Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > हाताची घडी-तोंडावर बोट, मारा इग्नोर टाळा भांडण! कितीही संताप आला तरी ‘यावेळी’ बोलू नका, वाचा रोज जिंकण्याचा मंत्र

हाताची घडी-तोंडावर बोट, मारा इग्नोर टाळा भांडण! कितीही संताप आला तरी ‘यावेळी’ बोलू नका, वाचा रोज जिंकण्याचा मंत्र

7 Times Keep Silent at All Cost: जुनी वडीलधारी माणसं नेहमी सांगतात की काही काही प्रसंगी आपण कितीही इच्छा झाली तरी मौन बाळगलं पाहिजे. ते प्रसंग नेमके कोणते ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2026 16:49 IST2026-01-21T12:56:05+5:302026-01-21T16:49:47+5:30

7 Times Keep Silent at All Cost: जुनी वडीलधारी माणसं नेहमी सांगतात की काही काही प्रसंगी आपण कितीही इच्छा झाली तरी मौन बाळगलं पाहिजे. ते प्रसंग नेमके कोणते ते पाहा...

7 times keep silent at all cost to maintain peace and for healthy relations | हाताची घडी-तोंडावर बोट, मारा इग्नोर टाळा भांडण! कितीही संताप आला तरी ‘यावेळी’ बोलू नका, वाचा रोज जिंकण्याचा मंत्र

हाताची घडी-तोंडावर बोट, मारा इग्नोर टाळा भांडण! कितीही संताप आला तरी ‘यावेळी’ बोलू नका, वाचा रोज जिंकण्याचा मंत्र

Highlightsनंतर पश्चाताच करत बसण्यापेक्षा बोलतानाच वेळ पाहून आणि थोडं सांभाळून बोललं तर बरेच प्रश्न शांततेत मार्गी लागू शकतात.....

बऱ्याचदा असं होतं की एखाद्या प्रसंगी आपण मध्येच काहीतरी बोलून जातो आणि मग त्यानंतर आपल्या सभोवतालचं वातावरण त्यामुळे पुर्णपणे बदलून जातं. आपण असं का बोललो, आपण थोडं शांत बसायला हवं होतं असं नंतर सारखं आपल्याला वाटायला लागतं. पण नंतर असं वाटून काहीही इलाज नसतो. असं आधी बोलून नंतर पश्चाताच करत बसण्यापेक्षा बोलतानाच वेळ पाहून आणि थोडं सांभाळून बोललं तर बरेच प्रश्न अगदी शांततेत मार्गी लागू शकतात. म्हणूनच तर आपल्याकडे अशी म्हणही आहे की 'तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे...' आता हे उगी राहाणं म्हणजे शांत बसणं नेमकं केव्हा करावं ते पाहा...(7 times keep silent at all cost to maintain peace and for healthy relations)

 

कोणकोणत्या प्रसंगी मौन बाळगणं जास्त महत्त्वाचं आहे?

१. ज्यावेळी आपल्याला खूप भयंकर राग आलेला असतो, त्याप्रसंगी काहीही बोलू नये. कारण रागाच्या भरात आपण खूप जास्त आणि चुकीच्या गोष्टी बोलतो ज्या बोलायला नको होत्या असं आपल्याला नंतर कायम वाटतं.

२. जेव्हा तुम्हाला एखादी घटना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पुर्णपणे माहिती नसते, तेव्हा त्यावर कोणतंही मत देऊ नका.

रव्याचं धिरडं रेसिपी, नाश्त्यासाठी हलका- फुलका पदार्थ, वेटलॉस करणाऱ्या मंडळींसाठीही परफेक्ट मेन्यू.. 

३. जर तुमच्या शांत बसण्याने एखादं नात टिकून राहणार असेल तर अशावेळी स्वत:ला आवरा, भावना कंट्राेलमध्ये ठेवा आणि शांत बसा. आपल्या बोलण्याने  नाती तुटणार नाहीत, माणसं दुरावणार नाहीत याची काळजी घ्या.

४. जर बोलताना तुमचा आवाज चढणार नाही, तुम्ही आरडाओरडा करणार नाही, शांतपणे तुमचं म्हणणं मांडू शकाल, अशी जेव्हा स्वत:बद्दल खात्री असेल तेव्हाच बोला. नाहीतर शांत राहा.

 

५. एखाद्याची एक बाजू ऐकून लगेच त्यावर रिॲक्ट करू नका. प्रत्येक गोष्टीच्या दोन्ही बाजू आधी ऐका आणि मगच तुमचं मत मांडा. 

६. जर समोरची व्यक्ती खूप चिडलेली असेल, तर तिला काहीही सांगायला जाऊ नका. त्या व्यक्तीला आधी शांत होऊ द्या आणि मगच तुमचं मत मांडा.

राणी मुखर्जी सांगते जेन अल्फा पिढीच्या लेकीला सांभाळण्याची कसरत, म्हणाली मी तिला खूप घाबरते कारण....

७. समोरच्या माणसाला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, याचा अंदाज घेतल्याशिवाय कधीही बोलू नका. तुमच्या बोलण्याने कदाचित त्याची मतं बदलू शकतात. किंवा तुम्ही अनपेक्षितपणे काहीतरी बोलल्यास परिस्थिती जास्त बिघडू शकते. 

 

Web Title : चुप रहना है सोना: कब चुप रहने से बड़े झगड़े टलते हैं।

Web Summary : गुस्से में, अनजान होने पर, या चुप रहने से रिश्ते बने रहते हैं तो बोलने से बचें। शांति से बोलें, सभी पक्षों को सुनें और बोलने से पहले अपेक्षाओं को मापें। कब चुप रहना है यह जानने से संघर्ष टलते हैं और सद्भाव बना रहता है।

Web Title : Silence is golden: Times when keeping quiet prevents big arguments.

Web Summary : Avoid speaking when angry, uninformed, or if silence preserves relationships. Speak calmly, listen to all sides, and gauge expectations before talking. Knowing when to be quiet prevents conflicts and maintains harmony.