मनाला चटका लावणाऱ्या अनेक केकेस भारतातच नाही तर जगभरात घडत असतात. त्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या आणि जीव धोक्यात टाकून काम करणारे कर्मचारी, अधिकारी म्हणजे खरे हिरो. असेच एक नाव म्हणजे IPS मल्लिका. खऱ्या आयिष्यातील मर्दानी आणि अनेक निष्पाप जीवांना नवीन आयुष्य देणारी आदर्श ऑफीसर. ('The real mardaani' - Mallika Banerjee, who saved the lives of many innocent children, a story of true hero )त्यांनी हरवलेल्या अनेक लहान मुलांना पुन्हा त्यांच्या घरी आणण्यासाठी कायद्याच्या आणि संस्थेच्याही विरोधात जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून देशाप्रति जबाबदारी निभावली.
२०१६ मध्ये छत्तीसगडमध्ये एकच हाहाकार सुरु होता, गावोगावी लहान मुले गायब होत होती. कोणाची मुलगी तर कोणाचा मुलगा. नक्की काय सुरु आहे याचा थांगपत्ता कोणाला च लावता येत नव्हता. अशातच वेस्ट बंगालच्या IPS मल्लिका बॅनर्जी यांचं पोस्टींग छत्तीसगडमध्ये झालं होतं. त्यांनाही या मुले गायब होण्याच्या तक्रारी कानावर येऊ लागल्या पोलीस शोध घेत होते इतरही टिम कार्यरत होत्या मात्र काहीच पत्ता लागत नव्हता. याच पद्धतीने शोधत राहिलो तर हाती काहीच येणार नाही अशी खात्री पटल्यावर मल्लिका यांनी एक वेगळाच पर्याय निवडला.
खाकी युनिफॉर्म सोडला आणि सेल्सवुमन म्हणून गावोगावी फिरायला सुरवात केली. स्वत:ची ओळख लपवली. लोकांशी गप्पा मारुन आणि सगळीकडे तीक्ष्ण नजर ठेवत नक्की काय घडत आहे याची माहिती मिळण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या लक्षात आलं की काही प्रायव्हेट एजन्सी गावात येतात, किशोरवयीन मुलांना कामाची संधी देतो सांगून त्यांच्याशी मैत्री करतात. घरच्यांनाही गोड बोलून जाळ्यात अडकवतात आणि मुलांना घेऊन जातात. काही महिने मुलं घरच्यांच्या संपर्कात राहतात मात्र हळूहळू संपर्क बंद होतो आणि मग त्या मुलांचा पत्ताच लागत नाही. बंद पडलेल्या जुन्या काही केसेस त्यांनी पुन्हा चालवल्या त्यातही हाच पॅटर्न दिसून आला. कंपन्यांची नावं वेगळी मात्र मुलं उचलायची पद्धत सेमच दिसत होती. हा मानव तस्करीचा (human trafficking) मामला आहे याची खात्री पटल्यावर पोलीस आणि इतरही काही गटांना कामाला लावले.
हळूहळू साखळीतील गुन्हेगार पकडले जाऊ लागले. जवळपास २५ बेकायदेशीर कंपन्या बंद करण्यात आल्या. २० मुले सुखरुप सोडवली गेली. त्या मुलांना पुन्हा त्यांच्या कुटुंबांकडे सुखरुप पोहचवण्यात आले. म्हणूनच सिस्टीमच्या विरोधात जाऊन मुलांना सोडवणाऱ्या मल्लिका बॅनर्जींना 'द रियल मर्दानी' म्हटले जाते.
Web Summary : IPS Mallika Banerjee, disguised as a saleswoman, uncovered a human trafficking ring in Chhattisgarh. She rescued 20 children, shutting down illegal companies, and reunited them with their families, earning her the title 'The Real Mardaani'.
Web Summary : आईपीएस मल्लिका बनर्जी ने सेल्सवुमन के रूप में वेश बदलकर छत्तीसगढ़ में मानव तस्करी गिरोह का पर्दाफाश किया। उन्होंने 20 बच्चों को बचाया, अवैध कंपनियों को बंद किया और उन्हें उनके परिवारों से मिलाया, जिससे उन्हें 'द रियल मर्दानी' की उपाधि मिली।