कधीकधी आयुष्य आपल्याला अशा ठिकाणी आणून सोडते. जिथे आपल्याला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं. अनेकदा तर आपण फक्त बघत राहतो.(Jemimah Rodrigues story) हातात सगळं काही असतं पण खेळण्याची संधी मिळत नाही.(women world cup 2025) त्या क्षणी डोळ्यात अश्रू, मनात असंख्य भावनांचं वादळ, राग, हताशा आणि एक प्रकारची भीती वाटू लागते.(Jemimah Rodrigues motivation) आपण सारं काही हरलो ही भावना मात्र कायमच मनात घर करते.(Indian women cricketer story) पण खरी हिम्मचत तेव्हाच दिसते, जेव्हा आपण नव्याने उभे राहून स्वत:शी सामना करतो. भारतीय महिला क्रिकेट संघातील जेमिमा रॉड्रिग्जची गोष्टही अशीच. (Jemimah Rodrigues life struggle)
ज्या पिचवर रोज आपण खेळायचो, सराव करायचो. तिथूनच तिला हताश व्हावं लागलं. आपल्या खराब फॉर्ममुळे तिला संघातून बाहेर राहावं लागलं ज्यामुळे जेमिमाचं मन दुखावलं होतं. ती म्हणते २०२२ च्या विश्वचषकात मला खेळू दिलं नव्हतं. मी सतत रडायची, मला एन्झायटीचा त्रास सुरु झाला होता. लोकांना वाटायचं मी ठीक आहे पण मी आतून पूर्ण तुटले होते. पण मी हार मानली नाही. स्वत:शी सुरु असलेली ही झुंज मी जिंकून दाखवली. सराव, आत्मविश्वास आणि प्रार्थना या तिन्ही गोष्टींनी मला पुन्हा उभ राहण्यास बळ दिलं. मागच्या वर्षभरात मला लोकांनी ट्रोल केलं. माझ्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह उभे केले.पण हार न मानता मी पुन्हा नव्याने सराव सुरु केला. ज्यामुळे मी अजूनच सक्षम होत गेले आणि ज्या वेळी मला खेळण्याची संधी मिळाली तेव्हा मी त्याचं सोनं करायचं ठरवलं.
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत ऑस्टेलियाचा भारताकडून पराभव करण्यात आला. या सामन्याची विजयी स्टार म्हणून मला सन्मान मिळाला. १२७ धावा काढत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. हे यश फक्त माझं नाही तर माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या माझ्या आई-वडीलांचं, कोचच आहे. मी त्याचं मनापासून आभार मानते. हा पूर्ण महिना माझ्यासाठी कठीण होता. हे स्वप्न कधीही संपू नये असं वाटतं होते. स्वत:ला सिद्ध करायचे असेल तर आपल्याला खेळावं लागेल. आणि नुसतं खेळायचं नाही तर हा सामना आपल्याला जिंकायचा आहे. ही भावना कायम माझ्या मनात होती. माझी एक चूक आणि हा सामना, माझं करिअर मी पुन्हा गमावू शकते असं सारखं मला वाटतं होतं पण मी शांतपणे हा सामना खेळले. अर्धशतक किंवा शतक ठोकलं तेव्हाही माझा आनंद साजरा केला नाही. पण जिंकल्यानंतर मला अश्रू अनावर झाले.
हे अश्रू, हा सामना फक्त विजयाचा नव्हता तर पुन्हा स्वत:ला शोधण्याचा होता. आपण हरल्यानंतर जी भावना मनात दाटून येते त्यानंतर आपला आत्मविश्वास गळून पडतो. या सामन्यानंतर माझा आत्मविश्वास पुन्हा वाढला, मी करुन दाखवलं ही भावना कायम माझ्या मनाला शांत करते. जिंकल्यानंतर मी पुन्हा माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यांत माझ्या प्रति अभिमान पाहिला.
जेमिमाची ही कहाणी फक्त एका खेळाडूची नाही तर प्रत्येक व्यक्तीची आहे. जी आयुष्यात कधीतरी हरते, रडते पण संधी मिळाल्यानंतर पुन्हा नव्या ताकदीने उभी राहते आणि जिंकते. ही लढाई मानसिक बळाची आणि इच्छाशक्तीची परीक्षा होती. मनाने ठरवलं तर काहीच अशक्य नाही...
 



