Lokmat Sakhi >Inspirational > १२ नातवंडांच्या आजीचा विश्वविक्रम, ४ तास ३० सेकंद प्लँक करणाऱ्या आजीबाईची भलतीच अवघड गोष्ट

१२ नातवंडांच्या आजीचा विश्वविक्रम, ४ तास ३० सेकंद प्लँक करणाऱ्या आजीबाईची भलतीच अवघड गोष्ट

World record set by grandmother of 12, a very inspiring story of a grandmother who planked for 4 hours and 30 seconds : साठीतही आजी आहेत एकदम फीट. पाहा त्यांची गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2025 13:18 IST2025-08-22T13:16:56+5:302025-08-22T13:18:53+5:30

World record set by grandmother of 12, a very inspiring story of a grandmother who planked for 4 hours and 30 seconds : साठीतही आजी आहेत एकदम फीट. पाहा त्यांची गोष्ट.

World record set by grandmother of 12, a very inspiring story of a grandmother who planked for 4 hours and 30 seconds | १२ नातवंडांच्या आजीचा विश्वविक्रम, ४ तास ३० सेकंद प्लँक करणाऱ्या आजीबाईची भलतीच अवघड गोष्ट

१२ नातवंडांच्या आजीचा विश्वविक्रम, ४ तास ३० सेकंद प्लँक करणाऱ्या आजीबाईची भलतीच अवघड गोष्ट

जसे वय वाढत जाते तशी शरीराची ठेवण बदलते. एखादे काम करण्याची क्षमता कमी होते. खास म्हणजे महिलांमध्ये हाडांची मजबुती कमी होऊन दम लागण्याचे प्रमाण वाढते. (World record set by grandmother of 12, a very inspiring story of a grandmother who planked for 4 hours and 30 seconds)मात्र काही लोक या चौकटींना अपवाद असतात. अथक मेहनत करुन आणि शिस्तबद्ध आयुष्य जगत ते काही वेगळं करुन दाखवतात. अशाच एका जिद्दी आणि एकदम फिट असलेल्या आजीचे गिनिज बुकमध्ये दोनदा नाव नोंदवले गेले. 

डोनाजीन वाइल्ड या कॅनेडियन आजीने प्लँक या व्यायाम प्रकारात महिलांचा जागतिक विक्रम मोडला. साधारणपणे महिला ३० सेकंद ते २ मिनिटे प्लँक स्थितीत राहू शकतात. नियमित हा प्रकार करणाऱ्या जास्त वेळ राहू शकतील. शरीरासाठी हा व्यायाम फार उपयुक्त ठरतो. डोनाजीनने तब्बल ४ तास, ३० मिनिटे, ११ सेकंद सलग या स्थितीत राहण्याचा विक्रम केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डोनाजीनचे वय ५९ वर्षे आहे. या वयातही ती तासंतास प्लँक करु शकते. लोकांचे साठीत चालायचे वांदे होतात मात्र तिचा स्टॅमिना तर वाढतच चालला आहे. फक्त नाही तर डोनाजीनच्या नावावर आणखी एक विक्रम आहे. तिने एका तासात १५७५ फुशअप्स मारले त्यासाठी तिचे नाव अजून एकदा गिनिज बुकमध्ये नोंदवण्यात आले.

डोनाजीन लहानपणापासून अशी फीट नव्हती. एक मजा म्हणून सुरु केलेली गोष्ट पुढे तिच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग झाली. डोनाजीन  पाच मुलांची आई आणि बारा मुलांची आजी आहे. डोनाजीनची मुले मज्जा म्हणून प्लँक करायची. त्यांच्या मस्तीत सामील व्हायचं म्हणून तिने पण हा व्यायाम प्रकार करायला सुरवात केली हळूहळू तिला ते आवडायला लागले. डोनाजीन एक शिक्षिका आहे. शाळेचे काम, वाचन, मोबाइल वापरणे अशी सारे कामे करताना ती कायम प्लँक स्थितीतच असते. त्यामुळे तिच्या शरीराला हळूहळू त्याची सवय व्हायला लागली आणि तिची क्षमता वाढायला लागली. शरीर फीट व्हायला लागल्यावर तिला पुशअप्सही आवडायला लागले. हळूहळू तिचे हात एवढे मजबूत झाले की तिला हातावर असे बसणे किरकोळ वाटायला लागले. 

डोनाजीन महिलांसाठी नक्कीच आदर्श आहे. ती म्हणते, "काही नवीन शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते. तुम्हाला जे आवडते ते करत राहा. सातत्य फार महत्त्वाचे असते आणि शिस्तही. या दोन गुणांच्या जोरावर तुम्ही कोणत्याही वयात काहीही साध्य करु शकता."   

Web Title: World record set by grandmother of 12, a very inspiring story of a grandmother who planked for 4 hours and 30 seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.