Join us  

SkyUp : हवाईसुंदरी म्हणाल्या हाय हिल्सला बाय बाय, वापरणार फ्लॅट स्निकर्स! बदलणार हवाई सौन्दर्याचे निकष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 4:25 PM

SkyUp : एअरलाईन्सच्या फॅशन ट्रेंण्ड्सचे अनुसरण करण्यापेक्षा स्वतःकाहीतरी वेगळं निर्माण करणं हे स्काय अप एअरलाईन्सचे वैशिष्ट्य आहे.

ठळक मुद्देस्कर्टऐवजी नरम शिलाईच्या पॅण्ट्स यूक्रेनी फॅशन ब्रांड GUDU यांच्यासह मिळून तयार करण्यात आल्या आहेत.उंच टाचांच्या चपलांच्या जागा नाइके एयर मॅक्स 720 आरामदायक  स्नीकर्स आल्या आहेत. हे स्नीकर्स तयार करण्यासाठी ७५ टक्के साहित्य पर्यापरणासपूरक आणि रिसायकलेबल साहित्य वापरलं जात आहे.

(Photo credit de-skyup.aero)

हवाईसुंदरी म्हटलं की, सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतं ते म्हणजे गोरागोमटा चेहरा, स्कर्ट घातलेली आणि छानसा  मेकअप केलेली मुलगी. तुम्ही आतापर्यंत शुज घातलेली हवाईसुंदरी कधीही पाहिली नसेल. एअरलाईन्सच्या फॅशन ट्रेंण्ड्सचे अनुसरण करण्यापेक्षा स्वतःकाहीतरी वेगळं निर्माण करणं हे स्काय अप एअरलाईन्सचे वैशिष्ट्य आहे.

स्वतःमध्ये लवचीकतेसह गतीशिलता ठेवण्यासाठी नेहमीच ते प्रयत्नशील असतात.  यंदा शरद ऋतूच्या  सुरूवातीला  स्कायअप एअरलाईन्सच्या प्रवाशांचे स्कायअप चॅम्पियन्सकडून नवीन, युनिफॉर्म परिधान करत स्वागत केलं जाईल. हे फक्त आरामदायक आणि स्टाईलिश कपडे नाहीत तर यामुळे केबिन क्रुकडे पाहण्याची पूर्णपणे नवीन दृष्टी  मिळाली आहे.

ही संकल्पना काय आहे?

हा गणवेश खरंतर बदलाचे प्रतिक आहे. सक्रिय, उज्ज्वल विचारसरणीसाठी ही संकल्पना राबवण्यात आली. कोणतंही आव्हान स्वीकारणं आणि त्या स्थितीतून बाहेर येणं यासाठी एअरलाईन्स सज्ज आहे.  फ्रेम फॅशन कन्सल्टन्सीच्या सहकार्याने नवीन संकल्पना तयार करण्यापूर्वी, आम्ही इतिहासाचा शोध घेतला आणि 1930 दशकाच्या सुरुवातीपासून फ्लाइट अटेंडंटच्या गणवेशाच्या जागतिक उत्क्रांतीचे विश्लेषण केले. कर्मचाऱ्यांच्या बदलत्या भूमिकेच्या आधारे हे केले गेले.

स्कायअप एअरलाइन्स विपणन विभागाचे प्रमुख मारियाना ग्रिगोराश सांगतात की,'' काळ बदलला आहे, स्त्रिया बदलल्या आहेत.म्हणूनच जुने विचार, टाचांच्या चपला,  लाल लिप्सटिक आणि आंबाड्याच्या जागी एक नवीन प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्य, नैसर्गिक सौंदर्य, व्यक्तिमत्व, स्नीकर्ससह प्रत्येकाला भरारी घेण्याचा अधिकार आहे.''

अभ्यास आणि विमानातील केबिन क्रूजच्या मुलाखतीच्या आधारे बदलाचा निर्णय घेण्यात आला. चांगल्या हुद्द्यावर काम करत असलेल्या मुलींना आदर, सन्मान मिळवून देण्यासाठी तसंच त्यांच्या आरोग्याबाबत विचार करून हिल्सच्या जागी स्निकर्सचा पर्याय निवडला. हा गणवेश तयार करण्यासाठी यूक्रेनी फॅशन डिजायनर्सना आमंत्रित करण्यात आले होते. 

गणवेशातील महत्वाचे बदल

स्कर्टऐवजी नरम शिलाईच्या पॅण्ट्स यूक्रेनी फॅशन ब्रांड GUDU यांच्यासह मिळून तयार करण्यात आल्या आहेत.उंच टाचांच्या चपलांच्या जागी नाइके एयर मॅक्स 720 आरामदायक  स्नीकर्स आल्या आहेत. हे स्नीकर्स तयार करण्यासाठी ७५ टक्के साहित्य पर्यापरणासपूरक आणि रिसायकलेबल  वापरलं जात आहे.

एयर मॅक्स 720 संपूर्ण दिवस आरामशीर घातले जाऊ शकतात. स्कार्फ हा एअरलाईन्सचे प्रतिक आहे. या नव्या लूकमध्ये आकाशी रंगाच्या स्कार्फसह जॅकेट आणि कोट असणार आहे. मेकअप हा ड्रेसिंगला सूट होईल असा आकाशाच्या रंगांप्रमाणे असणार आहे. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सविमानप्रेरणादायक गोष्टी