Join us

शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 16:40 IST

Ritika Chitlangia : आयएएस रितिका चितलांगिया यांनी दुसऱ्या प्रयत्नात एआयआर ५५ सह यूपीएससी सीएसई २०२४ परीक्षा उत्तीर्ण केली.

आयएएस, आयपीएस, आयएफएससारख्या प्रतिष्ठित पदांवर सरकारी नोकरी मिळवणं हे अनेक तरुणांचं स्वप्न असतं. दरवर्षी अनेक उमेदवार या परीक्षेत बसतात, परंतु प्रत्येकालाच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होता येत नाही. त्यासाठी अनेक दिवस कठोर परिश्रम करावे लागतात. आयएएस रितिका चितलांगिया यांनी दुसऱ्या प्रयत्नात एआयआर ५५ सह यूपीएससी सीएसई २०२४ परीक्षा उत्तीर्ण केली.

आयएएस रितिका चितलांगिया यांचा जन्म कोलकाता येथे झाला आणि त्या दिल्लीत मोठ्या झाल्या आहेत. बिर्ला विद्या निकेतन येथून हायस्कूल डिप्लोमा केला. २०२२ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊसमधून बीए (ऑनर्स) भूगोल पदवी प्राप्त केली आणि ९.० सीजीपीए मिळवले. लिंक्डइननुसार, त्यांनी गर्ल अप, वायसीएम युथ कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट आणि मेडिएशन इनिशिएटिव्ह सारख्या अनेक संस्थांमध्ये कंटेंट रायटर म्हणूनही काम केलं. वयाच्या १० व्या वर्षापासूनच सिव्हिल सेवेमध्ये सामील व्हायचं होतं आणि यूपीएससी सीएसई द्यायची होती. हायस्कूलच्या शिक्षकांकडून प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळालं.

पदवी घेतल्यानंतर UPSC परीक्षेची तयारी सुरू केली आणि भारतातील सर्वात कठीण परीक्षेपैकी एक असलेल्या परीक्षेसाठी दिवसरात्र अभ्यास केला. कठोर परिश्रम आणि समर्पणाला अखेर फळ मिळालं जेव्हा तिने UPSC CSE Mains 2025 मध्ये ऑल इंडिया  (AIR) ५५ रँक मिळवला. लिंक्डइनवरील तिच्या पोस्टमध्ये, तिने तिच्या UPSC प्रवासाचा आणि त्यातील चढ-उतारांचा उल्लेख केला आहे. 

"माझे आयुष्य बदलून तीन महिने झाले आहेत. २२ एप्रिल २०२५ च्या दुपारने माझ्या पर्सनल आणि व्यावसायिक आयुष्याची दिशा बदलली. ही भावना समजून घेण्यासाठी तीन महिने लागले. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत मी ५५ वा ऑल इंडिया रँक मिळवला आहे! हा प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे आणि माझ्या प्रियजनांच्या, मार्गदर्शकांच्या आणि मित्रांच्या पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे. प्रत्येक क्षण सार्थकी लागला आहे."

"इथपर्यंत पोहोचणं ही फक्त वैयक्तिक कामगिरी नाही तर चिकाटी, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाच्या शक्तीचं प्रतिक आहे. देशाची सेवा करण्याची आणि माझ्या देशवासीयांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची संधी मिळाल्याने मी भारावून गेले आहे. सर्व इच्छुक उमेदवारांना मी असं म्हणू इच्छिते की, तुमच्या कठोर परिश्रमाचं नक्कीच फळ मिळेल. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही स्वप्न पाहणं सोडू नका. पुढे जात राहा आणि स्वत:वर विश्वास ठेवा" असं  रितिका चितलांगिया यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी