Women's Day 2025 Wishes in Marathi: महिला दिन जवळ आला की दरवर्षीच शुभेच्छांचे फॉरवर्ड मेसेज इकडून तिकडे पाठवले जाऊ लागतात. तोच दरवर्षीचा कॉपी पेस्ट फॉर्म्युला. ना त्यात काही नाविन्य, ना पर्सनल टच ना त्यात काही गोडवा ना कसला स्नेह. केवळ उपचार करावे तसे कॉपी पेस्ट मेसेज पाठवले जातात. महिलांनाही माहिती असतं की या मेसेजमध्ये काही आत्मियता नाही. उलट नको ते कोरडे फॉरवर्ड केलेले मेसेज आणि नको ती शुभेच्छांची उसनी शाब्दिक धडपड असं वाटून उबग येतो. (Women's Day Special Message)
काळ बदलला आणि त्यानुसार आपले शुभेच्छा संदेशही बदलायला हवे. निदान एरवी कमी दिसत असली तरी शुभेच्छा संदेशात तरी काही समानता, आदर, आत्मियता आणि सहजीवनाची समृद्ध ओढ दिसावी ही अपेक्षा काही चूक नाही. दर सणाला जसे टिपिकल मेसेज पाठवता तसे यावर्षी करु नका. महिला दिनासाठी तरी काहीतरी ओरिजनल अस्सल मेसेज पाठवा. (women's day 2025)
यावर्षीची विमेन्स डे थिमच आहे Accelerate Action म्हणजेच कृतीचा वेग वाढवा. शाब्दिक बडबडीपलिकडे कृतीला वेग देणारी ही थीम आहे, निदान किमान ती शुभेच्छा संदेशात तरी दिसलेली बरी!
काय मेसेज करता येईल?
खरंतर आपल्या जगण्यात विशेष स्थान असलेल्या महिलेसाठी स्वत:च काही विशेष मेसेज लिहून पाठवला तर आई, बहीण, मैत्रीण, सहकारी, वहिनी, मुलगी यांना आनंदच होईल. पण ते शक्य नसेल तर निदान हे त्यांना आवडतील असे तरी मेसेज करा. तुमच्या स्टेटसला ठेवा.
टिपिकल काही न म्हणता जरा मनापासून लिहिलेलं काही असू द्या हाताशी..
हे घ्या ओरिजनल मेसेज
१. तुझ्याशिवाय मी माझ्या जगण्याची कल्पनाच करु शकत नाही..जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
२. जगण्यात हिंमत, प्रत्येक क्षणात ताकद आणि आनंदही आहे, तो केवळ तुझ्याचमुळे..
३. कुणाची आई, बहीण, बायको ही एवढीच तुझी ओळख नाही.. तू ‘तू’ आहेस, तुझ्यासारखी तूच! जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
४. लेकरांसाठी माया आणि घरादारासाठी साऱ्या सुखाची छाया आहेस, तू आहेस म्हणून आम्ही आहोत.
५. She includes He, तूझ्याशिवाय मी असूच शकत नाही. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
६. केवळ आजचा दिवस नाही, प्रत्येक दिवस तुझाच, तुझ्याचसाठी! जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
७. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! तुझ्या कर्तृत्वाने, धैर्याने आणि प्रेमाने समाज उजळत राहो.
८. स्त्री म्हणजे त्याग, प्रेम आणि शक्तीची मूर्ती! तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळो. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
९. तुझ्या अस्तित्वामुळेच हे जग सुंदर आहे! तुझ्या प्रत्येक प्रयत्नात यश मिळो, हीच शुभेच्छा! महिला दिनाच्या अनेक शुभेच्छा!
१०. तू जग बदलणारी शक्ती आहेस! तुझ्या आत्मविश्वासाने आणि कर्तृत्वाने नवीन उंची गाठत रहा. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!