UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. असंख्य अडचणींवर मात करत उम्मुल खेर यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि घवघवीत यश मिळवलं. उम्मुल खेर लहानपणापासूनच दिव्यांग होत्या. बोन फ्रेजाइल या आजाराने त्या त्रस्त आहेत. लहानपणापासूनच त्यांना आजारपण, गरिबी आणि कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागला.
अनेक अडचणींचा सामना करूनही आपलं ध्येय साध्य करण्याची हिंमत त्यांच्यात होती. त्यामुळेच त्यांनी आपलं संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं आणि यूपीएससीची परीक्षा दिली. उम्मुल खेर लहान असताना त्यांचे वडील उदरनिर्वाहासाठी दिल्लीत आले. दिल्लीत आल्यानंतर वडिलांचं आयुष्यात अडचणी होत्या. तरीही त्यांनी हिंमत न हारता आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी खूप कष्ट केले.
कुटुंबावर आली खूप वाईट परिस्थिती
वडिलांची दिवसाची कमाई खूपच कमी होती त्यामुळे ते दिल्लीतील निजामुद्दी येथील एका झोपडपट्टीत राहत होत्या. झोपडपट्टीत राहताना उम्मुल खेर आणि त्यांच्या कुटुंबाला अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं. २००१ मध्ये इथल्या झोपडपट्ट्या हटवल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर खूप वाईट परिस्थिती आली. त्यामुळे त्या बेघर झाल्या होत्या.
१६ फ्रॅक्चर आणि ८ सर्जरी
बोन फ्रेजाइल या आजारामुळे त्यांची हाडं खूपच कमकुवत झाली होती. त्यामुळे अनेकवेळा त्यांची हाडे तुटायची. उम्मुल यांना १६ फ्रॅक्चर आणि ८ सर्जरी झाल्या आहेत. २०१४ मध्ये उम्मुल यांची जपानच्या इंटरनॅशनल लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्रामसाठी निवड झाली. या कार्यक्रमासाठी निवड झालेल्या त्या चौथ्या भारतीय होत्या. एमफिलनंतर उम्मुलने जेआरएफलाही क्लिअर केलं होतं.
पहिल्याच प्रयत्नात IAS परीक्षेत यशस्वी
जेआरएफसोबत उम्मुल यांनी आयएएस बनण्याची तयारी सुरू ठेवली. यूपीएससीच्या कठीण परीक्षेत त्याने ४२० वा रँक पटकावला होता. यासह त्यांनी पहिल्याच प्रयत्नात एवढी अवघड परीक्षा उत्तीर्ण केली होती. आज त्या एक यशस्वी IAS अधिकारी आहेत आणि त्यांच्यापासून अनेकांना लोकांना प्रेरणा मिळत आहे.