Lokmat Sakhi >Inspirational > स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी

स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी

हरियाणाच्या दीपाली हरिराम सिकरवालने मेहनत आणि दृढनिश्चयाच्या जोरावर तिने भारतीय नौदलात सब लेफ्टनंट (पायलट) बनून कुटुंबाचं, गावाचं नाव मोठं केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 15:57 IST2025-07-02T15:56:38+5:302025-07-02T15:57:48+5:30

हरियाणाच्या दीपाली हरिराम सिकरवालने मेहनत आणि दृढनिश्चयाच्या जोरावर तिने भारतीय नौदलात सब लेफ्टनंट (पायलट) बनून कुटुंबाचं, गावाचं नाव मोठं केलं आहे.

pilot indian navy ssb deepali gave flight to dreams won sky with hard work now will become an navy officer | स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी

स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी

काहीतरी साध्य करण्याची जिद्द असेल आणि आपल्या ध्येयासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर यश निश्चित मिळतं. हरियाणाच्या दीपाली हरिराम सिकरवालने हे सिद्ध केलं आहे. मेहनत आणि दृढनिश्चयाच्या जोरावर तिने भारतीय नौदलात सब लेफ्टनंट (पायलट) बनून कुटुंबाचं, गावाचं नाव मोठं केलं आहे. सर्वांना तिचा अभिमान वाटत आहे.  

दीपालीने अलीकडेच भारतीय नौदलाची प्रतिष्ठित सेवा निवड मंडळ (SSB) परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. आता ती लवकरच केरळमधील भारतीय नौदल एकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी सामील होणार आहे, जिथे तिच्या स्वप्नाला आणखी बळ मिळेल.

 देशाची सेवा करण्याचं स्वप्न 

भारतीय नौदलात सब लेफ्टनंट (पायलट) बनलेली दीपाली ही हरियाणातील धारुहेरा येथील आहे. तिने तिचं प्राथमिक शिक्षण धारुहेरा येथील एका खासगी शाळेतून पूर्ण केलं आणि राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून ग्रॅज्युएशन केलं. लहानपणापासूनच तिचं सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याचं स्वप्न होतं, जे तिने आता सतत प्रयत्न करून पूर्ण केलं आहे.

मुलीने राष्ट्रीय स्तरावर नाव कमावल्याने अभिमान

दीपालीच्या या उल्लेखनीय कामगिरीची माहिती मिळताच, कुटुंबातील सदस्यांमध्ये आणि गावातील लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वजण तिचं भरभरून कौतुक करत आहेत. गावात दीपालीचं स्वागत करण्यासाठी एका भव्य कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यांच्या भागातील मुलीने राष्ट्रीय स्तरावर नाव कमावल्याने सर्वांना तिचा अभिमान आहे.

ही गोष्ट फक्त दीपालीची नाही, तर त्या सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी आहे जे त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. दीपालीने कठोर परिश्रमाने कोणतंही ध्येय अशक्य नाही हे दाखवून दिलं आहे. 

Web Title: pilot indian navy ssb deepali gave flight to dreams won sky with hard work now will become an navy officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.