Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Inspirational > कौतुकास्पद! बाळंतपणानंतर २ दिवसांनी परीक्षा; २३ वर्षांची तामिळनाडूची पहिली आदिवासी महिला न्यायाधीश

कौतुकास्पद! बाळंतपणानंतर २ दिवसांनी परीक्षा; २३ वर्षांची तामिळनाडूची पहिली आदिवासी महिला न्यायाधीश

२३ वर्षीय व्ही. श्रीपथी हिने तामिळनाडूची पहिली महिला आदिवासी न्यायाधीश बनून इतिहास रचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 15:06 IST2026-01-29T15:05:33+5:302026-01-29T15:06:07+5:30

२३ वर्षीय व्ही. श्रीपथी हिने तामिळनाडूची पहिली महिला आदिवासी न्यायाधीश बनून इतिहास रचला आहे.

tamilnadu first tribal woman judge v sripathi success story appeared for her exam two days after delivery | कौतुकास्पद! बाळंतपणानंतर २ दिवसांनी परीक्षा; २३ वर्षांची तामिळनाडूची पहिली आदिवासी महिला न्यायाधीश

कौतुकास्पद! बाळंतपणानंतर २ दिवसांनी परीक्षा; २३ वर्षांची तामिळनाडूची पहिली आदिवासी महिला न्यायाधीश

आपलं ध्येय गाठण्यासाठी काही लोक प्रचंड कष्ट करतात आणि अखेर ते स्थान मिळवतात ज्याचं त्यांनी मोठं स्वप्न पाहिलं होतं. तामिळनाडूतील एका आदिवासी महिलेनेही अशीच किमया करून दाखवली आहे. कमी वयात लग्न होऊनही तिने हार मानली नाही आणि अखेर न्यायाधीश बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. २३ वर्षीय व्ही. श्रीपथी हिने तामिळनाडूची पहिली महिला आदिवासी न्यायाधीश बनून इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी ती ही परीक्षा देण्यासाठी बाहेर पडली, त्याच्या दोन दिवस आधीच तिने आपल्या बाळाला जन्म दिला होता. यामुळेच तिच्या यशाची गाथा आता देशभर पसरत आहे.

बाळंतपणानंतर लगेच दिली परीक्षा 

तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील पुलियूर गावची रहिवासी असलेल्या २३ वर्षीय व्ही. श्रीपथीने आपल्या समाजातील लोकांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. तामिळनाडू लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाबाहेर आपल्या नवजात बाळासह तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. श्रीपथी जेव्हा परीक्षा द्यायला गेली, तेव्हा तिची मुलगी अवघ्या दोन दिवसांची होती.

लग्नानंतरही सोडलं नाही शिक्षण

व्ही. श्रीपथीचे शिक्षण येलागिरी हिल्समध्ये झाले. श्रीपथीने कायद्याचं शिक्षण घेतलं आणि याच दरम्यान लग्न लावून देण्यात आलं. मात्र तिने हार मानली नाही आणि अभ्यास सुरूच ठेवला. न्यायाधीश बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून श्रीपथीने 'TNPSC दिवाणी न्यायाधीश' (Civil Judge) परीक्षा दिली आणि ती उत्तीर्णही झाली. ज्या दिवशी परीक्षा होती, त्याच दिवशी डॉक्टरांनी बाळंतपणाची तारीख दिली होती, पण प्रत्यक्षात परीक्षेच्या दोन दिवस आधीच मुलीचा जन्म झाला. शारीरिक कष्टांची पर्वा न करता, नातेवाईकांच्या मदतीने ती २५० किमी दूर असलेल्या परीक्षा केंद्रावर पोहोचली आणि परीक्षा दिली.

गावाने साजरा केला आनंद 

परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर श्रीपथीला मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं आणि तिथेही ती यशस्वी झाली. तिच्या या यशाचा संपूर्ण गावाने उत्सवाप्रमाणे आनंद साजरा केला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनीही तिच्या यशाचं भरभरून कौतुक केलं असून हे 'सामाजिक न्याय आणि द्रविड मॉडेल'चं यश असल्याचं म्हटलं आहे. सध्या श्रीपथी केवळ तिच्या समाजासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी एक मोठं उदाहरण ठरलं आहे.
 

Web Title : तमिलनाडु की महिला बनी जज, बच्चे के जन्म के दो दिन बाद परीक्षा

Web Summary : तमिलनाडु की 23 वर्षीय वी. श्रीपथी बच्चे के जन्म के दो दिन बाद परीक्षा उत्तीर्ण कर पहली आदिवासी महिला जज बनीं। कम उम्र में शादी के बावजूद, उन्होंने अपना सपना पूरा किया, जिससे समुदाय प्रेरित हुआ और मुख्यमंत्री ने सराहना की।

Web Title : Tamil Nadu Woman Achieves Judge Dream Days After Childbirth

Web Summary : V. Sreepathi, a 23-year-old from Tamil Nadu, became the first tribal woman judge after passing the exam just two days after giving birth. Despite early marriage, she pursued her dream, inspiring her community and drawing praise from the Chief Minister.