स्त्रीचं आयुष्य हे सुरुवातीपासूनच खडतर प्रवास मानलं जातं. तिचं जगणं म्हणजे सहनशीलतेचं, प्रेमाचं आणि त्यागाचं प्रतीक. जन्मानंतर आई-वडिलांची, लग्नानंतर नवऱ्याची आणि त्यानंतर मुलांची जबाबदारी सांभाळण्यात तिचं संपूर्ण आयुष्य खर्ची पडतं. (Success stories of Indian YouTubers) या सगळ्यात ती स्वतःचं अस्तित्व, स्वतःच्या स्वप्नांना अनेकदा विसरते. पण प्रत्यक्षात तिच्या पायावर उभं राहणं, स्वतःला ओळखणं आणि स्वतःचं स्थान निर्माण करणं हे तितकंच आवश्यक आहे. (Bharti Mhatre)
आयुष्यात कितीही संकटं आली तरी स्त्री कधीही खचून जात नाही. आपल्या वेदनांनाच ढाल बनवून ती पुन्हा नव्या उमेदीने उभी राहते. अशाच एका जिद्दीची कहाणी म्हणजे Simply Swadisht मागचा खरा चेहरा – युट्यूबर भारती म्हात्रे. (Simply Swadisht YouTube channel)
गाझाच्या राखेतून उमललेलं स्वप्न, मिस युनिव्हर्स स्पर्धेत पहिल्यांदाच पॅलेस्टिन तरुणी-लढाई मोठी पण..
मुलं मोठी झाली, जबाबदाऱ्या कमी झाल्या, तेव्हा स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे हा प्रश्न भारतीताईंच्या मनात सतत घोळत होता. पण त्यांना आपली एक कला माहीत होती –स्वादिष्ट, चमचमीत पदार्थ बनवून लोकांना खाऊ घालणं. सुरुवातीला अनेकांनी टोमणे मारले, हसले, टोकलं… तरीही त्यांनी हार मानली नाही. आपल्या जिद्दीने आणि कलेवरच्या विश्वासाने त्यांनी स्वतःचं नाव कमावलं आणि लाखो लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं.
कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की पुढे नेमकं काय करावं, हेच समजत नाही. आत्मविश्वास ढळतो, मन खचतं. माझ्याही आयुष्यात असाच टप्पा आला. विसाव्या वर्षी बहिण गमावली, तिसाव्या वर्षी वडिलांचा आधार हरवला आणि अवघ्या दोन वर्षांपूर्वी आई व नवरा दोघांनी जगाचा निरोप घेतला. एकाच वेळी माझ्या चारही आधारस्तंभ मला सोडून गेलं. परिस्थिती बेताची होती, दुःख अपार होतं… पण मी जगणं थांबवलं नाही.
हळूहळू सावरले, स्वतःला सावरण्याची ताकद मिळवली आणि नव्याने उभी राहिले. आवड म्हणून सुरू केलेलं युट्यूब चॅनेल आज लाखो फॉलोअर्सपर्यंत पोहोचलं आहे. स्वयंपाकाची कला जी माझी ओळख होती, तीच आज माझं बळ बनली आहे. घरातील जबाबदाऱ्या आणि बाहेरच्या आव्हानांमध्ये ताळमेळ घालणं नक्कीच कठीण आहे, पण तरीही मी माझ्या जिद्दीने ते शक्य केलं. मला विश्वास आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये अशीच शक्ती आहे. फक्त तिने स्वतःला ओळखलं पाहिजे, स्वतःसाठी जगायला शिकलं पाहिजे.
आज माझी कहाणी सांगते. आयुष्य कितीही कठीण असलं, तरी स्त्रीने स्वतःला कधीही हरवू नये. कारण तीच तिच्या कुटुंबाची खरी ताकद आणि स्वतःच्या आयुष्याची खरी नायिका असते.