून ठेवादररोज काही वेळ स्वतःसाठी ठेवा. आवडतं संगीत ऐका, पुस्तक वाचा, ध्यान करा किंवा आवडती छोटी सवय जोपासा. अशा सवयी मनाला आनंद देतात आणि स्ट्रेसपासून थोडा ब्रेक मिळतो.
निष्कर्ष
स्ट्रेस हा आयुष्याचा भाग असला तरी त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. वेळेत ओळखून साधे, रोजच्या जीवनात सहज करता येणारे उपाय केल्यास ताणावर नियंत्रण ठेवता येतो. मन आणि शरीर दोन्ही निरोगी ठेवण्यासाठी स्वतःकडे लक्ष देणं हीच खरी गरज आहे. स्ट्रेस वाढतोय असं जाणवत असेल, तर आजच थांबा, स्वतःकडे पाहा आणि छोटे बदल करून मोठा फरक अनुभवा. अगदीच मन अस्वस्थ असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Web Summary : Stress is common, but ignoring it harms health. Manage stress with deep breathing, exercise, sleep, sharing feelings, and hobbies. Prioritize self-care; seek expert advice if needed.
Web Summary : तनाव आम है, लेकिन इसे अनदेखा करने से स्वास्थ्य को नुकसान होता है। गहरी सांस, व्यायाम, नींद, भावनाओं को साझा करने और शौक से तनाव का प्रबंधन करें। आत्म-देखभाल को प्राथमिकता दें; जरूरत पड़ने पर विशेषज्ञ की सलाह लें।