lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Inspirational > Russia Ukraine War: युक्रेनमध्ये राहणाऱ्या 17 वर्षांच्या मुलीने दाखवली जगावेगळी माणुसकी! म्हणाली, मी भारतात परत येणार नाही कारण..

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये राहणाऱ्या 17 वर्षांच्या मुलीने दाखवली जगावेगळी माणुसकी! म्हणाली, मी भारतात परत येणार नाही कारण..

Russia Ukraine War: धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच, युक्रेनमध्ये अडकलेली भारतीय मुलगी म्हणते..मी भारतात येणार नाही, कारण माझी याठिकाणी जास्त गरज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2022 11:29 AM2022-02-28T11:29:11+5:302022-02-28T11:33:10+5:30

Russia Ukraine War: धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच, युक्रेनमध्ये अडकलेली भारतीय मुलगी म्हणते..मी भारतात येणार नाही, कारण माझी याठिकाणी जास्त गरज...

Russia Ukraine War: A 17-year-old girl living in Ukraine showed a different kind of humanity! Said, I will not return to India because .. | Russia Ukraine War: युक्रेनमध्ये राहणाऱ्या 17 वर्षांच्या मुलीने दाखवली जगावेगळी माणुसकी! म्हणाली, मी भारतात परत येणार नाही कारण..

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये राहणाऱ्या 17 वर्षांच्या मुलीने दाखवली जगावेगळी माणुसकी! म्हणाली, मी भारतात परत येणार नाही कारण..

Highlightsत्यांना माझी सर्वात जास्त गरज असल्याने मी त्यांना एकटे सोडू शकत नाही असे नेहा ठामपणे आणि अतिशय धाडसाने सांगत आहे. त्यामुळे नेहाच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच....

रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि एक एक शहर आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. याठिकाणी असलेली युद्धजन्य परिस्थिती (Russia Ukraine War) आपण सगळेच गेले काही दिवस पाहत आहोत. एकीकडे मोठ्या प्रमाणात माणसांचे जीव जात आहेत. अशा परिस्थितीत मिळेल त्या मार्गाने आपण स्वत:चा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करु. पण माणुसकी भारतीयांच्या रक्तात असते हे काही खोटे नाही, याची प्रचिती नुकतीच आली. हरियाणा येथे राहणाऱ्या अवघ्या १७ वर्षिय भारतीय तरुणीने मात्र या परिस्थितीत युक्रेन सोडून भारतात परतण्यास नकार दिला आहे. याठिकाणी आपली जास्त गरज असल्याचे तिचे म्हणणे आहे. आपल्या घरमालकांची पत्नी आणि त्यांची ३ लहान मुले यांना मी या परिस्थितीत सोडून मायदेशी परतू शकत नाही असे तिचे म्हणणे आहे.  

(Image : Google)
(Image : Google)

मूळ हरियाणाची असलेली नेहा मागच्या वर्षी मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमधील कीव याठिकाणी गेली. नेहाचे वडील भारतीय सैन्यात होते, तर तिची आई हरियाणामध्ये शिक्षिका म्हणून काम करते. आपल्याला मेडिकलला प्रवेश मिळाल्यानंतर हॉस्टेल मिळत नव्हते. तेव्हा या कुटुंबाने आपल्याला आधार देत त्यांच्या घरातील एक खोली भाड्याने दिली असे नेहा सांगते. नेहाचे घरमालक असलेल्या कुटुंबाने रशियन सैन्याविरोधात लढण्याचे ठरवले असून लहान मुलांचे वडील सैन्यात भरती झाले आहेत. तर ही तीन मुले, त्यांची आणि आणि नेहा सध्या एका बंकरमध्ये राहत आहेत. या परिस्थितीत तिच्या जीवाल धोका असल्याने तिचे पालक तिच्या संपर्क कऱण्याचा आणि भारतात परतण्यास सांगत असताना नेहा मात्र अशाप्रकारे आपल्यासोबत असलेल्या कुटुंबाला सोडून मायदेशी येण्यास नकार देत आहे. 

नेहाच्या आईची मैत्रीण असलेल्या सविता जाखड यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या घटनेबाबतची माहित दिली. ही लहान तीन मुले आणि त्यांची आई इतक्या कठिण परिस्थितीत असताना मी त्यांना सोडून येऊ शकत नाही असे नेहाचे म्हणणे आहे. आता त्यांना माझी सर्वात जास्त गरज असल्याने मी त्यांना एकटे सोडू शकत नाही असे नेहा ठामपणे आणि अतिशय धाडसाने सांगत आहे. युद्ध सुरू झाल्यावर सुरुवातीचे तीन दिवस नेहाचा फोन बंद होता. मात्र त्यानंतर तिच्याशी फोनवर संपर्क झाला असून ती सुखरुप या कुटुंबासोबत असल्याचे तिने सांगितले. अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे नेहा इतक्या खंबीरपणे स्वत:चा जीव धोक्यात घालून या कुटुंबासोबत राहत आहे याचे आम्हाला आश्चर्य वाटते असे सविता आपल्या पोस्टमध्ये म्हणतात. त्यांची ही फोसबुक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून अवघ्या २ दिवसांत ३०० हून अधिक जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे. तर अनेकांनी या पोस्टवर नेहाविषयी काळजी करणाऱ्या आणि तिचे कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे नेहाच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच....

Web Title: Russia Ukraine War: A 17-year-old girl living in Ukraine showed a different kind of humanity! Said, I will not return to India because ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.