आनंदीबाई जोशी हे नाव तर आपण सगळ्यांनी ऐकलेले आहे.(The first female doctor to practice in India) भारतातीलमहिलांना शिक्षणाची परवानगी नसतानाच्या काळात आनंदीबाईंनी परदेशात जाऊन वैद्यकीय अभ्यास केला. वैद्यकीय पदवी मिळवली. मात्र दुर्देवानी त्यांच्या तब्येतीने दगा दिला आणि भारतात परत आल्यानंतर वयाच्या अवघ्या एकविसाव्यावर्षी त्यांचा मृत्यू झाला.(The first female doctor to practice in India) आनंदीबाई जेव्हा डॉक्टर बनण्यासाठी समाजाशी लढत होत्या त्याच काळात अजून एक महिला समाजाच्या अनिष्ट बंधनांना तोडून एम.बी.बी.एस. बनण्यासाठी झटत होती. त्यांचे नाव कादंबिनी गांगुली होते. भारतात वैद्यकीय प्रॅक्टिस करणारी पहिला महिला डॉक्टर. स्त्रीरोग तज्ज्ञही.(The first female doctor to practice in India)
कादंबिनी गांगुली अत्यंत कष्टानं डॉक्टर झाल्या. इंडियन नॅशनल कॉंग्रेसच्या त्या प्रथम प्रवक्त्याही झाल्या. १८६१ साली कोलकाताजवळ भागलपुर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. ते भागलपुरच्या शाळेत शिक्षक होते.(The first female doctor to practice in India) ब्राह्मो समाजाचे कार्यकर्तेही होते. महिला अधिकार समिती सुरू करणाऱ्यांपैकी ते एक होते. शिक्षणाचे महत्व जाणून असल्याने मुलीला शिकण्यास त्यांनी प्रवृत्त केले. १८८३ साली त्या पदव्युत्तर झाल्या. पुढे लग्न झाले. लग्नानंतर त्यांचे पती म्हणजे द्वारकानाथ गांगुली यांनी कादंबिनींना पुढे अजून शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. कलकत्ता मेडीकल महाविद्यालयाने त्यांना प्रवेश नाकारला मात्र द्वारकानाथांनी पत्नीला प्रवेश मिळेपर्यत प्रयत्न चालूच ठेवले.
पुढे १८९२साली इंग्लंडला जाऊन त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात आणखी तीन प्रमाणपत्रे मिळवली. स्त्री रोगतज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या महिलांची भारतात त्याकाळी अतोनात गरज होती. ते ओळखूनच त्यांनी त्या संदर्भातले शिक्षण घेतले.त्यांनी फक्त शिक्षण क्षेत्रात नव्हे तर, इतरही अनेक सामाजिक कार्यामध्ये योगदान दिले. महिलांच्या अधिकारांसाठी त्या शेवटपर्यंत झटत राहिल्या. कोलकात्यात महिला परिषदेची स्थापना करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. आनंदीबाईं जोशी डॉक्टर होऊन भारतात परतल्या पण दुर्देवानं त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांना वैद्यकीय क्षेत्रात काम करता आले नाही. कादंबिनी गांगुलींना मात्र अनेक वर्षे रुग्णांची सेवा करायची संधी मिळाली. त्यामुळे भारतात डॉक्टर म्हणून कार्यरत झालेल्या त्या पहिल्या महिला डॉक्टर ठरतात. महिला आज सर्वच क्षेत्रात अग्रणी दिसतात, त्यांच्यासाठी आजवर शेकडो महिलांनी आणि पुरुषांनीही अशी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत अवघड वाट चालली आहे.