Kareena Kapoor 's diet secret? shares Rujuta diwekar 8 meals diet plan. | करीना कपूर आखीर खाती क्या है?- ऋजुता दिवेकर सांगतेय, तिच्या डाएटचं सिक्रेट!
करीना कपूर आखीर खाती क्या है?- ऋजुता दिवेकर सांगतेय, तिच्या डाएटचं सिक्रेट!

ठळक मुद्देदर दोन तासांनी थोडं खा, मस्त दिसा!photo credit - FOTOCORP

- सखी ऑनलाइन टीम

 करीना कपूर पडद्यावर जेव्हा जेव्हा दिसते, तिच्या स्किनचा ग्लो, तिची परफेक्ट फिगर पाहून आपल्यालाच प्रश्न पडतो की, एका लेकाची आई झाली तरी ही इतकी सुंदर कशी दिसते. ‘खाती क्या है?’ त्याच प्रश्नाचं उत्तर तिची स्टार डायटिशियन ऋजुता दिवेकरने एका फेसबूक पोस्टमध्ये दिलं आहे. नुसतं उत्तरच नाही तर करीनाचा फुल डाएट प्लॅन दिला आहे. दिवसभरात ती कधी कधी काय काय खाते, पिते याचा तक्ताच आता ऋजुताने हातात ठेवला आहे. प्रश्न एवढाच आहे की, करीनासारख्या ग्लोसाठी आपल्याला तो डाएट प्लॅन फॉलो करता येईल का? अर्थात करीनासारखी स्किन, ग्लो आणि फिगर हवी तर एवढं तर करावंच लागेल. घ्या मग त्यासाठी वाचा हा प्लॅन.

ऋजुता आपल्या पोस्टमध्ये सांगतेय की, गेल्याच आठवडय़ात करीना ‘दिला दो घर चंदीगड में’ या गाण्याचं शुटिंग करत होती आणि त्याकाळात हा तिचा डाएट प्लॅन होता. दर दोन तासांनी थोडं थोडंच खायचं हा ऋजुताचा मूलमंत्र अगदी मनोभावे स्वीकारणारी करीनाही तेच करताना दिसते आहे.
त्यानुसार सकाळी उठल्यावर करीना भिजवलेले मनुके केसर घालून खाते.
मग त्यानंतर दोन तासानं पराठा चटणी.

त्यानंतर दोन तासांनी सब्जाचं बी घालून नारळपाणी पिते.
दुपारी जेवायला दहीभात-पापड.
मग दोन तासांनी अक्रोड आणि चीज.

त्यानंतर दोन तासांनी बनाना मिल्कशेक.
सायंकाळीच जेवते. त्यात खिचडी दही, सुरण टिक्की किंवा व्हेज पुलाव.

आणि रात्री झोपण्यापूर्वी दुध किंवा बनाना मिल्कशेक पिते.

 


आणि ऋजुता सांगतेही की, हे सारं करताना ती काही दिवसाला 10 तास जीम करत नाही. मात्र हा आहार घेऊनही ती आठवडय़ाला 4-5 तास जीम ट्रेनिंग करते. घर आणि काम सांभाळण्याची उत्तम एनर्जी योग्य आहार देतो.
हे वाचून क्षणभर मनात येईलही अनेकजणींच्या की, आपल्याला कसं जमणार? आपल्याला कोण देतं हे सारं हातातल्या हातात? पण करीनासारखा लूक, ग्लो पाहिजे, तर इतना तो करनाही पडेगा.

Web Title: Kareena Kapoor 's diet secret? shares Rujuta diwekar 8 meals diet plan.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.