Join us

'आपण आहोतच छान हे इतर कोणी कशाला म्हणायला हवं', आपल्याकडे असलेल्या ९ गोष्टींसोबत असे करा सेलिब्रेशन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2022 14:02 IST

Celebrate With Yourself 9 Things to Stay Happy : इतरांची काळजी घेताना किंवा घरातल्यांसाठी, मित्रमंडळींसाठी सगळं करताना आपण स्वत:कडे लक्ष देणं विसरुन जातो.

ठळक मुद्देलैंगिक सुख मिळवण्यात लाज वाटणे किंवा अपराधी वाटण्यासारखे काहीही नाही. आर्थिक साक्षरता आणि लवचिकता तुम्हाला अनेक गोष्टींपासून वाचवते. पैसे कमावणे हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे ते आत्मसात करा.

नवरात्रीचा आज शेवटचा दिवस, उद्या दसरा झाला की देवीचा हा जागर संपेल. गेले ९ दिवस नवदुर्गा म्हणून आपण ज्या महिलांचे कोडकौतुक करत होतो तीचेही दैनंदिन आयुष्य सुरू होईल. इतरांनी आपल्याना मान द्यावा, कोडकौतुक करावे असे प्रत्येक स्त्रीला वाटते. पण हाच मान किंवा हेच कौतुक आपणच आपले केले तर? इतरांची काळजी घेताना किंवा घरातल्यांसाठी, मित्रमंडळींसाठी सगळं करताना आपण स्वत:कडे लक्ष देणं विसरुन जातो. मात्र असे न करता नवरात्रीच्या निमित्ताने नवरात्रीनंतर आपण स्वत:चे थोडे लाड करुया आणि स्वत:साठी काही गोष्टी आवर्जून करुया. हे सांगणारी एक पोस्ट प्रसिद्ध सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर यांनी शेअर केली आहे. महिलांसाठी ९ कठिण सत्य असे म्हणत त्यांनी ९ गोष्टींचा उल्लेख आपल्या या पोस्टमध्ये केला आहे. या गोष्टी आपण एरवी करत नाही, मात्र ठरवून स्वत:साठी करायला हव्यात असेच त्यांना या इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून सुचवायचे आहे. पाहूया त्या कोणत्या ९ गोष्टींबाबत आपल्याला सांगतात (Celebrate With Yourself 9 Things to Stay Happy). 

(Image : Google)

१. वाढते वय हे गिफ्ट आहे, त्याला अलिंगन द्या.

२. सौंदर्य हे प्रत्येक आकारात, वजनात असते त्यामुळे सुंदर वाटण्याची वाट पाहू नका.

३. जेवणाचा आनंद कसा घ्यावा हे माहित असलेल्या महिलांशी मैत्री करा.

४. आठवड्यातून एकदा तुमच्या आवडीचे स्पेशल पदार्थ बनवा.

५. स्वत:ची काळजी घेणे म्हणजे फक्त स्कीन केअर किंवा मसाज नाही तर थकण्यापासून स्वत:ची काळजी घेणे महत्त्वाचे.

६. आर्थिक साक्षरता आणि लवचिकता तुम्हाला अनेक गोष्टींपासून वाचवते. पैसे कमावणे हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे ते आत्मसात करा.

७. आपली झोप गमावण्यापेक्षा महत्त्वाचे कोणीही आणि काहीही नाही, त्यामुळे आपले झोपेचे रुटीन फॉलो करा. 

८. लैंगिक सुख ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे लैंगिक सुख मिळवण्यात लाज वाटणे किंवा अपराधी वाटण्यासारखे काहीही नाही. तुमच्या मुलभूत गरजांचा त्याग करण्यात कोणताही मोठेपणा नाही. 

९. एखाद्या गोष्टीला नकार देणे हे शक्तीशाली असण्याचे लक्षण आहे. त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटते ते करा.

टॅग्स :मानसिक आरोग्यनवरात्रीलाइफस्टाइल