दिल्लीमध्ये जन्मलेली आणि वाढलेली प्रतीका रावल. भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकला तेव्हा ती व्हीलचेअरवर बसून सेलिब्रेशनसाठी मैदानात आली. एरव्ही ओपनिंगला येत तडाखेबाज खेळणारी ही मुलगी, अंतिम सामना खेळू शकली नाही. मात्र या मौसमात भारतीय यशाची पायाभरणी मात्र तिनेच केली.(pratika rawal)
प्रतीका अभ्यासात अत्यंत हुशार. क्रिकेट आवडत होतंच पण तिने अभ्यासाचा हात सोडला नाही. बारावीत सीबीएसई बोर्ड परीक्षेत तब्बल ९२.५ टक्के गुण मिळवले आणि दिल्लीतील प्रसिद्ध मॉडर्न स्कूल, बाराखंबा रोडमधून शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिनं नवी दिल्लीतील जिझस अँड मेरी कॉलेजमधून मानसशास्त्रात पदवी मिळवली.
प्रतीका बोलते कमी. पण तिचा आत्मविश्वास जबरदस्त. मानसशास्त्र ती नुसती शिकलीच नाही तर तिने ते आचरणातही आणलेच. आणि आपल्या खेळाच्या मैदानात ती कधीही खचलेली दिसली नाही.
त्याच त्या भाज्या खाण्याचा कंटाळा आला? मराठवाडी पद्धतीने करा कुरडईची खमंग भाजी, घ्या रेसिपी
चौथीत होती तेव्हापासून ती क्रिकेट खेळतेय. तिचे वडील प्रदीप रावल, जे दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन (DDCA) चे बीसीसीआय प्रमाणित लेव्हल-१ अंपायर आहेत, त्यांच्या क्रिकेटप्रेमाचा संसर्ग अर्थात तिलाही झालाच. त्यांचा केबलचा व्यवसाय आहेच. पण प्रतीकाच्या मागे प्रेरणा बनून उभी होती ती तिची आई.
वडिलांनी तिला रोहतक रोड जिमखाना क्रिकेट अकादमीमध्ये नेलं, जिथं तिने प्रसिद्ध प्रशिक्षक शर्वन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलं. इशांत शर्मा आणि नितीश राणा यांचे ते कोच. त्यांच्या तालमीत प्रतीका उत्तम तयार झाली.
दाल मखनी म्हणजे फक्त भरपूर बटर नाही, घ्या अस्सल पंजाबी रेसिपी- चवीला लय भारी...
तिचे वडील सांगतात माझं स्वप्न होतं की माझ्या मुलांनी भारतासाठी खेळावं. प्रतीकाने ते स्वप्न पूर्ण केलं. मनात जिद्द असेल आणि आपण ठरवलं तर अशक्य काय हे ती स्वत:च म्हणते, ते तिनं करुन दाखवलं!
