Meet Uganda girl leah-namugerwa-climate-activist, an African greta-thunburg | युगांडातली 14 वर्षाची लिह , ठरतेय मागास देशातली ग्रेटा आणि विचारतेय, आमचा वाटा कुठं हाय ओ.?

युगांडातली 14 वर्षाची लिह , ठरतेय मागास देशातली ग्रेटा आणि विचारतेय, आमचा वाटा कुठं हाय ओ.?

ठळक मुद्देमुलांच्या भवितव्यासाठी मुलं भांडणार नाहीत तर कोण भांडेल?

-शिल्पा दातार-जोशी

लिह  नामुगेरवा. असं तिचं नाव आहे. तिला  युगांडाची ग्रेटा थनबर्ग असं म्हणता येईल पण तसं म्हणू नये  कारण तिचीही स्वतंत्न ओळख आहे.वयाच्या च्दा-पंधराव्या वर्षी तिनं सहविद्याथ्र्याच्या मदतीनं हवामान बदलाबाबत सरकारला, मोठ्या माणसांना धारेवर धरलं.  मात्र अजूनही तिच्या देशात अंधश्रद्धा इतकी आहे, की ती जेव्हा पर्यावरण वाचवण्यासंदर्भात शिक्षकांशी बोलते, तेव्हा ते शिक्षक म्हणतात, ‘‘आपल्या हातात काय आहे? ‘त्याच्या’ कोपामुळंच सगळं घडतंय!’’
शिक्षकच असं म्हणतात हे पाहून तिला वाइट वाटतं. पण म्हणून ती थांबत नाही. प्रगत देश आणि मागास आफ्रिका यांच्यातील आर्थिक दरीबरोबर मानसिक दरीचाही मोठा प्रश्न आहे. आफ्रिका खंड सध्या टोकाचा पाऊस आणि टोकाचा दुष्काळ या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सहन करतोय. युगांडा या तिच्या देशात अतिवृष्टीची भीती लोकांना आहे, तर केनियासारख्या झेब्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या देशात आता दुष्काळाच्या झळांमुळे त्या प्राण्याची जातच नामशेष होण्याची भीती आहे. वाईट हवामानाचा दुष्परिणाम पिकांवर होऊन अनेक आजार पसरणं, बालमृत्यू, कुपोषण.. 


युगांडा हा देश किती तरी काळ हे सगळं सहन करतोय. काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन पिकं, झाडं हातची जातात. हे सगळं तिच्या अंतर्मनात कुठंतरी होतंच. तिला वाटलं, याविषयी मोठ्या माणसांशी बोलून काहीच उपयोग नाही. माझ्यासारख्या तरूणांनाच आता पर्यावरणाचा नाश करणार्‍या गोष्टींच्या विरोधात उतरायला हवं. त्यासाठी तिनं क्लासेसच्या बाहेर वृक्षारोपण कार्यक्र म राबवले. प्लास्टिक बंदीबाबत याचिका दाखल केली. 
चौदा वर्षीय लिह  नामुगेरवाला एक प्रश्न पडला की येत्या काळात माणसं बंदुकीच्या गोळ्यांनी मृत्युमुखी पडणार नाहीत; पण निसर्गाच्या र्‍हासामुळे बळी पडतील.
तिच्या हातातला एक बॅनर फार बोलका आहे. त्यावर लिहिलेलं असतं, ‘क्लायमेट जस्टीस’. आता ती क्लायमेट अ‍ॅक्टिव्हिस्ट म्हणून ओळखली जाते. अलिकडेच तिनं रवांडा, केनिया, स्वित्झर्लंडही गाठलं. तिच्या गमबुटांवर एक वाक्य आहे- मला माझ्या पिढीला हवामान बदलाबाबत जागृत करायचंय. हा बदल आम्हीच घडवला पाहिजे.’ 


 तिचे वडील व काका पर्यावरणवादी आहेत. हवामान बदलाच्या मूळ कारणांचा तिनं अभ्यास करायला सुरु वात केली. त्याबाबत ट्विट करताना युगांडाच्या अध्यक्षांनाही टॅग केलं. नवीन पर्यावरणावादी धोरणांबाबत आग्रह धरला. युगांडाच्या सरकारने प्लॅस्टिक पिशव्या बंद करण्याचा निर्णय घेतला, पण अंमलबजावणी केली नाही. तिनं पाठपुरावा सुरुच ठेवला. 
तिच्या कामाबद्दल तिला अम्नीस्टी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क पुरस्कार मिळालाय. 

Web Title: Meet Uganda girl leah-namugerwa-climate-activist, an African greta-thunburg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.