>प्रेरणादायी > स्मिता गोंदकरची हिमालयात थरारक बाइक राइड! अशी राइड करायची तर फिटनेससाठी तिने काय केलं?

स्मिता गोंदकरची हिमालयात थरारक बाइक राइड! अशी राइड करायची तर फिटनेससाठी तिने काय केलं?

मराठमोळी अभिनेत्री स्मिता गोंदकरला बाइक राईड जबरदस्त आवडते. स्मिताने नुकतेच हिमालयात जाऊन बाइक रायडिंग केले असून त्याचे अनेक थरारक फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 03:30 PM2021-10-21T15:30:34+5:302021-10-21T15:31:19+5:30

मराठमोळी अभिनेत्री स्मिता गोंदकरला बाइक राईड जबरदस्त आवडते. स्मिताने नुकतेच हिमालयात जाऊन बाइक रायडिंग केले असून त्याचे अनेक थरारक फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. 

Smita Gondkar's thrilling bike ride in the Himalayas! What did she do for fitness if she wanted to ride like that? | स्मिता गोंदकरची हिमालयात थरारक बाइक राइड! अशी राइड करायची तर फिटनेससाठी तिने काय केलं?

स्मिता गोंदकरची हिमालयात थरारक बाइक राइड! अशी राइड करायची तर फिटनेससाठी तिने काय केलं?

Next

स्मिता गोंदकर म्हणजे मराठीतली एक स्टनिंग, बोल्ड अभिनेत्री. 'पप्पी दे, पप्पी दे, पारूला.....' या भन्नाट गाण्यामुळे स्मिता प्रचंड गाजली होती. पण त्यापेक्षाही जास्त लोकप्रियता तिने बिगबॉसमध्ये सहभागी होऊन मिळवली होती. मागच्या वर्षीच्या बिगबाॅस सिझनमध्ये सहभागी झालेली स्मिता तिचे एक वेगळे फॅन सर्कल निर्माण करू शकली. बिग बॉसच्या त्या सिझनमध्ये शेवटच्या मोजक्या काही स्पर्धकांपैकी स्मिता एक होती. तिचा शांतपणा आणि प्रत्येक गोष्टीला संयमाने तोंड देण्याची तिची सवय त्यावेळी खूपच लोकप्रिय झाली होती. 

 

शांत, संयमी आणि तेवढ्या बोल्ड असणाऱ्या स्मिताला बाइक राईड, कार राईड यासारख्या साहसी खेळांची प्रचंड आवड आहे. ती हे सगळे साहसी खेळ नियमितपणे करत असून नुकतीच तिने हिमालयात जाऊन बाईक राईड केली आहे. एरवी स्मिताची अंगकाठी पाहून ती बाइकचे एवढे वजन कशी काय पेलवत असेल, असा प्रश्न सहज कोणालाही पडू शकतो. पण हिच तर तिची खासियत आहे. तिचे बाइक आणि कार राईडिंग कौशल्य जबरदस्त असून हिमालयात केलेल्या तिच्या बाइक राईडचे फोटो आणि व्हिडियो तर कमालीचे थरारक झाले आहेत. 

 

स्मिता सोशल मिडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असते. ती नेहमीच तिचे फोटो, व्हिडियो सोशल मिडियावर शेअर करत असते. दोन दिवसांपूर्वी स्मिताने तिचे हिमालयातील बाइक राईडचे फोटो आणि काही व्हिडियो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हिमालयात बाइक राईड करणं ही अजिबातच चेष्टेची गोष्ट नाही. यासाठी तुमचा फिटनेस जबरदस्त असला पाहिजे. असा फिटनेस स्मिताने मिळवला आहे. बाइक राईडचे काही फोटो शेअर करताना स्मिताने एक पोस्टही शेअर केली आहे. ती म्हणते की, हिमालयातली बाइक राईड ही जगातली अशी एकमेव राईड आहे, जी समुद्रसपाटीपासून १२ हजार ते १५ हजार फुटांवर आयोजित केली जाते. जिथे केवळ १७ ते १८ टक्के ऑक्सिजन असतो आणि तिथले तापमान तर -१ ते -४ डिग्री सेल्सियस असते. अशा खडतर वातावरणामुळे हिमालयातली ही बाइक रॅली जगातील तिसरी सगळ्यात अवघड बाइक रॅली मानण्यात येते. 

 

कशी होती स्मिताची बाइक रॅली?
स्मिताची बाइक रॅली मनालीपासून सुरु झाली. यानंतर ती हाम्पता पास, ग्रम्फू, चाट्रु, कुनझून पास, लोसार, काझा, स्पिटी व्हॅली असा तब्बल ३७१ किमीचा प्रवास करून सोलांग व्हॅली येथे आली. कधी अतिशय तिव्र उतार तर कधी तेवढेच अवघड चढ, वातावरणात सातत्याने होणारे बदल, धुळ, दगड, खडक, नद्या, वाळू आणि गोठवून टाकणारे हवामान आणि कमी होत जाणारी ऑक्सिजनची पातळी अशा अनेक कठीण प्रसंगांवर मात करत स्मिताने तिची बाइक राईड पुर्ण केली आहे. ही रॅली अतिशय आव्हानात्मक आणि माझ्या कन्फर्ट झोनमधून मला पुर्णपणे बाहेर काढणारी होती. पण मला नेहमीच माझ्या मर्यादा तपासून घ्यायला आवडते, म्हणूनच मी ही बाइक राईड अतिशय उत्साहात आणि मोठ्या हिमतीने पुर्ण केली, असंही स्मिता सांगते. 

 

कार रेसिंगचीही स्मिता शौकिन
स्मिताला कार रेसिंगदेखील खूप जास्त आवडते. ती म्हणते हे सगळे खेळ करताना खूप जपून रहावे लागते. थोडी जरी गडबड झाली तरी ती महागाड पडू शकते. २०१९ साली झालेल्या फॉर्म्युला ४ रेसिंगमध्येही स्मिता सहभागी झाली होती. स्मिता म्हणते बाइक राईड, कार रेसिंग या सगळ्या टेक्निकल गोष्टी असून त्या मला कमालीच्या आवडतात. स्मिताच्या कुटूंबातील अनेक मंडळींना कार रेसिंग, बाइक रेसिंग, सायकल राईड अशा गोष्टींची आवड आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पाहूनच स्मितालाही या साहसी खेळांमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. स्मिताने आजवर अनेक वेळा रेसिंग केलं असून अनेक स्पर्धांमध्ये ती फास्टेस्ट वुमन या बक्षिसाची मानकरीही ठरली आहे.  

 

अशी राइड करायची तर फिटनेससाठी काय करावं?
- आजकाल हिमालयातल्या बाइक राईडची प्रचंड क्रेझ आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण देखील दिवसेंदिवस लक्षणीय वाढते आहे.
- पण अशा प्रकारची बाइक राईड करायची असेल तर तुमचा फिटनेस मात्र जबरदस्त असायला हवा.
- हिमालयात बाइक राईड करणे ही अजिबातच हलक्यात घ्यायची गोष्ट नाही. त्यामुळे तुम्ही ड्रायव्हिंगमध्ये एक्सपर्ट असायलाच हवे, हा या राईडमध्ये सहभागी होण्याचा पहिला अलिखित नियम आहे.


- कमी ऑक्सिजनमध्ये तुम्हाला अनेक वेळा ड्राईव्ह करावं लागतं. त्यामुळे तुम्ही प्राणायाम किंवा अन्य व्यायाम करून श्वसन संस्थेला बळकटी दिली पाहिजे.
- राईडचं प्लॅनिंग ज्या वर्षीचं असेल, त्याच्या किमान एक वर्ष आधीपासून अतिशय काटेकोरपणे, नियमितपणे हार्डकोअर व्यायाम करण्यावर भर दिला पाहिजे.
- बाइक राईड करण्यापूर्वी काही महिने आधीपासूनच दर महिन्याला हेल्थ चेकअप करून घ्यावं.

 

Web Title: Smita Gondkar's thrilling bike ride in the Himalayas! What did she do for fitness if she wanted to ride like that?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

घटस्फोटानंतरही मतभेद बाजूला ठेवून मुलांसाठी एकत्र येतात सेलिब्रिटी पालक; आमिर-किरण, ऋतिक-सुझानचे समंजस वर्तन - Marathi News | Celebrity parents come together for children, putting aside differences even after divorce; Aamir-Kiran, Hrithik-Suzan's sensible behavior | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घटस्फोटानंतरही मतभेद बाजूला ठेवून मुलांसाठी एकत्र येतात सेलिब्रिटी पालक; आमिर-किरण, ऋतिक-सुझानचे समंजस वर्तन

आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव  (Kiran Rao)त्यांचा घटस्फोट झाल्यापासून खूपच चर्चेत आहेत. मुलगा आझाद याच्या वाढदिवसानिमित्त या चर्चेला आता पुन्हा एक वेगळं वळण मिळालं आहे.. ...

‘ताज’मधली २६/११ ची ती रात्र.. लेखिका रजिता कुलकर्णी सांगतात, त्यादिवशी अनुभवलेला भयंकर थरार! - Marathi News | 26/11 survivor Rajita Kulkarni bagga shares a story of gratitude and life. the unknown edge | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘ताज’मधली २६/११ ची ती रात्र.. लेखिका रजिता कुलकर्णी सांगतात, त्यादिवशी अनुभवलेला भयंकर थरार!

बँकर रजिता कुलकर्णी-बग्गा (rajita kulkarni) यांचे ‘द अननोन एज’ हे पुस्तक नुकतंच प्रसिध्द झालं. जगण्यातली उमेद आणि संघर्ष यांचा सुंदर प्रवास त्या मांडतात, २६/११ च्या ताजवरच्या दहशतवादी हल्ल्यात प्रत्यक्ष अनुभवलेल्या रात्रीसह.. (The Unknown Edge) ...

आलिया भटच्या 'स्वीटहार्ट' कट लेहेंगा चोलीची फॅशन नेमकी कुठं चुकली? ये फॅशन है क्या? - Marathi News | Alia Bhatt's 'Sweetheart' cut choli fashion, netizens trolled her for her blouse fashion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भटच्या 'स्वीटहार्ट' कट लेहेंगा चोलीची फॅशन नेमकी कुठं चुकली? ये फॅशन है क्या?

Social Viral: ही असली कसली भलतीच फॅशन, असं म्हणत नेटकरी सध्या आलियाला (actress Alia Bhatt) जबरदस्त ट्रोल (troll) करत आहेत... त्या पार्टीत खरंतर आलिया खूप सुंदर दिसत होती. पण तिच्यापेक्षा तिच्या बोल्ड लूक असणाऱ्या ब्लाऊजचीच जास्त चर्चा झाली... ...

मिलिंद सोमण म्हणतो, पेट भर के खाओ, फिट रहो! 'ही' पथ्यं मात्र विसरू नकाच.. - Marathi News | Actor Milind Soman is giving Fitness Tips, says Indian traditional food is the healthiest food in the world. But....... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मिलिंद सोमण म्हणतो, पेट भर के खाओ, फिट रहो! 'ही' पथ्यं मात्र विसरू नकाच..

Fitness Tips : फिटनेस जपायचा म्हणून जेवण टाळता? किंवा कमी जेवता का? असं करू नका. कारण सुपरफिट मिलिंद सोमणचं (Actor Milind Soman) सांगतोय की फिटनेससाठी जेवण कमी करू नका, फक्त थोडीशी पथ्ये पाळा... काय आहेत बरं त्याची ही पथ्ये ? ...

‘स्वत:चा जीव वाचवायचा असेल तर स्वयंपाक करा!’- नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी करतात रोज स्वयंपाक, म्हणतात.. - Marathi News | economist-abhijit-banerjee-latest-book-on-cooking -what it means-‘Cooking to Save Your Life’ | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘स्वत:चा जीव वाचवायचा असेल तर स्वयंपाक करा!’- नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी करतात रोज स्वयंपाक, म्हणतात..

नोबेल पुरस्कार विजेते, अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक अभिजित बॅनर्जी (economist abhijit banerjee) रोज नियमित स्वयंपाक करतात यावर विश्वास ठेवाल तुम्ही? ते म्हणतात, ‘कुकींग टू सेव्ह युवर लाईफ’(‘Cooking to Save Your Life’) ...

Celebrity wore their husband clothes : विरूष्कापासून दीपवीरपर्यंत 'या' अभिनेत्री नेहमीच घालतात नवऱ्याचे कपडे; पाहा खास ड्रेसिंगचे फोटो - Marathi News | Celebrity wore their husband clothes : know some celebrity wives who wore their husband clothes | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :विरूष्कापासून दीपवीरपर्यंत 'या' अभिनेत्री नेहमीच घालतात नवऱ्याचे कपडे; पाहा खास ड्रेसिंगचे फोटो

Celebrity wore their husband clothes : सैफिना, दीपवीर, विरूष्का अशा अनेक टॉप सेलेब्सची नावे या यादीत सामील आहेत. तर आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटी पत्नींबद्दल सांगत आहोत, ...