Lokmat Sakhi >Inspirational > Ayesha Ansari : शाब्बास पोरी! रिक्षा चालकाची लेक झाली डेप्युटी कलेक्टर; वडिलांचं स्वप्न केलं साकार

Ayesha Ansari : शाब्बास पोरी! रिक्षा चालकाची लेक झाली डेप्युटी कलेक्टर; वडिलांचं स्वप्न केलं साकार

Ayesha Ansari : आयशाने एमपीपीएससी परीक्षा २०२४ मध्ये १२ वा रँक मिळवून डेप्युटी कलेक्टर होण्याचा मान मिळवला. तिने हे यश कोचिंगशिवाय, सेल्फ स्टडीच्या जोरावर मिळवलं आणि आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 11:00 IST2025-01-21T10:59:34+5:302025-01-21T11:00:13+5:30

Ayesha Ansari : आयशाने एमपीपीएससी परीक्षा २०२४ मध्ये १२ वा रँक मिळवून डेप्युटी कलेक्टर होण्याचा मान मिळवला. तिने हे यश कोचिंगशिवाय, सेल्फ स्टडीच्या जोरावर मिळवलं आणि आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं.

self study and hard work to success Ayesha Ansari crack mppsc with 12 rank became deputy collector | Ayesha Ansari : शाब्बास पोरी! रिक्षा चालकाची लेक झाली डेप्युटी कलेक्टर; वडिलांचं स्वप्न केलं साकार

Ayesha Ansari : शाब्बास पोरी! रिक्षा चालकाची लेक झाली डेप्युटी कलेक्टर; वडिलांचं स्वप्न केलं साकार

आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने कोणतंही कठीण ध्येय साध्य करता येतं हे आयशा अन्सारीने सिद्ध केलं आहे. रेवा येथील रहिवासी असलेल्या आयशाने एमपीपीएससी परीक्षा २०२४ मध्ये १२ वा रँक मिळवून डेप्युटी कलेक्टर होण्याचा मान मिळवला. तिने हे यश कोचिंगशिवाय, सेल्फ स्टडीच्या जोरावर मिळवलं आणि आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं.

आयशाने तिचं प्राथमिक शिक्षण रेवा येथील एका खासगी शाळेतून पूर्ण केलं. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेत अव्वल आलेल्या आयशाचे वडील रिक्षा चालक आहेत. त्याच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते आता काम करू शकत नाही. अशा परिस्थितीत, आर्थिक आव्हानं असूनही, आयशाने तिच्या दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर एवढी मोठी कामगिरी केली आहे. एमपीएससीमध्ये १२ वा रँक मिळवून कुटुंबाचं नाव मोठं केलं आहे.

आयशाचे वडील, रिक्षा चालक होते, ते पोलीस कॉलनीत फिरताना अधिकाऱ्यांच्या बंगल्यांवरील नेमप्लेट्स पाहत अनेकदा म्हणायचे की, आमच्या कुटुंबातही एखादा अधिकारी असता तर बरं झालं असतं. ही गोष्ट आयशाच्या मनाला भिडली आणि त्याच दिवशी तिने कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं. अधिकारी बनून, आयशाने तिच्या वडिलांची इच्छा प्रत्यक्षात आणली आहे. आईवडील आणि मित्रांच्या पाठिंब्याशिवाय तिचं यश अपूर्ण आहे असं आयशा मानते. त्याच्या पालकांनी त्याला प्रत्येक परिस्थितीत प्रोत्साहन दिलं.

आर्थिक आव्हानं असूनही, आयशाने तिसऱ्या प्रयत्नात एमपीपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन इतिहास रचला. आयशाने कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय फक्त सेल्फ स्टडी करून परीक्षेची तयारी केली. ऑनलाइन अभ्यास साहित्य आणि सरकारी शाळेतील शिक्षणाच्या मदतीने तिने हे स्थान मिळवलं. हे तिच्या दृढ इच्छाशक्तीचं आणि आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे. आयशापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. 
 

Web Title: self study and hard work to success Ayesha Ansari crack mppsc with 12 rank became deputy collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.