Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > बाई गं, मा‍झ्या लक्षातच राहत नाही! पाहा बायका अनेक गोष्टी का विसरतात, बदाम खाऊनही फायदा नाही..

बाई गं, मा‍झ्या लक्षातच राहत नाही! पाहा बायका अनेक गोष्टी का विसरतात, बदाम खाऊनही फायदा नाही..

can't remember anything? See why women forget so many things, mental health tips : सतत विस्मरण होण्याची कारणे जाणून घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2026 17:57 IST2026-02-13T08:40:50+5:302026-02-16T17:57:47+5:30

can't remember anything? See why women forget so many things, mental health tips : सतत विस्मरण होण्याची कारणे जाणून घ्या.

can't remember anything? See why women forget so many things, mental health tips | बाई गं, मा‍झ्या लक्षातच राहत नाही! पाहा बायका अनेक गोष्टी का विसरतात, बदाम खाऊनही फायदा नाही..

बाई गं, मा‍झ्या लक्षातच राहत नाही! पाहा बायका अनेक गोष्टी का विसरतात, बदाम खाऊनही फायदा नाही..

कधी घराची किल्ली कुठे ठेवली आठवत नाही, तर कधी गाडीची हरवते. अगदी महत्त्वाची तारीख लक्षात राहत नाही किंवा नुकतीच झालेली चर्चा आठवत नाही. अशा वेळी लगेच मनात भीती निर्माण होते, हे काही गंभीर आजाराचे लक्षण तर नाही ना? मात्र प्रत्येक वेळी विस्मरण म्हणजे मोठा आजार असतोच असे नाही. अनेकदा त्यामागे साधी, दैनंदिन कारणेही असू शकतात. (can't remember anything? See why women forget so many things, mental health tips )तुम्ही लक्ष देत नाही असे लोकांना वाटते किंवा टाळाटाळ करता असेही वाटते. मात्र एखादी व्यक्ती मुद्दाम असं वागत नाही. त्यामुळे मुळात कारणं जाणून घेणे गरजेचं आहे.  

मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, सततचा ताण आणि मानसिक दडपण हे विस्मरणाचे प्रमुख कारण असू शकते. प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. चांदनी तुगनैत यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, मेंदूवर ताण वाढला की लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. जेव्हा आपण एखादी गोष्ट मन लावून ऐकत किंवा करत नाही, तेव्हा ती माहिती नीट साठवलीच जात नाही आणि नंतर आठवण्यात अडचण येते. म्हणजेच समस्या स्मरणशक्तीची नसून लक्ष न देण्याची असू शकते. हे मुद्दामच केलं जातं असं नाही. झोन आऊट होण्यामागे अनेक कारणे असतात. 

झोपेची कमतरता हे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. पुरेशी आणि शांत झोप न मिळाल्यास मेंदूला दिवसभरात मिळालेली माहिती व्यवस्थित साठवता येत नाही. त्याचप्रमाणे सतत मोबाइल आणि इतर गोष्टींचा अतिवापर स्मरणशक्ती कमी करतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी यंत्रांवर निर्भर राहणे टाळा. शारीरिक कारणेदेखील असू शकतात. शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता, थायरॉईडची समस्या, हार्मोन्समधील बदल किंवा मानसिक त्रास यामुळेही स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जर विस्मरण वारंवार होत असेल आणि दैनंदिन कामात अडथळा निर्माण करत असेल, तर वैद्यकीय तपासणी करुन घेणे योग्य ठरते.

तज्ज्ञ सांगतात की, स्मरणशक्ती टिकवण्यासाठी काही साध्या सवयी उपयुक्त ठरतात. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि ताण कमी करण्यासाठी ध्यान-प्राणायाम यांचा फायदा होतो. एकावेळी एकच काम करण्याची सवय लावणे आणि महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवणेही उपयोगी ठरते. टायमर लावा. कोणी काही सांगत असेल तर लक्ष द्या. 

म्हणूनच, विस्मरण म्हणजे नेहमीच गंभीर आजार असे समजण्याची गरज नाही. जीवनशैलीतील बदल, ताण आणि झोपेची कमतरता यांसारखी साधी कारणेही त्यामागे असू शकतात. मात्र लक्षणे वाढत असतील किंवा व्यक्तिमत्वात बदल जाणवत असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य काळजी घेतली, तर स्मरणशक्ती चांगली राखता येते आणि मनही अधिक स्थिर राहते.

Web Title : महिलाएं क्यों भूल जाती हैं: कारण, समाधान और चिंता कब करें

Web Summary : महिलाओं में भूलने की बीमारी तनाव, नींद की कमी या विटामिन की कमी के कारण हो सकती है। नींद को प्राथमिकता दें, तनाव का प्रबंधन करें, और लगातार समस्याओं के लिए चिकित्सा सलाह लें। साधारण जीवनशैली में बदलाव अक्सर स्मृति को बेहतर बनाने में मदद करते हैं।

Web Title : Why Women Forget Things: Causes, Solutions, and When to Worry

Web Summary : Forgetfulness in women can stem from stress, lack of sleep, or vitamin deficiencies. Prioritize sleep, manage stress, and consider medical advice for persistent issues. Simple lifestyle adjustments often help improve memory.