Join us  

वय फक्त 20, इंस्टाग्रामवर ४ कोटी फॉलोअर्स, फोर्ब्जच्या यादीतही मिळवले स्थान, कोण ही अभिनेत्री?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 3:38 PM

हिंदी मालिका गाजवणाऱ्या या अभिनेत्रीचे होतेय सर्व स्तरातून कौतुक, सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्याचा आणि मोठे फॅन फॉलोईंग असल्याचा परीणाम...

ठळक मुद्दे'दिल मिल गए' या मालिकेतून आपल्या टेलिव्हिजन करिअरची सुरुवात केली. मात्र, 'काशी: अब ना रहे तेरा कागज कोरा' आणि 'फुलवा' या मालिकांनी तिला लोकप्रियता मिळाली. कमी वयात इन्स्टाग्रामवर इतके फॅन फॉलोईंग असणारी जन्नत ही अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री असल्याचे सिद्ध झाले आहे

टिकटॉक स्टार ते छोट्या पडद्यावरची (Television Actress) प्रसिद्ध अभिनेत्री जन्नत जुबैर (Jannat zubair) सध्या बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये (Hindi daily soap) झळकत आहे. त्यामुळे तिच्या लोकप्रियतेत वाढ होत असून तिचे फॅन फॉलोईंगही वाढत आहे. अभिनेत्री एकदा प्रसिद्धीच्या झोतात आल्या की त्यांना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही वाढते. त्यामुळे त्यांच्या करिअरबरोबरच या अभिनेत्रींच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे हे समजायलाही मदत होते.

सध्या फेसबुकपेक्षा इन्स्टाग्रामवर असणाऱ्यांची संख्या वाढली असून इन्स्टावर आपल्या आवडत्या स्टारला फॉलो करणारे भरपूर आहेत. जन्नत आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमी बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमधले फोटो शेअर करताना दिसते. नुकतेच जन्नत जुबैरला इन्स्टाग्रामवर फॉलो करणाऱ्यांची संख्या ४ कोटी झाली असून यासाठी तिची फोर्ब्जकडून निवड करण्यात आले आहे. अंडर 30 आशिया यादीत तिने नाव पटकावले असून त्यासाठी तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 

याविषयीची माहितीही तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली. जन्नत अवघी १० वर्षांची असून इतक्या लहान वयात 4 कोटी फॉलोअर्स झाल्यानंतर  तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. आपल्यासाठी ही सर्वात मोठी मोठी गोष्ट असल्याचे तिने म्हटले आहे. इन्स्टावर पोस्ट शेअर करताना तिने एक फोटो शेअर करत आपल्या या अॅचिव्हमेंटबाबत माहिती दिली. व्यवसाय, स्टार्ट अप, कला आणि क्रीडा क्षेत्रात आपली चांगली कामगिरी करतात अशा 30 वर्षांखालील तरुणांना फोर्ब्जच्या यादीत स्थान दिले जाते. इंस्टाग्रामवर फोर्ब्सचे पोस्टर शेअर करत तिने लिहिले की, 'लहान वयातील माझी ही सर्वात मोठी कामगिरी आहे. यासाठी फोर्ब्सचे खूप खूप आभार.

या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी 20 वर्षीय जन्नत आपल्या कुटुंबासह दुबईला गेली होती. तिने आणखी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये क्रूजवर आई-वडील आणि भावासोबत केक कापतानाचा फोटोही पोस्ट केला आहे. जन्नतने 2010 मध्ये 'दिल मिल गए' या मालिकेतून आपल्या टेलिव्हिजन करिअरची सुरुवात केली. मात्र, 'काशी: अब ना रहे तेरा कागज कोरा' आणि 'फुलवा' या मालिकांनी तिला लोकप्रियता मिळाली. यानंतर ती 'वीरपुत्र- महाराणा प्रताप' आणि 'तू आशिकी' सारख्या मालिकांमध्येही दिसली आहे. जन्नत शेवटची 2018 मध्ये 'हिचकी' सिनेमात दिसली होती. ज्यामध्ये तिने नताशा नावाच्या विद्यार्थिनीची भूमिका साकारली होती.

 

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीइन्स्टाग्रामटिव्ही कलाकार