Join us

UPPSC Exam : जाऊबाई जोरात! एकाच घरातील २ सुनांनी UPPSC परिक्षेत मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 19:11 IST

UPPSC Exam : ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शालिनीला मुख्याध्यापक तर नमिताला डीएसपी म्हणून पोस्टिंग मिळाली.

UPPSC अर्थात उत्तर प्रदेश प्रशासकीय सेवेची परीक्षा खूप कठीण असते. प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी हा उत्तम पर्याय आहे. कित्येकदा परिक्षा देऊनही अनेकांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही तर काहीजण पहिल्याचवेळी बाजी मारतात. बलिया जिल्ह्यातील जावा-जावांच्या या जोडीने 2018 साली एकत्र UPPCS परीक्षा उत्तीर्ण केली होती. मोठी सून शालिनी श्रीवास्तव आणि  धाकटी नमिता शरण यांनी ही कामगिरी केली. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शालिनीला मुख्याध्यापक तर नमिताला डीएसपी म्हणून पोस्टिंग मिळाली.

शालिनीला हे यश दुसऱ्या प्रयत्नात मिळाले. त्याच वेळी, नमिताने तिसऱ्या प्रयत्नात यूपीपीसीएस परीक्षेत 18 वा क्रमांक मिळविला. दोघांच्या या यशाच्या चर्चा परिसरात खूप रंगल्या आणि आजही त्याचे किस्से सांगितले जातात. त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात आनंदाची लाट उसळली. ही दोन्ही नावे सर्वांच्याच जिभेवर होती. ही बातमी त्यावेळी सर्वाधिक चर्चेत होती.

संपूर्ण गावाकडून दोघींची पाठ थोपटली जात आहे. 

शालिनीचे पती डॉ. सौरभ हे उदयपूर विद्यापीठात प्राध्यापक आहेत. शालिनी प्राथमिक शाळेत शिक्षिका असताना २०११ मध्ये दोघांचे लग्न झाले होते. लग्नानंतरही त्यांनी अभ्यास सुरू ठेवला आणि हे यश मिळवले. त्याच वेळी, नमिताचा पती शिशिर गोरखपूरमध्ये बँक पीओ म्हणून तैनात आहे. दोघांनी २०१४ साली लग्न केले. सुनेच्या या यशाचा कुटुंबासह गावातील लोकांना अभिमान आहे.

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीसोशल व्हायरलकेंद्रीय लोकसेवा आयोग