Jammu and Kashmir's first female bus driver | जम्मू- काश्मीरची पहिली महिला बस ड्रायव्हर

जम्मू- काश्मीरची पहिली महिला बस ड्रायव्हर

- प्रतिनिधी

जम्मू- काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यातल्या संधार- बासोहली या गावातील पूजा देवी या महिलेचा फोटो सध्या समाजमाध्यमात व्हायरल होतो आहे. बसच्या ड्रायव्हिंग सीटवर पूजा देवी आहे. हा फोटो सर्वांत पहिले केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ट्वीट केला. जम्मू- काश्मीरमधील पहिली महिला बस ड्रायव्हर होण्याचा मान पूजा देवीकडे जातोय.

अर्थात हाती स्टेअरिंग घेण्यापर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. वडिलांची शेती. घरची परिस्थिती मात्र बेताची. पूजा फार शिकू शकली नाही; पण तिला लहानपणापासून वाटत असे की, आपण ट्रक किंवा बस चालवावी. या स्वप्नाला वडिलांनीही विरोध केला नाही. पूजाचे मामा राजेंद्र सिंह यांच्याकडे ट्रक होता. त्यांनी मामाकडून ट्रक चालवणं शिकून घेतलं आणि अवजड वाहनचालकाच्या परवान्यासाठी अर्ज केला.

परवाना मिळाला; पण ही अशी गाडी बायकोनं चालवायला तिच्या पतीची संमती नव्हती. तीन मुलांची आई असलेली पूजा मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि आता जम्मू- काश्मीरमधील पहिली महिला बस ड्रायव्हर होण्याची कामगिरी तिनं करून दाखवली. आता ती संधार-बासोहली ते जम्मू या मार्गावर बस चालवते.

फक्त गाडीचं नाही तर आपल्या स्वप्नांचं आणि जगण्याचं स्टेअरिंगही पूजाने असं हातात घेतलेलं दिसतं.

Web Title: Jammu and Kashmir's first female bus driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.