lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > Chocolate Day Special : द्या स्वतःलाच चॉकलेट गिफ्ट; म्हणा ‘मै अपनी फेवरिट हूं!’ चॉकलेट खाण्याचे 5 फायदे.. व्हा रोमँटिक

Chocolate Day Special : द्या स्वतःलाच चॉकलेट गिफ्ट; म्हणा ‘मै अपनी फेवरिट हूं!’ चॉकलेट खाण्याचे 5 फायदे.. व्हा रोमँटिक

Chocolate Day Special कुणीतरी आपल्याला चॉकलेट देईल अशी वाट कशाला पाहत बसायची, आपणच देऊया की आपल्यााला चॉकलेट गिफ्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 12:57 PM2022-02-09T12:57:30+5:302022-02-09T13:28:21+5:30

Chocolate Day Special कुणीतरी आपल्याला चॉकलेट देईल अशी वाट कशाला पाहत बसायची, आपणच देऊया की आपल्यााला चॉकलेट गिफ्ट

Chocolate Day Special: Give yourself a chocolate gift; Say ‘I am my favorite!’ 5 benefits of eating chocolate .. Be romantic | Chocolate Day Special : द्या स्वतःलाच चॉकलेट गिफ्ट; म्हणा ‘मै अपनी फेवरिट हूं!’ चॉकलेट खाण्याचे 5 फायदे.. व्हा रोमँटिक

Chocolate Day Special : द्या स्वतःलाच चॉकलेट गिफ्ट; म्हणा ‘मै अपनी फेवरिट हूं!’ चॉकलेट खाण्याचे 5 फायदे.. व्हा रोमँटिक

Highlightsतुम्ही नेहमी चॉकलेटच खाल्ले पाहिजे असे नाही तर चॉकलेट केक, चॉकलेट आईस्क्रीम, चॉकलेट ब्राऊनी, चॉकलेट बिस्कीट असे एकाहून एक प्रकार ट्राय करु शकता. ज्यांना सतत काही ना काही विसरण्याची सवय असते अशांनी आवर्जून चॉकलेट खायला हवे. 

व्हॅलेंटाईन्स वीकमधील आणखी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे चॉकलेट डे Choc0late Day. हा दिवस आणखी खास करायचा असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तीला चॉकलेट Chocolate द्यायलाच हवे. पण आपल्याला कोणीतरी चॉकलेट देईल याची वाट न पाहता आपणच आपल्याला चॉकलेट गिफ्ट केलं तर? आहे की नाही मस्त आयडीया, आपणही स्वत:चे आवडते असतोच की, मग स्वत:च स्वत:ला खूश करण्यासाठी ‘मै अपनी फेवरिट हूं!’ म्हणत आपणच आपल्या आवडीचे चॉकलेट आणून स्वत:ला गिफ्ट करुया की. यामुळे आपण आपले लाड तर करुच पण मनोमन खूश होऊ ते वेगळेच. सतत कोणीतरी आपल्यासाठी काही करेल अशी अपेक्षा करण्यापेक्षा आपणच एखादी छानशी गोष्ट आपल्यासाठी केली तर ती आपल्याला आतून आनंद दिल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.

तेव्हा या व्हॅलेटाईन्स वीकमध्ये Valentines week आपल्यासाठी खास अशा काही गोष्टी ट्राय करुन तर पाहा...आपले प्रेम असलेली व्यक्ती दुसरी कोणीतरी तर असतेच पण आपण स्वत:ही स्वत:वर प्रेम करु शकतोच की. मग या निमित्ताने स्वत:ला खूश करण्याची ही संधी अजिबात दवडू नका आणि हा प्रयोग नक्की करुन पाहा...आपल्याच बाबतीत आपण थोडे रोमँटीक झालो तर बिघडलं कुठं? रोजच्या धावपळीतून, ऑफीसच्या आणि घरच्या कामांच्या ताणातून याच गोष्टी आपल्या चेहऱ्यावर काही क्षणांसाठी का होईना आनंद घेऊन येऊ शकतात....  

चॉकलेट खाण्याचे एकाहून एक भन्नाट फायदे

१. चॉकलेटमध्ये असणारे एन्डोर्फीन आपल्या मनातील भावना जागृत करतात आणि त्यामुळे नकळत आनंदी भाव तयार होतात. त्यामुळे चॉकलेट खाल्ल्यानंतर काही काळासाठी का होईना आपण खूश राहतो. 

२. आपण सगळेच वेगवेगळ्या गोष्टींच्या ताणातून जात असतो. पण चॉकलेट खाल्ल्याने हा ताण काही वेळासाठी का होईना कमी होतो. अनेकांना ताण आल्यावर एखादे व्यसन करण्याची किंवा चहा-कॉफी घेण्याची सवय असते. या पर्यायांपेक्षा कधीतरी चॉकलेट खाणे केव्हाही चांगले. त्यामुळे तुम्ही नक्की रिलॅक्स होऊ शकाल. 

३. चॉकलेट ज्यापासून तयार होते त्या कोकोमध्ये अँटीऑक्सिडंटस असतात, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शरीराला अँटीऑक्सिडंटसची गरज असते. चॉकलेटमधून ते मिळत असल्याने कधीतरी चॉकलेट खायला हरकत नाही. 

४. मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी तसेच उत्तम स्मरणशक्तीसाठीही चॉकलेट अतिशय उपयुक्त असते. ज्यांना सतत काही ना काही विसरण्याची सवय असते अशांनी आवर्जून चॉकलेट खायला हवे. 

५. ज्यांना उच्च रक्तदाब, हृदयविकार आहे त्यांनी ठराविक कालावधीने चॉकलेटचे सेवन करायला हवे. त्यामुळे या दोन्ही तक्रारी दूर होण्यास मदत होते. यामध्ये तुम्ही नेहमी चॉकलेटच खाल्ले पाहिजे असे नाही तर चॉकलेट केक, चॉकलेट आईस्क्रीम, चॉकलेट ब्राऊनी, चॉकलेट बिस्कीट असे एकाहून एक प्रकार ट्राय करु शकता. 

Web Title: Chocolate Day Special: Give yourself a chocolate gift; Say ‘I am my favorite!’ 5 benefits of eating chocolate .. Be romantic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.