Lokmat Sakhi >Mental Health > रोज धूप लावण्याचे ४ फायदे, पूजेलाच नाही तर रोज सायंकाळी लावा धूप-घरात वाटेल प्रसन्न

रोज धूप लावण्याचे ४ फायदे, पूजेलाच नाही तर रोज सायंकाळी लावा धूप-घरात वाटेल प्रसन्न

4 benefits of using dhoop daily , it is special not only for puja but also for health : रोज धूप घरात लावणे आरोग्यासाठी चांगले. पाहा कारणे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2025 16:36 IST2025-08-25T16:35:28+5:302025-08-25T16:36:48+5:30

4 benefits of using dhoop daily , it is special not only for puja but also for health : रोज धूप घरात लावणे आरोग्यासाठी चांगले. पाहा कारणे.

4 benefits of using dhoop daily , it is special not only for puja but also for health | रोज धूप लावण्याचे ४ फायदे, पूजेलाच नाही तर रोज सायंकाळी लावा धूप-घरात वाटेल प्रसन्न

रोज धूप लावण्याचे ४ फायदे, पूजेलाच नाही तर रोज सायंकाळी लावा धूप-घरात वाटेल प्रसन्न

धूप लावणे ही केवळ एक पद्धत नसून आरोग्य आणि पर्यावरण शुद्ध ठेवण्याचा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. आपल्या आजी-आजोबांच्या काळापासून प्रत्येक सकाळी किंवा संध्याकाळी घरात धूप लावण्याची पद्धत चालत आली आहे. धूपामध्ये वापरले जाणारे घटक अनेक नैसर्गिक औषधी गुणांनी परिपूर्ण असतात. त्यामुळे त्याचा फायदा आरोग्यासाठी होतो. (4 benefits of using dhoop daily , it is special not only for puja but also for health )या धूपाच्या धुरामध्ये जंतुनाशक व कीटकनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे घरात धूप लावावा असे म्हटले जाते. हवेतले हानिकारक जंतू, बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट करण्यासाठी धूपाचा फायदा होतो. हवेची शुद्धता होतेच शिवाय दमा, सर्दी, श्वसनाच्या समस्या कमी होण्यास मदत होते. धूपाच्या सौम्य सुगंधामुळे मन शांत होते, चिंता कमी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे मानले जाते. त्यामुळे संध्याकाळी आणि सकाळी घरातील प्रसन्नता वाढवण्यासाठी धूप लावतात. 

धूपाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे तो नैसर्गिक कीटकनाशकाचे काम करतो. डास, माश्या, मुंग्या आणि इतर छोटे किटक धूपाचा धूर सहन करू शकत नाहीत, त्यामुळे ते घरापासून दूर पळतात. आजकाल बाजारात मिळणाऱ्या रासायनिक अगरबत्त्या किंवा स्प्रे यांचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, पण पारंपरिक धूप पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे तो शरीरासाठी सुरक्षित असतो. शिवाय त्यात असलेले औषधी घटक वातावरणात पसरले की घरातील उग्र वास नाहीसा होतो आणि हवेत ताजेपणा येतो. 

आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव वाढलेले असताना धूप लावल्यामुळे मन प्रसन्न राहते, ध्यान आणि प्रार्थना करण्यास एकाग्रता मिळते. त्यामुळे धूप लावणे हा केवळ श्रद्धा आणि धार्मिक विधीचा भाग नसून तो आरोग्य, स्वच्छता, मानसिक शांतता आणि घरातल्या उर्जेचा समतोल राखण्यासाठी एक अमूल्य असा सोपा उपाय आहे. त्यामुळे यंदा गणपतीला घरी छान सुगंधी धूपही लावा. घरी धूप तयार करणे अगदी सोपे आहे. त्यामुळे विकतचाच आणायला हवा असे नाही. घरीच तयार करुन वापरणे जास्त फायद्याचे ठरते. 

Web Title: 4 benefits of using dhoop daily , it is special not only for puja but also for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.