Lokmat Sakhi >Inspirational > शेरशाह कॅप्टन बत्रा आणि डिंपल चीमा यांची अमर प्रेमकहाणी, दोघांनी केले देशासाठी सर्वोच्च बलिदान

शेरशाह कॅप्टन बत्रा आणि डिंपल चीमा यांची अमर प्रेमकहाणी, दोघांनी केले देशासाठी सर्वोच्च बलिदान

The immortal love story of SherShah Captain Batra and Dimple Cheema : शेरशाहची ही प्रेमकथा ऐकल्यावर डोळ्यात पाणी येतं. आपले प्रेम पुन्हा घरी येणार नाही ही भावनाच किती भयंकर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2025 14:13 IST2025-05-09T14:12:01+5:302025-05-09T14:13:44+5:30

The immortal love story of SherShah Captain Batra and Dimple Cheema : शेरशाहची ही प्रेमकथा ऐकल्यावर डोळ्यात पाणी येतं. आपले प्रेम पुन्हा घरी येणार नाही ही भावनाच किती भयंकर.

The immortal love story of SherShah Captain Batra and Dimple Cheema | शेरशाह कॅप्टन बत्रा आणि डिंपल चीमा यांची अमर प्रेमकहाणी, दोघांनी केले देशासाठी सर्वोच्च बलिदान

शेरशाह कॅप्टन बत्रा आणि डिंपल चीमा यांची अमर प्रेमकहाणी, दोघांनी केले देशासाठी सर्वोच्च बलिदान

आपण जय हिंद म्हटल्यावर लगेच जय हिंद की सेना असे ही म्हणतो. आपण घरात निवांत बसू शकतो कारण सीमेवर आपल्यासाठी आपले सैनिक ढाल होऊन कायम उभे असतात. (The immortal love story of SherShah Captain Batra and Dimple Cheema)स्वतःचे आयुष्य देशासाठी अर्पण करणाऱ्या वीरांचा जेवढा सन्मान करावा तेवढा कमीच. फक्त त्या सैनिकालाच नाही तर त्याच्या कुटुंबियांनाही वंदन करणे गरजेचे आहे कारण त्यांच्या संयमामुळे, मानसिकतेमुळे असे सैनिक तयार होतात. 

भारतीय लष्करातील एक अत्यंत शूर अधिकारी म्हणजे विक्रम बत्रा. (The immortal love story of SherShah Captain Batra and Dimple Cheema)१९९९च्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रांच्या मुलाखती ऐकताना एका सैनिकाचा दृष्टिकोन कसा असतो त्याची मानसिकता काय असते याचा अंदाज लावता येतो. त्यांचे  टोपणनांव शेरशाह असे होते. कॅप्टन शेवटच्या श्वासापर्यंत वाघासारखेच लढले. त्यांना त्यांच्या बलिदानासाठी परमवीर चक्र देण्यात आले. त्यांच्या परिवाराचेही तेवढेच कौतुक आहे आणि आणखी एका व्यक्तीचेही. ती व्यक्ती म्हणजे बत्रांनी जिच्यावर जिवापाड प्रेम केले ती त्यांची प्रियसी डिंपल चीमा. 

आपण काल्पनिक प्रेमकथा नेहमीच ऐकतो मात्र खऱ्या प्रेमकहाणींना हॅपी एंडिंग असतेच असे नाही. डिंपल चीमा त्यांच्या प्रियकराच्या आठवणीत त्यांचे आयुष्य जगत आहेत. एका विचारामुळे, आठवणीमुळे आज त्या सुखात जगत आहेत. द क्विन्ट सोबतच्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, विक्रमच्या काही आठवणी आहेत. जेवढा वेळ एकत्र घालवला तो आठवून जगते आहे. एका सैनिकाच्या जाण्याने त्याच्या घरची हालत काय होत असेल हा विचार करतानाही अंगावर काटा येतो. 

डिंपल चीमा या आजही इतक्या वर्षांनी एकट्याच राहतात. त्यांना घरच्यांनी लग्न करायचा सल्ला दिला होता. मात्र त्यांना वैवाहिक आयुष्याचा मोह कधी वाटलाच नाही फक्त आठवणीच जवळच्या वाटल्या. डिंपल चीमा आणि कॅप्टन बत्रा यांची भेट कॉलेजला असताना झाली होती. अतिशय सुंदर असलेल्या डिंपलवर विक्रम आधीच फिदा झालेले होते. विक्रम बत्रांच्या प्रेमळ स्वभावाला डिंपलही भाळल्या. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्नेमात झाले आणि नंतर त्यांनी लग्न करायचाही निर्णय घेतला.

मात्र त्यांचे लग्न कधी झालेच नाही. डिंपल चीमा सध्या चंडीगडमध्ये राहतात आणि त्या एक शिक्षिका आहेत. कॉलेजचे दिवस तसेच ट्रेनिंगच्या मध्ये भेटायला येणाऱ्या विक्रम बत्रांसोबत व्यतीत केलेल्या प्रत्येक क्षणाच्या आधारे त्यांचे आयुष्य त्या व्यतीत करत आहेत.                

Web Title: The immortal love story of SherShah Captain Batra and Dimple Cheema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.