Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाकावर सतत राग- सारखी चिडचिड होते? करा ५ गोष्टी, एका श्वासाने तुमचं मन होईल शांत- ताणही कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2026 09:30 IST

Anger control tips: Breathing exercises: Stress relief techniques: आपण रोज नियमितपणे काही ब्रीदिंग एक्सरसाइज केल्यास आपल्याला रागावर नियंत्रण मिळवता येईल.

कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि भविष्याची चिंता या सगळ्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. बऱ्याचदा आपल्याला जाणवते की छोट्या-छोट्या गोष्टींवरुन आपली चिडचिड होते. कोणाशी तरी विनाकारण वाद होतात किंवा नाकावर कायमच राग असतो.(Anger control tips) हे आपल्या स्वभावाची पद्धत नसून आपल्या शरीराने दिलेला एक अलार्म सिग्नल आहे, ज्यात आपले मन शांत नाही. सततची चिडचिड आणि राग आपल्या रक्तदाबावर परिणाम करतात. ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठीही ते घातक ठरू शकतात.(Breathing exercises)जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपल्या श्वासाची गती अनियंत्रित होते. मन चलबिचल होते आणि आपण विचार न करता प्रतिक्रिया देतो.(Stress relief techniques) पण आपल्या श्वासावर नियंत्रण मिळवणे हाच राग शांत करण्याचा सगळ्यात मोठा मार्ग आहे. आपण रोज नियमितपणे काही ब्रीदिंग एक्सरसाइज केल्यास आपल्याला रागावर नियंत्रण मिळवता येईल. 

उंची कमी दिसण्याची भीती विसरा! कॉलेज- ऑफिसला जाताना घाला ५ प्रकारचे टॉप्स- दिसाल स्मार्ट आणि स्टायलिश

राग आणि चिडचिड या आपल्या भावना असल्या तरी त्या शरीरातील कोर्टिसोल या स्ट्रेबस हार्मोनमुळे वाढतात. श्वासावर लक्ष केंद्रित केल्यास हे हार्मोन्स संतुलित होतात. खालील ५ पद्धती तुम्हाला त्वरित मानसिक शांती मिळवून देतील. 

1. ४-७-८ ब्रीदिंग तंत्र. यात ४ सेकंद नाकाने श्वास घ्या, ७ सेकंद तो रोखून धरा आणि ८ सेकंद तोंडातून हळूवार सोडा. यामुळे आपली मज्जासंस्था शांत होते आणि झटपट राग निवळतो. 

2. जेव्हा आपले मन संतुलित करण्यासाठी अनुलोम-विलोम प्राणायम करा. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. मग डावी नाकपुडी बंद करून उजव्या बाजूने श्वास सोडा. यामुळे मेंदूच्या दोन्ही भागांना ऑक्सिजन मिळतो आणि चिडचिड कमी होते.

3. आपले मन खूप चलबिचल असते तेव्हा भ्रामरी प्राणायाम करा. दोन्ही कान अंगठ्याने बंद करा, डोळ्यांवर बोटे ठेवा आणि श्वास सोडताना भुंग्यासारखा 'ॐ' म्हणा. या कंपनांमुळे डोकं शांत होतं आणि रागाची तीव्रता कमी होते.

4. तणाव आल्यामुळे बॉक्स ब्रीदिंग करा. ४ सेकंद श्वास घ्या, ४ सेकंद रोखा, ४ सेकंद सोडा आणि पुन्हा ४ सेकंद श्वास न घेता थांबा. यामुळे एकाग्रता वाढते आणि मनातील विचारांचा गोंधळ थांबतो. 

5. बहुतेक लोक छातीतून श्वास घेतात, पण पोटाने श्वास घेणे अधिक फायदेशीर असते. एक हात पोटावर ठेवा. श्वास घेताना पोट फुगले पाहिजे आणि सोडताना आत गेले पाहिजे. यामुळे शरीराला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतो आणि 'फाईट ऑर फ्लाईट' मोड शांत होतो.  

English
हिंदी सारांश
Web Title : Control anger and irritation: 5 breathing exercises for instant calmness.

Web Summary : Manage stress-induced anger with breathing techniques. The 4-7-8 method, Anulom Vilom, Bhramari, box breathing, and diaphragmatic breathing can help calm the mind and reduce irritation by balancing hormones and improving oxygen flow.
टॅग्स :मानसिक आरोग्य