Lokmat Sakhi >Inspirational > Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी

Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी

Shakti Dubey : प्रयागराजच्या शक्ती दुबेने घवघवीत यश संपादन केलं आहे. तिने ऑल इंडिया रँक-१ मिळवून परीक्षेत अव्वल स्थान पटकावलं आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 12:58 IST2025-04-25T12:57:42+5:302025-04-25T12:58:11+5:30

Shakti Dubey : प्रयागराजच्या शक्ती दुबेने घवघवीत यश संपादन केलं आहे. तिने ऑल इंडिया रँक-१ मिळवून परीक्षेत अव्वल स्थान पटकावलं आहे

Shakti Dubey became upsc topper in 5th attempt know abou her journey during she was aspirant | Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी

Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी

यूपीएससीने २०२४ च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. प्रयागराजच्या शक्ती दुबेने यामध्ये घवघवीत यश संपादन केलं आहे. तिने ऑल इंडिया रँक-१ मिळवून परीक्षेत अव्वल स्थान पटकावलं आहे. शक्तीचा हा पाचवा प्रयत्न होता. याआधी तिने चार वेळा प्रयत्न केले होते. पण अवघ्या काही गुणांनी संधी हुकली होती. 

शक्ती दुबेने अलाहाबाद विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठातून (BHU) बायोकेमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. २०१८ मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर तिने नागरी सेवांची तयारी सुरू केली. पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हे तिचे ऑप्शनल सब्जेक्ट होते.

"मला विश्वासच बसत नव्हता"

तयारीच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना शक्ती म्हणाली की, "सुरुवातीला मी देखील इतरांप्रमाणे खूप गोंधळलेली होती. सुरुवातीला माझ्यासाठी सर्व काही वेगळं आणि नवीन होतं, परंतु त्यामुळे माझ्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यास मदत झाली. तयारीदरम्यान युट्यूब आणि इंटरनेटवर टॉपर्सचे अनेक व्हिडीओ पाहिले होते.जेव्हा निकाल पाहिला तेव्हा सुरुवातीला मला विश्वासच बसत नव्हता की मी रँक-१ मिळवला आहे."

"वडिलांना पहिला फोन केला"

"मी माझ्या वडिलांना पहिला फोन केला आणि या कामगिरीबद्दल सांगितलं. मला वाटतं की, माझ्या शेवटच्या चार प्रयत्नांमध्ये काहीतरी राहत होतं.  गेल्या वर्षी दिलेल्या माझ्या शेवटच्या प्रयत्नात मी प्राथमिक आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले आणि मुलाखतीपर्यंत पोहोचले. मला वाटतं की, गेल्या वर्षीच्या परीक्षेच्या तयारीत थोडीशी कमतरता होती, जी मी या वर्षी सुधारली आणि निकाल तुमच्यासमोर आहे."

"कठोर परिश्रम आणि देवाचा आशीर्वाद"

शक्ती दुबेचे वडील देवेंद्र कुमार दुबे हे मूळचे बलिया जिल्ह्यातील बैरिया तहसीलमधील दोकती पोलिस स्टेशनमधील रामपूर गावचे रहिवासी आहेत. मुलीच्या यशाबद्दल ते म्हणाले, "मी खूप आनंदी आहे. तिला शिक्षणासाठी जे काही आवश्यक होतं त्या सर्व गोष्टी मी पुरवल्या आहेत. बाकी सर्व काही तिचे कठोर परिश्रम आणि देवाचा आशीर्वाद होता. गेल्या वर्षी काही गुणांनी यश न मिळाल्याने शक्ती थोडी अस्वस्थ झाली होती, पण तिने हार मानली नाही, तयारी करत राहिली आणि यश मिळवलं.
 

Web Title: Shakti Dubey became upsc topper in 5th attempt know abou her journey during she was aspirant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.