Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > तुम्हाला फार टेंशन आलंय, काहीच धड होत नाही? रोहित शर्माचा हा सल्ला वाचा, आणि हसा मनापासून कारण..

तुम्हाला फार टेंशन आलंय, काहीच धड होत नाही? रोहित शर्माचा हा सल्ला वाचा, आणि हसा मनापासून कारण..

Are you feeling very tense, not getting anything done? Read this advice from Rohit Sharma, and smile from the heart because : रोहित शर्माचा खास संदेश. हसत राहा कारण आयुष्य सुंदर आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2025 15:15 IST2025-12-11T15:09:00+5:302025-12-11T15:15:25+5:30

Are you feeling very tense, not getting anything done? Read this advice from Rohit Sharma, and smile from the heart because : रोहित शर्माचा खास संदेश. हसत राहा कारण आयुष्य सुंदर आहे.

Are you feeling very tense, not getting anything done? Read this advice from Rohit Sharma, and smile from the heart because.. | तुम्हाला फार टेंशन आलंय, काहीच धड होत नाही? रोहित शर्माचा हा सल्ला वाचा, आणि हसा मनापासून कारण..

तुम्हाला फार टेंशन आलंय, काहीच धड होत नाही? रोहित शर्माचा हा सल्ला वाचा, आणि हसा मनापासून कारण..

तुम्हीही ओव्हथिंकिंग करता का? लहानसहान गोष्टीतही हृदयाची ध़़डध़ड वाढते? आयुष्यात पुढे काय होणार या चिंतेत असता? मुळात या गोष्टी फक्त नैराश्यामुळेच घडतात असे नाही. किंवा एखादा मानसिक आजारच असायला हवा असे नाही. डोक्यात असे असंख्य विचार असणे अगदीच सामान्य आहे. पण त्याचा किती त्रास करुन घ्यायचा. त्यातून बाहेर कसे यायचे हे जाणून घेणेही महत्त्वाचेच. आपले विचार आपल्या यशाच्यामध्ये येत असतील तर नक्कीच ही गोष्टी वाईट आहे. (Are you feeling very tense, not getting anything done? Read this advice from Rohit Sharma, and smile from the heart because..)वेळीच काहीतरी करायला हवे. हळूहळू नैराश्य वाढते आणि मग त्याचे रुपांतर मानसिक ताणतणावात होते. अनेक जण मेंटल हेल्थ बद्दल मार्गदर्शन करत असतात. तरुणपिढीचा लाडका हिटमॅनही मेंटली स्ट्रॉँग प्लेअर म्हणून ओळखला जातो. लोकांचे टोमणे असो किंवा एखादा पराभव असो, रोहित शर्मा कायम हसतमुख आणि उत्साहीच दिसतो. आयुष्यात आनंदी राहण्यासाठी विचारधारणा कशी असावी याबद्दल बोलताना रोहितने फार मोलाचा सल्ला दिला. 

रोहित म्हणतो, "आयुष्यात काहीही होवो, सरतेशेवटी आपल्याला जगावे लागतेच. हार मानून चालत नाही. असे तसे रडतकुढत नाही तर हसत जगावे लागते. जे झाले त्यावर रडण्यापेक्षा येऊ घातलेल्या गोष्टींसाठी तयार होणे महत्वाचे असते. जिंकण्याच्या आनंदापेक्षा पराभवाचे दुःख पचवून दिवसाचा शेवट हास्याने करणे जास्त कठीण असते. पण जर ते तुम्हाला जमले तर त्यासारखी सुंदर गोष्ट नाही. कारण रोजच यश मिळत नाही. अपयश पचवावेच लागते आणि ते पचवता आलेच पाहिजे. "

आपल्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट मिळेलच असे नाही पण ती न मिळणे म्हणजे आयुष्य संपले असे नसते. इतरही अनेक गोष्टी आहेत. त्यांचा आदर करा. एका वाईट प्रसंगामुळे इतर पन्नास चांगल्या गोष्टी का दुर्लक्षित करायच्या? दिवसभर जे काही घडेल ते पचवण्याची क्षमता निर्माण करा. चांगला दिवस वाईट दिवस आयुष्यात असतातच शेवट मात्र एका सुंदर गोड अशा हास्याने करता आले म्हणजे माणूस नक्कीच यशस्वी होतो. रोहितचा हा सल्ला सगळ्यांसाठीच फार मोलाचा आहे. जर तुम्हीही आज हसला नसाल तर आता हसा. हसण्याने समस्या सुटत नाही पण त्यातून बाहेर पडण्याचे बळ नक्कीच मिळते. 


Web Title : तनाव महसूस कर रहे हैं? रोहित शर्मा की सलाह: जीवन में मुस्कुराते रहें

Web Summary : हिटमैन रोहित शर्मा सफलता या विफलता की परवाह किए बिना, जीवन को मुस्कुराहट के साथ अपनाने की सलाह देते हैं। वह असफलताओं को स्वीकार करने, सकारात्मक पर ध्यान केंद्रित करने और लचीलापन बनाने और सफलता प्राप्त करने के लिए प्रत्येक दिन को मुस्कुराहट के साथ समाप्त करने के महत्व पर जोर देते हैं।

Web Title : Feeling Tense? Rohit Sharma's Advice: Smile Through Life's Ups and Downs

Web Summary : Hitman Rohit Sharma advises embracing life with a smile, regardless of success or failure. He emphasizes the importance of accepting setbacks, focusing on the positive, and ending each day with a smile to build resilience and achieve success.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.