Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Inspirational > Women's day 2026 - महिला दिन का साजरा केला जातो? काय या दिवसाचं खरं ऐतिहासिक महत्त्व..?

Women's day 2026 - महिला दिन का साजरा केला जातो? काय या दिवसाचं खरं ऐतिहासिक महत्त्व..?

Women’s Day 2026: Why Is International Women’s Day Celebrated? The Real Historical Significance Behind March 8 : या कारणामुळे सुरु झाली महिला दिन साजरा करण्याची सुरवात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2026 12:51 IST2026-03-08T12:47:11+5:302026-03-08T12:51:38+5:30

Women’s Day 2026: Why Is International Women’s Day Celebrated? The Real Historical Significance Behind March 8 : या कारणामुळे सुरु झाली महिला दिन साजरा करण्याची सुरवात.

Women’s Day 2026: Why Is International Women’s Day Celebrated? The Real Historical Significance Behind March 8 | Women's day 2026 - महिला दिन का साजरा केला जातो? काय या दिवसाचं खरं ऐतिहासिक महत्त्व..?

Women's day 2026 - महिला दिन का साजरा केला जातो? काय या दिवसाचं खरं ऐतिहासिक महत्त्व..?

अनेक ठिकाणी महिला दिन थाटात साजरा केला जातो. साजरा करताना महिलांचा सन्मान केला जातो, कार्यक्रम होतात, शुभेच्छा दिल्या जातात. पण या दिवसामागे एक मोठा इतिहास आणि संघर्ष दडलेला आहे त्याबद्दल माहिती आहे का? १९०८ साली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील वस्त्रोद्योग कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांनी कामाचे कठीण तास, कमी वेतन आणि अन्यायकारक वागणूक याविरोधात आवाज उठवला. (Women’s Day 2026: Why Is International Women’s Day Celebrated? The Real Historical Significance Behind March 8)या आंदोलनामुळेच पुढे महिलांच्या हक्कांसाठीच्या जागतिक चळवळीला मोठी दिशा मिळाली. तिथून ते हा दिन साजरा करण्यापर्यंतचा संघर्ष फार कष्टाचा आहे. प्रत्येकाने तो लक्षात ठेवायलाच हवा.

त्या काळात अनेक देशांमध्ये महिलांची परिस्थिती भयंकर होती. वेतनदारीवर काम करणाऱ्यांचे तर हालच सुरु होते.  कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांना खूप तास काम करावे लागायचे, पण त्यांना कमी पगार दिला जायचा. त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता, अनेक ठिकाणी त्यांचे मत आणि हक्क दुर्लक्षित केले जायचे. या अन्यायाविरोधात महिलांनी आवाज उठवायला सुरुवात केली.

१९०८ साली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात मोठी घटना घडली. वस्त्रोद्योगात काम करणाऱ्या हजारो महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यांची मागणी साधी पण महत्त्वाची होती, कामाचे तास कमी असावेत, पगार योग्य असावा आणि महिलांनाही मतदानाचा अधिकार मिळावा. या आंदोलनामुळे महिलांच्या हक्कांच्या लढ्याला मोठी दिशा मिळाली. या घटनेला 1908 New York Women Garment Workers Strike म्हणून ओळखले जाते.

यानंतर काही वर्षांनी १९१० मध्ये डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे महिलांच्या हक्कांवर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत जर्मनीचे समाजवादी नेते Clara Zetkin यांनी एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला. जगभरातील महिलांच्या हक्कांसाठी एक दिवस ठरवून तो दरवर्षी साजरा केला पाहिजे, अशी त्यांची कल्पना होती. हा प्रस्ताव International Socialist Women's Conference मध्ये मांडला गेला आणि अनेक देशांनी त्याला समर्थन दिले.

यानंतर १९११ पासून काही देशांमध्ये महिलांसाठी खास असा दिवस साजरा होऊ लागला. हळूहळू जगभरात त्याला प्रतिसाद मिळाला आणि महिलांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्याचे प्रतीक झाला. पुढे १९७५ साली United Nations ने अधिकृतपणे ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला.

आज International Women's Day साजरा करताना आपण महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करतो. पण त्याच वेळी हा दिवस आपल्याला त्या संघर्षाची आठवण करून देतो, ज्यामुळे महिलांना आज शिक्षण, नोकरी, मतदान आणि समान हक्क मिळाले. प्रत्येक देशात असा लढा देणाऱ्या अनेक जणी होत्या आहेत आणि पुढेही असतीलच. 

Web Title : महिला दिवस: अंतर्राष्ट्रीय महिला दिवस का इतिहास और महत्व

Web Summary : अंतर्राष्ट्रीय महिला दिवस महिलाओं के अधिकारों के लिए संघर्ष की याद दिलाता है। 1908 के बेहतर स्थितियों के विरोध से उत्पन्न, इसने क्लारा Zetkin के प्रस्ताव और 1975 में संयुक्त राष्ट्र की मान्यता के माध्यम से गति प्राप्त की। यह उपलब्धियों का जश्न मनाता है और समानता के लिए चल रहे संघर्ष को स्वीकार करता है।

Web Title : Women's Day: History, significance of the International Women's Day

Web Summary : International Women's Day commemorates the fight for women's rights. Originating from 1908 protests for better conditions, it gained momentum through Clara Zetkin's proposal and UN recognition in 1975. It celebrates achievements and acknowledges the ongoing struggle for equality.