Lokmat Sakhi >Inspirational > विधानमंडळात तिच्या पदराला विरोधकांनी हात लावला, पण ती हरली नाही, नडलीच! तिच्या हिंमतीची कथा..

विधानमंडळात तिच्या पदराला विरोधकांनी हात लावला, पण ती हरली नाही, नडलीच! तिच्या हिंमतीची कथा..

Thalaivii Jayalalithaa - The story of her courage : भरसभेत विरोधकांनी छळ केला. तरीसुद्धा हिंमत न हारता तिने स्वतःला सिद्ध केले. राजकारणातील मोठं व्यक्तिमत्व.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2025 18:32 IST2025-02-24T18:27:24+5:302025-02-24T18:32:04+5:30

Thalaivii Jayalalithaa - The story of her courage : भरसभेत विरोधकांनी छळ केला. तरीसुद्धा हिंमत न हारता तिने स्वतःला सिद्ध केले. राजकारणातील मोठं व्यक्तिमत्व.

Thalaivii Jayalalithaa - The story of her courage.. | विधानमंडळात तिच्या पदराला विरोधकांनी हात लावला, पण ती हरली नाही, नडलीच! तिच्या हिंमतीची कथा..

विधानमंडळात तिच्या पदराला विरोधकांनी हात लावला, पण ती हरली नाही, नडलीच! तिच्या हिंमतीची कथा..

भारतीय महिलांनी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवले आहे. पण त्यांना संघर्ष करावाच लागला. असं म्हणतात, "सगळ्यात वाईट क्षेत्र म्हणजे राजकारण. महिला तेथे टिकत नाहीत." तरी अशा अनेक जणी आहेत, ज्यांनी स्वत:ला देशाचा व्यवहार चालवण्यासाठी पात्र असल्याचे सिद्ध केले आहे. (Thalaivii Jayalalithaa - The story of her courage..)आजकाल प्रत्येक पक्षात महिला नेतृत्व करताना दिसतात. पण एक काळ होता, जेव्हा महिलांचा राजकारणात मानसिक तसेच शारीरिक छळ व्हायचा. त्या काळात काही महिला स्वत:च्या कतृत्वावर निवडणुका लढल्याही आणि जिंकल्याही.  त्यापैकीच एक नाव म्हणजे जयललिता. तामिळनाडूच्या माझी मुख्यमंत्री. १९९१ ते २०१६ च्या कालावधीमध्ये त्यांनी १४ वर्षांसाठी तामिळनाडूसाठी कार्य केले आहे. (Thalaivii Jayalalithaa - The story of her courage..)एक अभिनेत्री म्हणून त्यांनी प्रवास सुरू केला. पण एक खरी हिरो म्हणून पुढील वाटचाल केली. भारतीय महिलांना राजकारणात उतरण्यासाठी त्यांनी प्रोत्साहीत केले.

कायदेमंडळाच्या भर सभेत जयललितांवर हल्ला करण्यात आला होता. चालू सभेत विरोधी पक्षातील लोकांनी त्यांना जमिनीवर पाडून लाथा-बुक्यांनी मारले होते. केस उपटून काढले होते. हाताला लागेल त्या वस्तूने मारहाण केली होती. एवढंच नाही तर सर्व पुरूष त्यांची साडी ओढत होते. त्यांना नग्न करण्याचा प्रयत्न खुद्द कायदेमंडळात झाला होता. वेळीच जयललितांच्या पक्षातील लोकांनी त्यांना सभेतून बाहेर काढले. (Thalaivii Jayalalithaa - The story of her courage..)नाहीतर त्या दिवशी काय अनर्थ घडला असता याचा अंदाज लावता येणार नाही. या प्रकारानंतर एखादी महिला सदम्यात गेली असती. ही अख्खा देश हादरवून सोडणारी घटना होती. पण जयललितांसारख्या वाघिणीने विरोधकांना ठणकावून सांगितले होते, "पुन्हा याच सभेत पाऊल टाकेन, ते ही एक मुख्यमंत्री या नात्याने".  पुढे दोन वर्षांनी ती शपथ पूर्णही केली. नंतर पुढची १६ वर्षे कोणत्या राजकारण्याला जयललितांना हरवण्यात यश मिळाले नाही.  

कंगना रणौतचा थलायवी सिनेमा हा जयललितांचा बायोपिक आहे.कंगनाने जयललितांची भूमिका साकारली आहे. जयललितांचा संघर्ष ऐकताना अंगावर काटा येतो. त्यांचा जीव घेण्यासाठीसुद्धा अनेक कटकारस्थाने रचली गेली. राजकारणात घडणाऱ्या जास्त गोष्टी तर समाजासमोर येतही नाहीत. 'एक नटी महिला राजकारणात कशी टिकेल बघतोच' अश्या शब्दात जनतेसमोर त्यांच्यावर टिका करण्यात आल्या होत्या. कोणालाच न जुमानता त्यांनी स्वत:ला सिद्ध केले. अशा महिलांचे आयुष्यच एक आदर्श असतो.

Web Title: Thalaivii Jayalalithaa - The story of her courage..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.