Join us

Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 11:27 IST

Mirabai Chanu : भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने नॉर्वेच्या फोर्डे येथे सुरू असलेल्या वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं आहे.

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने नॉर्वेच्या फोर्डे येथे सुरू असलेल्या वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं आहे. भारतासाठी सर्वाधिक वर्ल्ड चॅम्पियनशिप मेडल जिंकणारी ती तिसरी वेटलिफ्टर बनली आहे. यापूर्वी तिने २०१७ च्या अनाहिम येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ४८ किलो वजनी गटात गोल्ड मेडल जिंकलं होतं. २०२२ मध्ये ४९ किलो वजनी गटात सिल्व्हर मेडल जिंकलं होतं.

मीराबाई चानूने ४८ किलो वजनी गटात एकूण १९९ किलो वजन उचलून सिल्व्हर मेडल जिंकलं. तिने स्नॅचमध्ये ८४ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ११५ किलो वजन उचलून दुसरं स्थान पटकावलं. उत्तर कोरियाच्या री संग गुमने एकूण २१३ किलो वजन उचलून गोल्ड मेडल जिंकलं. चीनच्या थान्याथनचा सामना मीराबाईशी झाला.

थान्याथनने ब्रॉन्ज मेडल जिंकलं. स्नॅच राउंडमध्ये थान्याथनने मीराबाईपेक्षा ४ किलोग्रॅमने आघाडीवर होती, परंतु क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मीराबाईने चमकदार कामगिरी करत चिनी खेळाडूला मागे टाकले आणि १ किलोग्रॅमने आघाडी घेत सिल्व्हर मेडल जिंकलं.

विजयानंतर मीराबाई चानू थेट तिचे प्रशिक्षक विजय शर्मा यांच्याकडे गेली आणि त्यांचे मनापासून आभार मानले. दुखापतींमुळे मीराबाई चानूसाठी गेल्या काही वर्षांमध्ये कठीण परिस्थिती होती. या वर्षाच्या सुरुवातीला अहमदाबाद येथे झालेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये मीराबाईने गोल्ड मेडल जिंकलं.

मीराबाई चानू भारतासाठी दोनपेक्षा जास्त वेळा वर्ल्ड चॅम्पियनशनप विजेतेपद जिंकणारी तिसरी खेळाडू ठरली. कुंजराणी देवी आणि कर्णम मल्लेश्वरी यांनी अशी कामगिरी केली आहे. कुंजराणीने या स्पर्धेत सात वेळा (१९८९, १९९१, १९९२, १९९४, १९९५, १९९६ आणि १९९७) सिल्व्हर मेडल जिंकलं. मल्लेश्वरीने १९९४, १९९५ मध्ये गोल्ड आणि १९९३, १९९६ मध्ये ब्रॉन्ज मेडल जिंकलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Mirabai Chanu wins silver at World Championship, creates history.

Web Summary : Mirabai Chanu secured a silver medal at the World Weightlifting Championship in Norway, lifting a total of 199 kg. She is now the third Indian weightlifter to win multiple World Championship medals. This victory follows her gold at the Commonwealth Championship earlier this year.
टॅग्स :मीराबाई चानूवेटलिफ्टिंगप्रेरणादायक गोष्टी