Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Inspirational > Gayatri Verma : घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, पैसे उधार घेऊन भरली फी; पंक्चरवाल्याची लेक झाली अधिकारी

Gayatri Verma : घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, पैसे उधार घेऊन भरली फी; पंक्चरवाल्याची लेक झाली अधिकारी

Gayatri Verma : आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही गायत्रीने ऑनलाईन माध्यमातून अभ्यास केला आणि सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 16:53 IST2026-03-31T16:52:18+5:302026-03-31T16:53:51+5:30

Gayatri Verma : आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही गायत्रीने ऑनलाईन माध्यमातून अभ्यास केला आणि सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवलं.

struggle for meals and tuition fees daughter of puncture shop owner becomes officer Gayatri Verma uppsc bulandshahr | Gayatri Verma : घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, पैसे उधार घेऊन भरली फी; पंक्चरवाल्याची लेक झाली अधिकारी

Gayatri Verma : घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, पैसे उधार घेऊन भरली फी; पंक्चरवाल्याची लेक झाली अधिकारी

बुलंदशहरचे राजकुमार वर्मा यांची लेक गायत्री वर्मा हिने उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची (UPPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन पीसीएस (PCS) अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. गायत्रीने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात २१० वा रँक मिळवून हे मोठं यश मिळवलं. तिने बारावीपर्यंतचे शिक्षण बुलंदशहरमध्ये पूर्ण केलं, तर पदवीचे शिक्षण अलिगढ येथील आपल्या मामाच्या गावी राहून पूर्ण केलं. 

आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही गायत्रीने ऑनलाईन माध्यमातून अभ्यास केला आणि सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवलं. हे यश तिच्या वडिलांच्या कष्टाचं आणि कुटुंबाच्या अढळ विश्वासाचं फळ आहे, ज्यामुळे आज संपूर्ण परिसराचं नाव उंचावलं आहे.

गायत्रीचे वडील राजकुमार एका साध्या दुकानात टायर पंक्चर काढण्याचं काम करतात. घरची आर्थिक स्थिती इतकी हलाखीची होती की, पंक्चरच्या दुकानातून होणाऱ्या २००-४०० रुपयांच्या कमाईवर उदरनिर्वाह करणं कठीण होतं. त्यासाठी त्यांना सोबत चहाची टपरीही टाकावी लागली.

अनेकदा मुलीच्या शिक्षणाची फी भरण्यासाठी त्यांना व्याजाने पैसे उधार घ्यावे लागले. आपल्या मुलीने आता पूर्ण प्रामाणिकपणे काम करावं आणि तिने स्वतः भ्रष्टाचार करू नये व इतरांनाही करू देऊ नये, असं मत तिच्या वडिलांनी व्यक्त केलं आहे. सध्या त्यांच्या घरी शुभेच्छा देणाऱ्यांची रांग लागली आहे.

गायत्रीचा यशाचा प्रवास सोपा नव्हता. पहिल्या प्रयत्नात ती प्रीलिम्स उत्तीर्ण होऊ शकली नव्हती, पण तिच्या आईने दिलेल्या धैर्यामुळे ती पुन्हा उभी राहिली. दुसऱ्या प्रयत्नात ती मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचली, पण अंतिम निवड होऊ शकली नाही. 

अखेर तिसऱ्या प्रयत्नात तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर २१० वा रँक मिळवला. आज तिच्या घरी ढोल-ताशांचा गजरात, फुलांचे मोठे घालून, आरती करून तिचं आनंदात स्वागत केलं जात आहे. जिद्द आणि मेहनत खरी असेल तर कोणतीही परिस्थिती अडथळा ठरू शकत नाही, हे गायत्रीने सिद्ध करून दाखवलं आहे.

Web Title : गरीबी को हराकर पंक्चरवाले की बेटी बनी अधिकारी

Web Summary : पंक्चर ठीक करने वाले की बेटी गायत्री वर्मा ने आर्थिक तंगी का सामना करते हुए यूपीपीएससी परीक्षा पास की। उन्होंने अटूट पारिवारिक समर्थन के साथ 210वां रैंक हासिल किया। उनके पिता ने उनकी भविष्य की भूमिका में ईमानदारी पर जोर दिया।

Web Title : Puncture Repairman's Daughter Achieves Officer Rank After Overcoming Poverty

Web Summary : Gayatri Verma, daughter of a puncture repairman, cleared the UPPSC exam after facing financial hardship. She secured 210th rank with unwavering family support. Her father emphasized honesty and integrity in her future role, celebrating her achievement.