Lokmat Sakhi >Inspirational > स्वत:चा विचार न करता आयुष्यभर इतरांसाठी कष्ट उपसणाऱ्या ताईची गोष्ट! प्रेमानं तिनं सारं जोडलं..

स्वत:चा विचार न करता आयुष्यभर इतरांसाठी कष्ट उपसणाऱ्या ताईची गोष्ट! प्रेमानं तिनं सारं जोडलं..

The story of a sister who worked hard for others all her life without thinking about herself! She connected everything with love : लोकमत सुपरसखी, महिलादिन विशेष स्पर्धा, बक्षिस विजेता लेख : आपण सगळ्याच सुपरसखी आहोत, स्वत:वर प्रेम करायला शिकू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2025 17:40 IST2025-04-16T17:37:51+5:302025-04-16T17:40:39+5:30

The story of a sister who worked hard for others all her life without thinking about herself! She connected everything with love : लोकमत सुपरसखी, महिलादिन विशेष स्पर्धा, बक्षिस विजेता लेख : आपण सगळ्याच सुपरसखी आहोत, स्वत:वर प्रेम करायला शिकू!

The story of a sister who worked hard for others all her life without thinking about herself! She connected everything with love.. | स्वत:चा विचार न करता आयुष्यभर इतरांसाठी कष्ट उपसणाऱ्या ताईची गोष्ट! प्रेमानं तिनं सारं जोडलं..

स्वत:चा विचार न करता आयुष्यभर इतरांसाठी कष्ट उपसणाऱ्या ताईची गोष्ट! प्रेमानं तिनं सारं जोडलं..

माधवी पराग देशपांडे

माझी सखी म्हणजे माझी ताई. शिला कडवळे. तिने जीवनात खूप खडतर प्रसंग पाहिले.  मुलगी-आई-बायको-आता आजी असा प्रवास केला. साऱ्यांसाठी जगली पण स्वत:साठी जगली का असा प्रश्न पडतो अनेकदा इतकी ती दुसऱ्यांसाठी राबते. पतीची साथ नसतानादेखील ती खंबीरपणे प्रत्येक प्रसंगाला तोंड देत गेली. क्षणभर सुखाची वाट पाहत नव्हती. फक्त कष्ट करत होती. पती ,सासु,नणंदा,मुलं,आणि तिच्या संसारासाठी कष्ट करायची. त्यांच्यासाठी जगायची! जणू तिचं स्वत:चं अस्तित्व विसरली असावी इतकी इतरांसाठी करत गेली. 
तिच्याकडे पाहून समजत गेली की स्त्रीपेक्षा मोठी कोणतीच शक्ती नाही. ती संसाराचा गाडा चालवते. आल्या परिस्थितीला तोंड देते. घरोघर अशी शक्ती आहे. अशी सुपरसखी आहे. ती आहे म्हणून घर छान चालतं, समाजाचा तोल सावरला जातो. महिला होण्याचा, सखी हाषण्याचा अभिमानच वाटायला हवा कारण प्रत्येक घरात ती आहे. विचार करा सखीच जर नसेल तर काय होईल ?
ती अनेक रुपात भेटते. जगताना अनेक भूमिका करते. आपण एखादी मुवी पाहायला गेलो तर त्या अँकटरचं किती कौतुक करतो. त्याला महत्व किती देतो मग माझी सखी तर रोज एक रोल करते. तिचं किती कौतुक करायला हवं ना! म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वत:चेही महत्व ओळखले पाहिजे. स्वत:चीही काळजी घेतली पाहिजे. स्वत:वरही प्रेम केलं पाहिजे. तिच्यामुळे, आपल्या सर्वांमुळे जगणं सुंदर होतं आहे.

माधवी पराग देशपांडे

Web Title: The story of a sister who worked hard for others all her life without thinking about herself! She connected everything with love..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.