Join us

Sarla Thakaral : साडी नेसून विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक सरला ठकराल; गुगलनं बनवलं खास डूडल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 13:09 IST

Sarla Thakaral : १९३६ मध्ये २१ वर्षीय सरलानं जिप्सी मॉथ नावाचे  २ सीटर विमान उडवले.

जगभरातील महिलांचा स्वयंपाक घर ते जग चालवणं हा प्रवास विलक्षणं आहे. सध्याच्या स्त्रिया पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येतात. पण 85 वर्षांपूर्वीही भारतीय महिलेनं विमान चालवून मोठा आदर्श घालून दिला. त्यांच्या या प्रवासात त्यांना पतीसह कुटुंबियांनीही खूप साथ दिली.

आज भारतीय पायलट, डिजायनर आणि वैमानिक सरला ठकराल यांची १०७ वी जयंती आहे. त्यांच्या  जयंतीनिमित्त गुगलनं खास गुगल डूडल तयार केलं आहे. सोशल मीडियावर हे गुगल डूडल तुफान व्हायरल होताना पाहायला मिळतंय. वृंदा जवेरी यांनी हे डूडल तयार केलं आहे. 

सरला ठकराल या विमान चालवणाऱ्या  पहिल्या भारतीय महिला होत्या. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९१४ ला दिल्लीमध्ये झाला होता. त्यांचं लग्न वयाच्या १६ व्या वर्षी  पायलट  पीडी शर्मा यांच्याशी झालं. पतीकडून प्रेरणा घेत सरला यांनी जोधपूर फ्लाईंग क्लबमध्ये ट्रेनिंग घेतली आणि १९३६ मध्ये २१ वर्षीय  सरलानं जिप्सी मॉथ नावाचे  २ सीटर विमान उडवले.

ब्रिटिशांच्या राज्यात वयाच्या वयाच्या २१  व्या वर्षी ४ वर्षांच्या मुलीची आई असतानाही त्यांनी विमान चालवून मैलाचा दगड रचला.  सुरूवातीला लायसेंस मिळाल्यानंतर १००० तासांचे उड्ड्यानं पूर्ण करून सरला 'ए' लायसेंस मिळवण्यात यशस्वी ठरल्या. सरला यांच्या सासरी ९ लोक वैमानिक होते. 

सरला यांचे पती पीडी शर्मा स्वतः भारताच्या पहिल्या एअरमेल पायलटचे लायसेंसधारी होते. त्यांनी पहिल्यांदा  कराची ते लाहौरदरम्यान उड्डाण घेतले.  दुर्दैवाने त्यांचा एका विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यानंतर 1939 साली दुसरे जागतिक महायुद्ध सुरु झाल्याने कमर्शियल पायलट व्हायचं स्वप्न सरला ठकराल यांना गुंडाळावं लागलं.  सरला ठकराल यांनी लाहोरच्या मेयो स्कुल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला आणि फाईन आर्ट आणि चित्रकलेचं शिक्षण घेतलं

टॅग्स :वैमानिकप्रेरणादायक गोष्टी