स्मृती मंदाना ही भारतीय महिला क्रिकेट संघाची प्रमुख फलंदाज म्हणून ओळखली जाते. तिच्या खेळातील सातत्य, शांत स्वभाव आणि आत्मविश्वासामुळे ती चाहत्यांची लाडकी आहे. मात्र, यशाच्या या प्रवासामागे अनेक संघर्ष लपलेले आहेत. आयुष्यात जेव्हा एकामागून एक संकटे येतात, वैयक्तिक आयुष्यात वादळं किंवा कठीण प्रसंग येतात आणि लोक तुमच्यावर टीका करू लागतात, तेव्हा वाटतं की आता 'सगळं संपलं'. पण खरी जिद्द तिथेच असते जिथे माणूस पुन्हा एकदा उठून धीटपणे उभं राहतो. भारतीय महिला क्रिकेटची स्टार स्मृती मंधाना हिच्यासाठी देखील मागील काही काळ असाच होता. भारतीय महिला क्रिकेटमधील चमकता तारा म्हणून ओळखली जाणारी स्मृती मंदाना केवळ तिच्या खेळासाठीच नाही, तर तिच्या आयुष्यातील चढ-उतारांमुळेही कायम चर्चेत राहिली आहे(Smriti Mandhana inspirational journey).
कधी वैयक्तिक आयुष्यातील अफवा, कधी लग्न मोडल्याच्या चर्चा, कधी मानसिक ताण-तणाव, तर कधी तब्येतीची साथ न देणारी अडचण या सगळ्यावर मात करत स्मृतीने पुन्हा मैदानात दमदार कमबॅक केलं. खेळाडूची खरी ओळख ही केवळ त्याच्या खेळावरून नाही, तर त्याच्या संघर्षावरून आणि जिद्दीवरून होते.
गेल्या काही महिन्यांत स्मृती मंधानाच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले गेले. तिच्या 'ब्रेकअप' किंवा 'लग्न मोडल्याच्या' अफवांमुळे तिला नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. सोशल मीडियावर होणारी टीका आणि वैयक्तिक प्रश्नांचा भडीमार असूनही, स्मृतीने मौन पाळणे पसंत केले आणि आपले पूर्ण लक्ष सरावावर केंद्रित केले.(Smriti Mandhana comeback story).
अभ्यासाचा ताण आणि परीक्षेचं टेंशन विसरतील मुलं, परीक्षा काळात रिलॅक्स होण्यासाठी ५ गोष्टी सोप्या...
टीकाकारांना उत्तर देण्यासाठी स्मृतीने क्रिकेटचाच आधार घेतला. डब्ल्यूपीएलच्या (WPL) या हंगामात तिने केवळ धावाच केल्या नाहीत, तर एका विखुरलेल्या संघाला एकत्र आणले. आरसीबीच्या चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन ती प्रत्येक सामन्यात लढली.
अनेक टीका आणि अफवांचा सामना करत असतानाच, स्मृतीने आपली सर्व शक्ती मैदानात झोकून दिली. पण आरसीबीला विजेतेपद मिळवून देणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. फायनल सामन्याच्या आदल्या रात्री स्मृतीची प्रकृती प्रचंड खालावली होती. तिला चक्क १०३ डिग्री ताप होता. एखाद्या सामान्य व्यक्तीला उठणेही कठीण झाले असते, पण स्मृतीने या अवस्थेतही मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. डब्ल्यूपीएल फायनलसारखा मोठा सामना समोर असताना टीमच्या कॅप्टनने आजारी पडणे संघासाठी चिंतेचे होते. पण स्मृतीने हार मानली नाही. औषधे घेऊन आणि स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून ती मैदानात उतरली.
वर्षभरात केस इंचभरही वाढत नाही? 'असा' करा पोटली मसाज - केस वाढतील भरभर, सांभाळण होईल कठीण...
आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये जेव्हा कोचनी स्मृतीच्या या जिद्दीची कहाणी सांगितली, तेव्हा सर्व खेळाडू अवाक झाले. तेव्हा संघातील सर्व खेळाडूंनी उभे राहून स्मृतीसाठी टाळ्या वाजवल्या. कारण त्यांना माहिती होते की, हा विजय केवळ खेळाचा नाही, तर एका जिद्दीचा आहे. स्मृतीची ही खेळाप्रती असलेली निष्ठा पाहून सहकारी खेळाडू लॉरेन बेल हिच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होते. तिने अत्यंत भावूक होऊन स्मृतीच्या या साहसाचे कौतुक केले.
स्मृतीचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की, आयुष्यात जेव्हा एखादं दार बंद होतं, तेव्हा दुसरं उघडण्याची ताकद आपल्या कष्टांमध्ये असते. तिने केवळ कप जिंकला नाही, तर लाखो लोकांची मने जिंकली आणि सिद्ध केले की, 'अंतिम श्वासापर्यंत लढणाऱ्याचा कधीच पराभव होत नाही'. स्मृती मंदानाचा प्रवास सांगतो की आयुष्यात कितीही अडचणी आल्या, तरी मेहनत, संयम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर पुन्हा उभं राहता येतं.
Web Summary : Smriti Mandhana, faced personal setbacks and criticism, yet persevered. Despite health issues during the WPL final, her resilience inspired her team to victory, proving her unwavering dedication.
Web Summary : स्मृति मंधाना ने व्यक्तिगत बाधाओं और आलोचना का सामना किया, फिर भी दृढ़ रहीं। डब्ल्यूपीएल फाइनल के दौरान स्वास्थ्य समस्याओं के बावजूद, उनके हौसले ने टीम को जीत दिलाई, जो उनकी अटूट निष्ठा को साबित करता है।