Lokmat Sakhi >Inspirational > करुन दाखवलं! कॅट वॉक ते मिल्ट्रीची परेड, मॉडेल झाली आर्मी ऑफिसर! जिद्द असावी तर अशी...

करुन दाखवलं! कॅट वॉक ते मिल्ट्रीची परेड, मॉडेल झाली आर्मी ऑफिसर! जिद्द असावी तर अशी...

मॉडेलिंगचे ग्लॅमरस जग आणि एनसीसी, एनडीएचे आव्हानात्मक क्षेत्र एकमेकांपासून खूप वेगळं मानलं जातं, परंतु कशिशने या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येतात हे दाखवून दिलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 14:02 IST2025-04-10T14:02:14+5:302025-04-10T14:02:36+5:30

मॉडेलिंगचे ग्लॅमरस जग आणि एनसीसी, एनडीएचे आव्हानात्मक क्षेत्र एकमेकांपासून खूप वेगळं मानलं जातं, परंतु कशिशने या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येतात हे दाखवून दिलं.

upsc success story of cds topper air 2 rank kashish methwani miss india international became indian army officer | करुन दाखवलं! कॅट वॉक ते मिल्ट्रीची परेड, मॉडेल झाली आर्मी ऑफिसर! जिद्द असावी तर अशी...

करुन दाखवलं! कॅट वॉक ते मिल्ट्रीची परेड, मॉडेल झाली आर्मी ऑफिसर! जिद्द असावी तर अशी...

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. कशिश मेथवानी हिने हे सिद्ध केलं आहे. मॉडेलिंगचे ग्लॅमरस जग आणि एनसीसी, एनडीएचे आव्हानात्मक क्षेत्र एकमेकांपासून खूप वेगळं मानलं जातं, परंतु कशिशने या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येतात हे दाखवून दिलं. २०२४ च्या संयुक्त संरक्षण सेवा म्हणजेच सीडीएस परीक्षेच्या निकालात तिने एआयआर २ रँक म्हणजेच संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केलं.

कशिश मिस इंटरनॅशनल इंडिया आणि एनसीसी कॅडेट देखील राहिली आहे. एवढंच नाही तर तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एनसीसीचा ऑल इंडिया बेस्ट कॅडेट पुरस्कारही मिळाला आहे. कशिशने एम.एस्सी. पूर्ण केलं आहे. कशिशचे पालक शोभा मेथवानी आणि डॉ. गुरुमुख दास यांच्याकडून तिला असंख्य गोष्टी शिकायला मिळाल्या. चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग एकॅडमी ज्वॉईन करून तिने अधिकारी होण्याचा प्रवास पूर्ण केला आहे. 

कशिश नेहमीच अभ्यासात खूप हुशार होती. कशिशने सीडीएस करून देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. मिस इंटरनॅशनल इंडियाचा किताबही जिंकला आहे. एक सौंदर्यवती म्हणून तिने अनेक मुद्द्यांबद्दल जागरूकता निर्माण केली आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तिच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. 

कशिश राष्ट्रीय स्तरावरील पिस्तूल शूटर देखील आहे आणि बास्केटबॉल देखील खूप चांगलं खेळते. एवढंच नाही तर कशिश एक चांगली तबला वादक आणि भरतनाट्यम डान्सर देखील आहे. २८ जानेवारी २०२१ रोजी कशिश मेथवानीला हवाई दलाच्या विंगसाठी सर्वोत्कृष्ट कॅडेट पुरस्कार प्रदान करण्यात आला. कशिशने आपल्या यशाचं श्रेय एनसीसीला दिलं आहे. 


 

Web Title: upsc success story of cds topper air 2 rank kashish methwani miss india international became indian army officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.